September 2019
पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी-
विदयार्थ्यांना फक्त चार भिंतीच्या आतीलच शिक्षण देणे महत्वाचे नसुन त्याच बरोबर चार भिंतीच्या बाहेरील शिक्षणही महत्वाचे आहे.विदयार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात पुस्तकी ज्ञानाबरोबरच शारिरीक विकासही महत्वाचा मानला जातो. 

याच उद्देशाने विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.यातीलच एक भाग म्हणून नुकत्याच अहमदनगर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दा. ह. घाडके पाटील क्रिडा संकुल नेवासा फाटा येथे संपन्न करण्यात आल्या. या कुस्ती स्पर्धामध्ये सत्यनिकेतन राजुर संस्थेच्या सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे(ता.अकोले ) येथील माध्यमिक विदयालयातील गणेश बेणके याने घवघवीत यश संपादन करून ग्रिको रोमन या प्रकारातील १७ वर्षाखालील ९२ किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला. त्याची पुणे येथे होणाऱ्या विभागीय कुस्तीसाठी निवड झाली आहे. या यशस्वी कुस्तीपटटूस क्रिडा शिक्षक संपत धुमाळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विदयार्थ्याचे तसेच मार्गदर्शक शिक्षकाचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त , संचालक तथा माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, सर्व संचालक मंडळ, शालेय समितीचे अध्यक्ष दिनेश शहा, विद्यालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
नवी दिल्ली : कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनासाठी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. मात्र, मनमोहन यांच्याकडून पाकिस्तानचे निमंत्रण झिडकारले जाण्याची शक्‍यता आहे.
भारतीय शीख यात्रेकरूंसाठी पाकिस्तान 9 नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडॉर खुला करणार आहे. त्या मार्गामुळे पाकिस्तानमधील कर्तारपूर आणि भारताच्या पंजाबमधील गुरूदासपूर जिल्हा जोडला जाणार आहे. त्या कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी मनमोहन यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी यांनी सोमवारी दिली. तो कार्यक्रम पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यामध्ये वैयक्तिक रस दाखवला आहे. मनमोहन यांच्याविषयी आम्हाला मोठा आदर आहे. त्याशिवाय, ते शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचे कुरेशी यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मात्र, पाकिस्तानच्या निमंत्रणाविषयीची कुठली माहिती नसल्याचे मनमोहन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. निमंत्रण मिळाले तरी मनमोहन पाकिस्तानला जाण्याची शक्‍यता नसल्याचेही त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली असली, तरी जागावाटप अद्यापही जाहीर झालेले नाही. अर्थात युतीच्या यादीची प्रतीक्षा असल्याने आघाडीकडून जागावाटप व उमेदवार जाहीर करण्यास उशीर होत आहे. जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादी 12 पैकी 9 मतदारसंघ लढणार असल्याचा दावा करीत आहे; परंतु प्रत्यक्षात कर्जत-जामखेड व पारनेर हे दोन मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात उमेदवार कोण असा प्रश्‍न पडतो. उर्वरित सात मतदारसंघांत राष्ट्रवादीला उमेदवारांची वानवाच दिसून येत असून उमेदवारांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या मतदारसंघात उमेदवार आहे, ते अद्यापही उमेदवारी जाहीर करण्याच्या मानसिकतेत नाही. ते अजूनही कुंपणावर असल्याने राष्ट्रवादीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.

नगर जिल्ह्यात भाजप व शिवसेनेचे वाढते प्रस्थ पाहता आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकेकाळी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात आज दोन्ही कॉंग्रेसला बारा जागांवर उमेदवार देण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. त्यात संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी हे तीन मतदारासंघ कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता आहे. उर्वरित 9 मतदारासंघ राष्ट्रवादी लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण या मतदारसंघ उमेदवार कोण असेल, हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते अजूनही शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून आघाडीची उमेदवारी न करण्याच्या मानसिकतेत आहे. पर्याय मिळाला नाही तर आघाडीच्या उमेदवारीचा विचार करण्यात येण्याची सध्या तरी स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे सध्या तरी उमेदवारांचा वानवाच दिसून येत आहे.
नगर – विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये खिंडार पडायला सुरुवात झालेली असतानाच स्थानिक पातळीवर अंतर्गत वाद राष्ट्रवादी मध्ये उफाळलं आला. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्त केला असल्याची माहिती किरण काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मी गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो. पक्षातील स्थानिक नेतृत्व नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही, मला आणि सामान्य नगरकरांनी प्रतीक्षा असणाऱ्या नगर विकासाच्या दृष्टीने मी लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे, याच कारणामुळे मी माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे आज दिला असेही काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

समाजातील नेतृत्व करण्यासाठी शहरात व्हीजन असलेल्यांना नेतृत्व दिले जावे यासाठी देखील पक्षात कायम आग्रह धरत होतो परंतु यामध्ये दुर्देवाने मागील अप्रिय निर्णयाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगून देखील स्थानिक नेतृत्वाने पक्षविरोधी निर्णय घेतला. कायम पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आत्ता देखील सर्व पक्षांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर स्वतःच्या प्रसिद्ध कार्य कौशल्यामुळे आपल्याला कोणीही कोणत्या पक्षात प्रवेश घ्यायला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रवादीची आठवण झाली असा टोला त्यांनी आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांचे नाव न घेता यावेळी लगावला आहे.

पक्षनिष्ठा कायम वेशीवर टांगणाऱ्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय असू शकते असा सवालही काळे यांनी यावेळी उपस्थित केला.
संगमनेर: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर पक्षांचे कार्यकर्ते हे आमदार थोरात यांच्या “सुदर्शन’ निवासस्थानी एकत्र आले. आणि 10 वाजता प्रांताधिकारी कार्यालय, नवीन नगर रोड येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

थोरात यांच्यावर कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी असून त्यांना राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रचारासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस आघाडीच्या वतीने आपला अर्ज दाखल केला.

नगर: विधानसभेच्या निवडणूकीत सर्व शिक्षक संघटनांनी महिला शिक्षकांना स्थानिक पातळीवर नियुक्त्या देण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत निवडणूक शाखेने मात्र अनेक ठिकाणी महिला शिक्षिकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून निवडणुकीचे अतिरिक्त काम देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये निवडणूक नियुक्ती आदेशाचे वाटप आज करण्यात आले. यामध्ये पदवीधर महिला शिक्षकांना केवळ त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम देण्यात आले आहे. याबद्दल जिल्ह्यातील महिला शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत सदरचे काम हे विविध खात्यातील अधिकारी तसेच माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना दिले जात होते. मात्र यावेळी जिल्ह्यातील बहुतांश महिला प्राथमिक शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

सध्या जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी निवडणूक प्रशिक्षणाचे सत्र सुरू असून अनेक ठिकाणी महिला शिक्षकांनी आम्हाला स्थानिक पातळीवर व शाळेपासून जवळच्या ठिकाणी काम द्यावे. तसेच मतदान अधिकारी क्रमांक दोन किंवा तीन चे काम द्यावे, अशी मागणी केलेली होती. निवडणुकीशी संबंधित प्रांताधिकारी,निवडणुकअधिकारी यांनी सुद्धा याबाबत निश्चित विचार करण्याचे आश्‍वासन दिलेले होते. 

मात्र आज वितरीत झालेल्या निवडणूक कामाच्या आदेशामध्ये जिल्ह्यातील अनेक महिला प्राथमिक शिक्षकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष चे काम सोपविण्यात आल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. सदरचे काम जबाबदारीचे असून या पदाला मतदान केंद्राध्यक्षा बरोबर काम करावे लागते. त्यामुळे सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष पदी दिलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी जिल्ह्यातील महिला शिक्षकांनी केली असून यासंदर्भात शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

बिजींग : पूर्व चीनमध्ये रविवारी सकाळी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला. चीनच्या स्थानिक सरकारी वृत्तसंस्थेने, बस आणि ट्रकची समोरासमोर धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात 36 लोक जखमी झाले असून 36 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी पूर्व चीनच्या जिआंग्सु प्रांतात हा अपघात झाला. ट्रक आणि बसमध्ये हा अपघात झाला. बसचे टायर पंक्‍चर झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. दुर्घटनेच्या वेळी बसमध्ये 69 लोक होते त्यातील 36 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दंतेवाडा -छत्तिसगढच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शनिवारी दोन शक्तिशाली आयईडी स्फोटके निकामी केली. त्यामुळे घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव उधळला गेला.

गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी दंतेवाडा जिल्ह्यातील दोन गावांदरम्यानच्या रस्त्यावर भूसुरूंग शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. त्यावेळी रस्त्यालगत एका ठिकाणी पुरून ठेवण्यात आलेली आयईडी स्फोटके आढळली. दोन्ही स्फोटके प्रत्येकी 30 किलो वजनाची होती. ती स्फोटके एकमेकांना कनेक्‍ट करण्यात आली होती. त्यामागे एकाच वेळी दोन्ही आयईडींचा स्फोट घडवण्याचा कट होता. ती स्फोटके तातडीने निकामी करण्यात आली. दंतेवाडा विधानसभा मतदारसंघात नुकतीच पोटनिवडणूक झाली.

त्यासाठीच्या प्रचारावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रवासासाठी संबंधित रस्त्याचा वापर केला. त्या पोटनिवडणुकीमुळे मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. त्यामुळे राजकीय नेते किंवा सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्याच्या उद्देशातून नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटके पेरून ठेवल्याचे उघड झाले. दरम्यान, संबंधित पोटनिवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ती जागा छत्तिसगढमधील सत्तारूढ कॉंग्रेसने भाजपकडून खेचून घेतली.

कराड: शेतकरी, बहुजनाचे राज्य टिकवायचे असेल तर,या सरकारला हाकलून दिले पाहिजे. आणि याची सुरुवात कराड मधून करायची आहे. जिल्हा बळकट करण्याचा विडा उचलून मतदारांना केंद्रबिंदू मानून योग्य तो निर्णय दोन दिवसात घेतला जाईल अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली. कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित बुथ कमिटी मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

दरम्यान या मेळाव्यात चव्हाण यांची मुलगी अंकिता खोत यांनी सांगितले की, सध्या विधानसभा की लोकसभा बाबा कोणती निवडणुक लढवणार याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. परंतु बाबांनी कराड विधानसभेचीच निवडणुक लढवावी अशी माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणे विरोधक म्हणतात पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईमध्ये असण्याची गरज नाही आहे. परंतु चंद्रकांत दादांची कृपा आणि मुख्यमंत्र्यांची मेहरबानी कराडवर आम्हाला नको आहे. त्यामुळे कराडमधला आमचा आमदार मुंबईला असणं गरज असल्याचे देखील अंकिता खोत यांनी सांगितले आहे.

नगर (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील गार गावच्या शिवरात भिमा नदीपात्रात पाण्यामधून अवैधरित्या यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करणार्‍या दहा लाख रुपये किंमतीच्या दोन लोखंडी बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व श्रीगोंदा महसूल पथकाने केली आहे.शनिवार (दि.28) रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना मिळालेल्या माहिती नुसार काहीजन गार गावच्या शिवरात भिमा नदीपात्रात बोटीने वाळू उपसा करत असल्याचे समजले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने पोलीस हवालदार विजयकुमार वेठेकर, रवींद्र कर्डीले, रोहीत मिसाळ, बाळू पालवे, विश्वास बेरड, कमलेश पाथरुट, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे यांनी श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी व त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन गार गावच्या शिवरात जाऊन नदीपात्रात दहा लाख रुपये किंमतीच्या दोन लोखंडी बोटी मिळून आल्याने महसूल पथकाने त्या जिलेटीनच्या सहाय्याने उध्वस्त केल्या. मात्र, अवैध वाळी उपसा करणारे पोलीस पाहताच त्या ठिकाणाहून पसार झाले होते.

नगर (प्रतिनिधी) – महावितरण मध्ये सुरक्षारक्ष म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक सुदाम आढाव यांची कुठले ही कारण न देता प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांची नियुक्ती दिल्याचे ठिकान सोडून इतरत्र बदली करण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून महावितरणचे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटनेने दिला आहे.

जामखेड: आगामी कर्जत जामखेड मतदार संघात युवा नेते रोहित पवार यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवत आगामी काळात तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय संकल्प मेळाव्यात घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाचा युवा नेतृत्व विकी सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली महावीर भवन येथे संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समाजातील जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले

त्यानंतर बोलताना सदाफुले म्हणाले कि, पालकमंत्री राम शिंदे यांनी शहरात दोन कोटी रुपयांचे डाॅ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय मंजूर केले होते. परंतु ते न बांधता निधी जाणीवपूर्वक परत पाठवला आहे. तसेच जामखेड मधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे पक्ष न बघता विकासत्मक काम करणारा उमेदवार पाहिजे. आणि राष्ट्रवादीचे रोहित पवारच विकास करु शकतात असा सुर समाजातून निघाला आहे. त्यामुळे एकमुखाने आबेडकरी समाजाचा रोहित पवार यांना जाहीर पाठिंबा असणार आहे.

यावेळी दिला नायगावचे सरपंच शिवाजी ससाणे, जोगेद्र थोरात, मल्हारी सदाफुले, सुजित धनवे, अजित घायतडक, दिलीप गायकवाड, अनिल सदाफुले आदीचे भाषण झाली.
नवी दिल्ली- काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याची तरतूद असलेले कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून त्याची सुनावणी घेण्यासाठी स्वतंत्र घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनापीठापुढे कलम 370 विषयीच्या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी होणार आहे.

या याचिका सरन्यायाधिशांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आल्यानंतर गेल्या ऑक्‍टोबर मध्येच या संबंधात स्वतंत्र घटनापीठ स्थापन केले जाईल असे सरन्यायाधिशांनी स्पष्ट केले होते त्यानुसार हे घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. या याचिकांमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. यावरील निर्णयाचा दूरगामी परिणाम होणार असल्याने घटनापीठामार्फतच त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय सरन्यायाधिशांनी घेतला होता.

काश्‍मीरच्या कलम 370 विषयीच्या याचिका सुनावणीला घेण्यालाच केंद्र सरकारने विरोध दर्शवला होता. तरीही केंद्राचा आक्षेप डावलून सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्याने त्या निकालावर कलम 370 चे भवितव्य अवलंबून असणार आहे. गेले सुमारे दोन महिने काश्‍मीर खोऱ्यातील जनतेवर फोन बंदीसह अन्य प्रकारचे निर्बंध लागू आहेत. तसेच तेथील अनेक नेत्यांची धरपकड करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही स्थिती किती काळ अशीच राहणार या विषयीही सध्या वेगवेळ्या स्वरूपाची चर्चा सुरू आहे.जामखेड – विधानसभेच्या निवडणुकीला अवघ्या 25 दिवसांवर येऊन ठेपला आहे. निवडणूक म्हणजे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी एक उत्सवच असतो. प्रचार फेऱ्या, सभा, गावोगावी भेटी असा मोठा लवाजमा प्रत्येक पक्षाकडून निवडणूक काळात असतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र प्रचारासाठी जेमतेम 12 दिवस मिळणार आहेत.
यामुळे एकीकडे उमेदवारीसाठी मॅनेजमेंट आणि दुसरीकडे यंत्रणा राबवून प्रचार पूर्ण करण्याची कसरत करताना इच्छुकांची चांगलीच धावपळ उडत आहे. त्याचबरोबर अत्यल्प कालावधी असल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हटले की प्रचार हा आलाच. प्रचारासाठी गाड्यांचे ताफे, गावोगावी भेटी, दुचाकी प्रचार फेऱ्या, सभा, झेंडे, बॅनर, रॅली, नारे, बैठकांसह विविध बाबी निवडणूक प्रचारात असतात.

यामध्ये आणखी एक भर पडली ती सोशल मीडियाची. कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जिवाचे रान करतात. या काळात सर्वच बाबी बाजूला सारून केवळ प्रचारासाठी वाहुन घेणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात प्रचंड उत्साही असतात. इतरवेळी कार्यकर्त्यांना फारसे महत्व नसते. मात्र निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते नेत्यांच्या गळ्यातील ताईत असतात. प्रचार काळातच नेते मंडळीकडून कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाते. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय ठेवली जाते. प्रचाराचा काळ कार्यकर्त्यांसाठी उत्सवाचाच काळ असतो.

यंदाचा हा उत्सव काळ अवघ्या 12 दिवसांचा आहे. अल्पकालावधीत सर्व गावांमध्ये पोहचणे, प्रचाराचे नियोजन, सभा, रॅली, नाराजांची मनधरणी, मोठ्या नेत्यांच्या सभा असे सर्व नियोजन करून दहा ते अकरा दिवसांत प्रचार पूर्ण करण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. त्यातच प्रचार रथ, भोंगा, विविध ठिकाणी लावावयाचे बॅनर, सभा, परवानगी, प्रचार साहित्याचे नियोजन, सोशल मीडियावर प्रचाराचे प्रमाणपत्र यासह इतरही बाबींची पूर्तता करावी लागते.

पाथर्डी – शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील पाथर्डी तालुका जसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला तसा तो भाजपचा हक्‍काचा तालुका देखील आहे. राजळेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता तालुक्‍यात कॉंग्रेस औषधालाही उरली नाही. त्यामुळे तालुक्‍याचे भगवेकरण झाले आहे. मुंडेंचा प्रभाव असलेल्या या तालुक्‍यात आता विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी वाढल्याने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी डोकेदुखी वाढली आहे. आ. राजळे यांनी इच्छुकांची समजूत अद्यापही वाढली नाही.पण त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यामार्फत वाढता विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तालुक्‍यातून विरोधी पक्षाचा उमेदवार व इच्छुकांकडून होणारी बंडाखोरीमुळे मतविभाजणाचा धोका काही टळला नाही.

मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पारंपारीक लढत होणार असल्याचे चित्र असले तरी बहुतेक इच्छुकांना भाजपच्या उमेदवारीची आस लागली आहे. बहुजन वंचित आघाडी वगळता इतर पक्षांना भाजपच्या उमेदवारीची आस लागली आहे. ती मिळाली नाही तर ते बंडाचा झेंडा हाता घेण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जनशक्ती विचार मंच्यानेही निवडणूक रिंगणात उडी घेतल्यास बहुरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत. विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा एक दिवस उलटून गेला तरी बहुजन वंचित आघाडी वगळता कुठल्याही पक्षाने अधिकृत उमेदवार घोषित केलेले नाहीत.

संगमनेर – प्रत्येक निवडणुकीत राजकीय नेते विकासाचा दावा करताय मात्र प्रत्यक्षात विकास होत नसल्याचं दिसून येते. अकोले तालुक्‍यातील पेमरेवाडी गावाची अवस्था तशी आहे. अनेक वेळा मागणी करूनही हाती फक्त निराशाच. डोंगराळ भागातील पेमरेवाडीच्या ग्रामस्थांनी गावाकडे येणारा रस्ता पक्का करुन मिळावा, ही मागणी पुर्ण होत नसल्याने आता आपला लोकशाहीतील मतदानाचा हक्कच न बजावण्याचा निर्णय घेतला आहे.

संगमनेर तालुक्‍यातील काही गावे अकोले मतदारसंघाला जोडली गेली आहेत. पेमरेवाडी हे गाव तसं संगमनेर तालुक्‍यात प्रत्यक्ष शासकीय कामासाठी संगमनेरात यावं लागतं मात्र त्या गावचा आमदार हा अकोले तालुक्‍यात. त्यामुळे गावचा विकास खुंटला असल्याचा प्रत्यय ग्रामस्थांना येतोय. संगमनेरपासून 45 किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावांतर्गत पेमरेवाडी असून या वाडीची लोकसंख्या जवळपास तीनशे ते चारशे आहे. पेमरेवाडी अकोले विधानसभा मतदारसंघात येते. माजीमंत्री मधुकर पिचड आणि आता आमदार वैभव पिचड या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही अतिदुर्गम, उंच डोंगरावर असलेली पेमरेवाडी आजही विकासापासून कोसोदूर आहे. रस्ते, पाणी या मूलभूत गरजा पुर्णता पुरविल्या गेलेल्या नाहीत. गावाला जाण्यासाठी बोटा ते पेमरेवाडी हे पंधरा ते वीस किलोमीटरचा वळसा घालुन जावे लागते.

त्यात रस्ता डांबरी नसल्याने चिखलातून कसरत करावी लागते. हा रस्ता दुरुस्त करुन मिळावा तसेच गावापासुन अवघ्या पाच किलो मीटर अंतरावरुन आता नाशिक पुणे महामार्ग गेल्याने हा रस्ता करुन मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातल्याने येथे शुन्य टक्के मतदान झाले होते, मात्र त्या नंतरही या ग्रामस्थाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल जात असल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरही बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे कुणाला आमचा कळवळा वाटतोय का असा प्रश्न नागरिकांना पडलाय.

नगर – कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली असली, तरी जागा वाटप अद्यापही जाहीर झालेले नाही. अर्थात युतीच्या यादीची प्रतीक्षा असल्याने आघाडीकडून जागा वाटप व उमेदवार जाहीर करण्यास उशीर होत आहे. जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादी 12 पैकी 9 मतदारसंघ लढणार असल्याचा दावा करीत आहे. परंतु प्रत्यक्षात कर्जत-जामखेड व पारनेर हे दोन मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात उमेदवार कोण असा प्रश्‍न पडतो. उर्वरित सात मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवारांचा वानवाच दिसून येत असून उमेदवारांचा शोध घेण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. ज्या मतदारसंघात उमेदवार आहे ते अद्यापही उमेदवारी करण्याच्या मानसिकतेत नाही. ते अजूनही कुंपणावर असल्याने राष्ट्रवादीची अवस्था असून अडचण नसुन खोंळबा अशी झाली आहे.

जिल्ह्यात भाजप व शिवसेनेचे वाढते प्रस्त पाहता आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकेकाळी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात आज दोन्ही कॉंग्रेसला बारा जागांवर उमेदवार देण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. त्यात संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी हे तीन मतदारासंघ कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता आहे. उर्वरित 9 मतदारासंघ राष्ट्रवादी लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण या मतदारसंघ उमेदवार कोण असली हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते अजूनही शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असून आघाडीची उमेदवारी न करण्याच्या मानसिकतेत आहे. पर्याय मिळाला नाही तर आघाडीच्या उमेदवारीचा विचार करण्यात येण्याची सध्या तरी स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे सध्या तरी उमेदवारांचा वानवाच दिसून येत आहे.
जामखेड: पाच दिवसांपूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत तालुक्यातील शेगूडवाडी येथे पुन्हा भाजपात प्रवेश केला. दरम्यान पालकमंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला असल्याचं बोललं जातंय.
सोमवार दि. २३ रोजी कर्जत येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्धार मेळाव्यात जामखेड पंचायत समितीचे विद्यमान सभापती सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी सभापती सुभाष आव्हाड यांनी भाजपमध्ये घुसमट होत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर चार दिवसानंतर सुभाष आव्हाड यांनी कर्जत तालुक्यातील शेगूडवाडी येथील कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, कर्जत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जामखेड भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, जिल्हा सरचिटणीस मनोज कुलकर्णी, कर्जत भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी सभापती भगवान मुरूमकर, सरपंच प्रशांंत शिंदे. ज्योती क्रांती संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, पणन संचालक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अजय काशीद यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

नगर – राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असतांनाही आमदार अरूण जगताप व त्यांचे सुपुत्र आमदार संग्राम जगताप यांनी त्याबद्दल कोणतीही क्रिया – प्रतिक्रिया व्यक्‍त न केल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्याचा अर्थात अजूनही आमदार जगताप पिता-पुत्रांना राष्ट्रवादीचे वावटे असल्याचे दिसून येत आहे. आ. संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीतच राहणार असून मीच पक्षाचा उमेदवार असल्याचे यापूर्वी वारंवार स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात मात्र कृती वेगळीच होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नवा चेहरा शोधण्यास सुरवात केली असून बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी शहरातील काही मान्यवरांशी गुप्तपणे चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आ. संग्राम जगताप यांनी उसंत न घेता जोरदार प्रचार केला. त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवार देखील गॅसवर ठेवला होता. शेवटच्या क्षणापर्यंत आ. जगताप यांनी चांगल्या पद्धतीने लढत दिली होती. पण निकाल जाहीर झाल्यानंतर आ.जगताप यांनी पराभव देखील पचवला. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणेच बदलली. लोकसभेला शिवसेना व भाजप युतीला मिळालेल्या यशामुळे पुन्हा राज्यातही युतीची सत्ता येणार असेच चित्र निर्माण झाले. त्यामुळे राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुरू झालेली पडझड अद्यापही थांबली नाही.

जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे तीनही आमदार युतीच्या संपर्क असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यात अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आ. संग्राम जगताप व श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्याही प्रवेशाची चर्चा होती. परंतु खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आ. संग्राम जगताप कोठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही दिवस या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पण त्यानंतर पुन्हा आ. संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली.

आ. जगताप यांच्या या शिवसेना प्रवेशाला नगर शहरातील शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवून येथे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यात दरम्यान, शिवसेनेतील काही इच्छुकांनी देखील ठाकरे यांची भेट घेवून राठोड यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे पुन्हा शिवसेना प्रवेशाची चर्चा देखील थांबली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी पत्रकार परिषदे घेवून आ. जगताप यांच्याबद्दल सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला अर्थ नसल्याचे स्पष्ट करून ते राष्ट्रवादीतच राहणार असून ते पक्षाचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले होते. त्याबरोबर आ. जगताप यांनी देखील पक्षांतराच्या विषयाला नसल्याचे स्पष्ट केले. अर्थात एवढे स्पष्टीकरण देवून देखील आमदार जगताप पिता-पुत्रांकडून कृती मात्र वेगळीच होतांना दिसत आहे.

नगर: दि. 27 सप्‍टेंबर 2019 रोजी रात्री 10 वाजता जिल्‍हयातून वाहणा-या गोदावरी नदीत नाशिक जिल्‍हयातील नांदूरमधमेश्‍वर बंधा-यांतून 19.943 क्‍युसेस,. भिमा नदीस दौड पुल येथे 25.251 क्‍युसेस ,. घोड धरणातून घोड नदीत 5 हजार 100 क्‍युसेस तसेच भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात 814 क्‍युसेस , निळवंडे प्रवरा नदी पात्रात 2 हजार 338 क्‍युसेस तर ओझर बंधा-यातून प्रवरा नदीत 4 हजार 431 क्‍युसेस, मुळा धरणातून मुळा नदीपात्रामध्‍ये 1 हजार क्‍युसेस पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रामध्‍ये पाऊस झाल्‍यास ध्‍रणाच्‍या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्‍याची शक्‍यता आहे.

आगामी काळात अहमदनगर तसेच नशिक व पुणे जिल्‍हयात पावसामुळे वा धरणातून सोडण्‍यात आलेल्‍या विसर्गात वाढ झाल्‍यास जिल्‍हयातून वाहणा-या प्रवरा गोदावरी, भिमा घोड, कुकडी या नदयांच्‍या पाणीपातळीत वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. जिल्‍हा प्रशासनातर्फे जिल्‍हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्‍यात येते की, स्‍थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे, तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रापासुन दुर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे.

तसेच नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पुर पाहण्‍यासाठी गर्दी करु नये. जुन्‍या / मोडकळीस आलेल्‍या इमारतीमध्‍ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्‍टीमुळे भूसख्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहण्‍या-या लोकांनी दक्षता घ्‍यावी वेळीच सुरक्षीत स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्‍ये, पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये उतरु नये. अचानक नदीच्‍या पाणीपातळीत वाढ झाल्‍यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये व धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये.मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरु आहे. त्यातच गुरुवारी दिल्लीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये युतीबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता मुंबईतही वेगवान हालचाली घडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी, उद्या (28 सप्टेंबर) शिवसेनेची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यावेळी उद्धव ठाकरे राज्यातील पदाधिकारी आणि इच्छुकांशी संवाद साधतील.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उद्या सकाळी 11 वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार असून यासाठी दोन्ही पक्षांचे नेते आशावादी असताना उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील मार्गदर्शनाकडे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे. युती आणि जागा वाटपाच्या फार्म्युलावर अजून अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. मात्र, घटस्थापनेच्या मुहूर्तावर युती आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी होण्याच्या शक्‍यतेने “डॅमेज कंट्रोल’साठी पक्ष नेतृत्वावे खबरदारी म्हणून ही बैठक बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे. कारण, युतीत निवडणूक लढवताना पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या मर्यादित जागांवर उमेदवारी देताना पक्षनेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील अन्य तीन संस्थांनाही सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2017-18’ प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे राज्य, संस्था व व्यक्तींना विविध श्रेणीत सन्मानित करण्यात आले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी आणि जागतिक पर्यटन संस्थेचे महासचिव झुराब पोलोलीकाशवीली यावेळी मंचावर उपस्थित होते. 

विमानतळांच्या श्रेणीत देशातील दोन विमानतळांना सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला उच्च दर्जाच्या पर्यटक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विमानतळाच्या एरो कमर्शियल विभागाचे उप महाव्यवस्थापक आदित्य पंसारी आणि सहायक महाव्यवस्थापक तन्वीर मौलवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

एकाच धावपट्टीवर 1004 हवाई उड्डाणाचा आपलाच विक्रम मोडीत काढणारे हे जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरले आहे. पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविणाऱ्या या विमानतळाने ताश्कंद, मँचेस्टर, फुकेट ,ग्वाँगझोवू , माले आणि दारेसलाम आदी शहरांसाठी नवीन उड्डाण सेवा सुरु केली आहे.

नाशिक व मुंबई येथील हॉटेल्सचाही सन्मान

नाशिक शहरातील ‘एक्सप्रेस इन हॉटेल’ हे देशातील सर्वोत्कृष्ट तीन तारांकित हॉटेल ठरले आहे. आधुनिकतेसह पारंपरिक वास्तुशैलीचा उत्तम नमुना असलेले हे हॉटेल पर्यटक व अतिथींना उत्तम सुविधा देणारे हॉटेल ठरले आहे.

मुंबई येथील ‘द ललित हॉटेल’ हे वैविध्यपूर्ण बैठक व्यवस्था पुरविणारे देशातील सर्वोत्तम हॉटेल ठरले आहे. छोटेखानी बैठकीपासून , लग्न समारंभ, व्यावसायिक संमलेन आयोजनासाठी या हॉटेलने पुरविलेल्या वैविध्यपूर्ण सेवांची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.

ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात अग्रणी असलेल्या मुंबई येथील ‘कल्चर आंगन’ या संस्थेला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन प्रकल्पाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘कल्चर आंगन’ ही संस्था स्थानिक लोकांच्या मदतीने ग्रामीण भागात कृषी पर्यटन क्षेत्र विकसित करीत असून महाराष्ट्रासह, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातही प्रकल्प राबवित आहे.

मुंबई- अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्झ तसेच पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे स्वतंत्रपणे सदिच्छा भेट घेतली.

अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत या नात्याने भारत व अमेरिकेतील विविध क्षेत्रातील संबंध सुदृढ करताना व्यापार व गुंतवणूक वाढविण्याबद्दल आपण विशेष प्रयत्नशील असल्याचे डेव्हीड रॅन्झ यांनी राज्यपालांना सांगितले.

भारतातील दोन लाख विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत असून ही संख्या अधिक वाढावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अलिकडेच झालेल्या भेटीमुळे उभय देशांमधील संबंध अधिक मजबूत झाले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
भारत-पोलंड थेट विमानसेवा सुरु होणार

पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी देखील शुक्रवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

भारत आणि पोलंडदरम्यान थेट विमानसेवा सुरु झाल्यास उभय देशातील प्रवासाला लागणारा वेळ कमी होऊन व्यापार, उद्योग व पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे भारतातून पोलंडला थेट विमानसेवा सुरु करण्याबद्दल प्रयत्न सुरु असल्याचे डेमियन ईरझॅक यांनी सांगितले.

दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंडमधील अनेक निर्वासित मुले भारतात आली होती व कोल्हापूर येथे त्यांना राजाश्रय मिळाला होता, असे डेमियन ईरझॅक यांनी सांगितले. येथे राहून गेलेल्या लोकांपैकी काही लोक आज नव्वदीपार झाले आहेत. त्यांच्यासाठी कोल्हापूर स्वर्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातून युरोपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे, परंतु पोलंडला फार कमी पर्यटक येतात असे सांगून ही संख्या वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई : ‘पर्यटन आणि त्यातून रोजगार निर्मिती’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. राज्यात पर्यटनातून रोजगार निर्मितीला वाव असल्याचे मंत्रालयात आज झालेल्या जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमात सांगण्यात आले.
यावेळी पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक रवींद्र राजपूत, पर्यटन विभागाचे अवर सचिव रमेश कदम, ठाण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील पर्यटन पदविका शाखेचे प्राचार्य अरविंद महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

‘पर्यटन व प्रवास व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना अरविंद महाजन म्हणाले की, युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायजेशनची स्थापना २७ सप्टेंबर १९७० रोजी झाली. त्यानंतर १९८० पासून २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. पर्यटन क्षेत्रात दर्जेदार शैक्षणिक अभ्यासक्रम तयार होत आहेत. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. पर्यटन हे असे क्षेत्र आहे जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगाराची संधी उपलब्ध करते. क्रुझ टुरिझम, हेरीडेज टुरिझम, ॲग्रो टुरिझम यांना खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर म्हणाले की, महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे पर्यटकांची राज्याला प्रथम पसंती असते. राज्यात पर्यटक सर्व प्रकारच्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. राज्यात जंगले, वन्यजीव, समुद्रकिनारे, गडकिल्ले, पुरातन गुफा, वास्तू, तिर्थक्षेत्रे, थंड हवेची ठिकाणे तर आहेतच, पण त्याचबरोबर बॉलिवूड टुरिझम, मुंबईसारख्या महानगरांमधील टुरिझम, क्रुझ टुरिझम, ॲग्रो टुरिझम, हेरीटेज टुरिझम, एक्सपीरीएन्शिअल टुरिझम अशा विविध पर्यटन क्षेत्रास वाव आहे, असे त्यांनी सांगितले.

नगर – काबाडकष्ट करणाऱ्या, स्वतःसाठी न जगणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माऊली साठी त्यांचे प्रश्‍न व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माऊली संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रत्येकाच्या घराघरांमध्ये पोहोचलो आहे. याचे सर्व श्रेय तुमचे आहे, चांगला विचार करायचं, हसत-खेळत जीवन जगायचं, आदेश भाऊजींनी जसा विश्‍वासाला तडा जाऊ दिला नाही, असा विश्‍वास होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनी आज माऊली मेळाव्यामध्ये केले. सुमारे दोन तास हा माऊली संवाद पार पडला.

दिल्लीगेट येथील पटांगणामध्ये माऊली संवाद आयोजन करण्यात आले होते, यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवा सेनेचे संपर्कप्रमुख रुपेश पाटील, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख अश्‍विनी मते, शहर प्रमुख दिलीप सातपुते, यांच्यासह नगरसेवक तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबळकर, युवासेनेचे युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड यांच्यासह नगरसेवक नगरसेविका, युवासेना, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. माऊली संवादाचा हा चौथा टप्पा सुरू झालेला आहे. माऊली संवादांमध्ये प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम झाला. यामध्ये ज्योती गोयल, संध्या सातारकर, विद्या सैंदाणे, गौरी भुसा, ज्योती मुसळे, स्वाती लगड आदींनी प्रश्‍न विचारले.

अहमदनगर : नगर- दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद जवळ ट्रक-कार भीषण अपघात चौघे ठार झाल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली .

नगर -दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक (एमपी 09 एच एच 8378) व कार (एम एच 04 BY 4857) यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांचा चुलत भाचा तर महेश झोडगे यांचा सख्खा भाचा यासह भिंगारचे दोन व वाळकीचा एक जण असल्याचे समजते.श्रीगोंदयाहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. कार्ले यांच्यासह सरपंच दीपक साळवे, शरद चोभे, मिनीनाथ चोभे, राघू चोभे, मणेश भोसले व ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. अपघातात भिंगारचे तिघे जागीच ठार झाल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे.

जामखेड –  दि 25 रोजी जामखेड शहरात झालेल्या पावसामुळे खर्डा रोडवरील लक्ष्मीआई चौकातील वीज वाहिन्यावर झाडांची फांदी पडल्याने तारा तुटल्याने शहर आज पुर्ण दिवस अंधारात असून महावितरणाचे कर्मचारीही फोन उचलत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे रात्री उशिरा पर्यंत काम सुरू असुनही अध्याप लाईट बंद आहे

बुधवार दि 25 रात्री शहरात अल्पच पावसाने हजेरी लावल्याने शहरातील खर्डा चौकातील लक्ष्मीआई चौकात वीजपुरवठा करणा-या वाहिनीवर झाडांची फांदी पडल्याने मोठा बिघाड झाला. त्यानंतर वीजपुरवठा खंडीत झाल्याने बत्ती गुल झाली. त्यामुळे परीसरासह अनेक ठिकाणी गेल्या 22 तासापासून वाज पुरवठा खंडीत आहे.

यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. काम सुरू असल्याचे वीज कंपनीकडून धातुरमातुर उत्तर देण्यात येत आहे झालेला बिघाड व त्याच्या दुरुस्तीसाठी रात्री उशीरापर्यत महावितरणचे कर्मचारी काम करत होते. बिघाडाची दुरुस्ती झाल्यानंतर उशीरा वीजपुरवठा सुरळित सुरु करण्यात येणार असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता कासलीवाल यांनी सांगितले

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल गुरूवारी दुसऱ्यांदा जम्मू आणि काश्‍मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरमध्ये दाखल झालेत. श्रीनगरमध्ये कलम 370 हटवल्यानंतरच्या स्थितीवर ते सुरक्षा दल आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करतील. दुसरीकडे जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी अजित डोवाल यांना जम्मू काश्‍मीरच्या दौऱ्यावरून टोमणा मारला आहे.

मेहबूबा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, गेल्यावेळी फोटो सेशनदरम्यान मेन्यूमध्ये बिर्याणी होती. यावेळी मेन्यूमध्ये हलीम असेल? गेल्या वेळी जेव्हा अजित डोवाल काश्‍मीरला गेले होते. त्यावेळी ते स्थानिक लोकांसोबत जेवण जेवले होते.
जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर डोवाल बुधवारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले.

केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जाचे देणार कलम 370 रद्द करण आणि राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्याच्या निर्णयाची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर डोवाल 11 दिवस खोऱ्यात थांबले होते. दहशतवाद प्रभावित शोपियान आणि श्रीनगरच्या भागांचा दौरा केला आणि यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयानंतर कोणताही हिंसाचार होणार नाही याची काळजी घेतली.

दरम्यान या दौऱ्याच्या वेळी डोवाल खोऱ्यात किती दिवसांपर्यंत थांबणार आहेत याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. डोवाल यांनी आपल्या पहिल्या दौऱ्यात जम्मू काश्‍मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांना वेगवेगळे संबोधित केले होते. प्रभावित भागांमध्ये त्यांचे यश अधोरेखित करत त्यांनी देश आणि नागरिकांचे संरक्षण सुनिश्‍चित करण्यासाठी आपल्या भूमिकेचे महत्त्व सांगितल. एनएसए नियंत्रण रेषेवरील परिस्थितीवर सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये सुसूत्र समन्वय साधण्यासाठी सतत नजर ठेवून आहे.


उद्धव ठाकरेंच्या प्रत्युत्तराने उपस्थितांमध्ये हशा

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माथाडी कामगार नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या घरी भोजनाचा कार्यक्रम होता. त्यामुळे सर्व नेते नरेंद्र पाटील यांच्या घरी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलेल्या एका प्रश्नावर उद्धव यांनी मिश्‍कीलपणे उत्तर दिले. या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना भाजप युतीची घोषणा कधी होणार? याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. याबाबत राज्यभरात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही युती पितृपक्षामुळे रखडली असल्याची चर्चा आहे. या युतीच्या घोषणेवरुन मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांना एक प्रश्न विचारला होता. त्यावरील उद्धव यांचे उत्तर सरकॅझमची (sarcasm) उच्च पातळी गाठणारा असल्याचे बोलले जात आहे.

नरेंद्र पाटील यांच्या घरी जेवण झाल्यानंतर उद्धव ठाकरे हात धुवायला गेले. तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना गमतीने विचारले, उध्दवजी पितृपक्षाची काही अडचण नाही ना? त्यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्‍कीलपणे उत्तर दिले. “देवेंद्रजी मुळात आमचा पक्ष हा “पितृ’पक्ष आहे, उद्धव यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर जेवणाच्या हॉलमध्ये एकच हशा पिकला.
उद्धव ठाकरे यांच्या या उत्तराचे दोन अर्थ काढले जात आहेत.

पहिला अर्थ म्हणजे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी स्थापन केला आहे. म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेला पितृपक्ष म्हणाले असावेत. तर दुसरा अर्थ म्हणजे शिवसेना-भाजपच्या युतीत शिवसेना हा पक्ष पित्यासमान आहे, असे उद्धव ठाकरे यांना सुचवायचे होते.

सध्या शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाची जोरदार चर्चा सुरु आहे. एकावर एक फॉर्म्युले सांगितले जात आहेत, त्यात युतीची घोषणा पितृपक्षामुळे रखडल्याची चर्चा असताना उद्धव ठाकरेंनी हा विनोद केला.
इस्लामाबाद – दहशतवादाला आम्ही पाठींबा देत नाही असे म्हणनाऱ्या पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईदच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव घेतली आहे.

मुंबई हल्ल्याचा सुत्रधार व जागतिक दहशतवादी हाफिज सईदला कुटुंबाच्या मासिक खर्चासाठी त्याच्या बॅंक खात्याचा वापर करु दिला जावा, अशी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानची ही मान्य करत जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला त्याच्या बॅंक खात्याचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पाकिस्तानची ही मागणी मान्य करण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून निश्‍चित करण्यात आलेल्या कालवधी दरम्यान कोणतीही दहशतवादी कारवाई घडली नव्हती. 15 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, हाफिज सईद, हाजी मोहम्मद अशरफ आणि जफर इकबाल यांना त्यांच्या सामान्य खर्चासाठी बॅंक खात्यांचा वापर करण्यास परवानगी दिली जात आहे. 15 ऑगस्टपर्यंत या दहशतवाद्यांकडून घातपात घडवला जाण्याची शक्‍यता होती.

पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेस पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले होते की, हाफिज सईदच्या कुटुंबात चार सदस्य आहेत व त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या खाण्या पिण्यासह कपडे आदींची व्यवस्था त्यालाच करावी लागते, त्यामुळे त्याला बॅंक खात्याचा वापर करण्याची परवानगी दिली जावी. हाफिजचे बॅंक खाते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार पाकिस्तानला बंद करावे लागले होते. यानंतर आता त्याचे बॅंक खाते पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
पारनेर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुधामती कवाद यांनी तालुकाध्यक्षपदाचा व पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्या लवकरच शिवसेनेत जाण्याची शक्‍यता आहे. मागील पाच वर्षांपासून त्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष म्हणून सक्रियपणे काम करीत होत्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्या म्हणून त्यांची पक्षात ओळख होती.
नुकताच झावरे यांनी पारनेर येथे घेतलेल्या मेळाव्यास त्या अनुपस्थितीत होत्या. मात्र त्यांनी मागील आठ दिवसांपासूनच विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून शिवसेनेत जाण्याचे संकेत दिले होते.

मागील दहा वर्षांपासून त्या समाजकारणाच्या माध्यमातून निघोज ग्रामीण संस्थापरिवाराचे संस्थापक मार्गदर्शक स्व. बाबासाहेब कवाद व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होत्या. मागील चार वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कवाद मोठ्या मताधिक्‍याने निवडून आल्या. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना मोठ्या प्रमाणात विकासकामे त्यांनी केली आहेत. निघोज, आळकुटी जिल्हा परिषद गटात त्यांनी महिलांचे चांगले संघटन उभारले आहे. गाव व परिसरात विकासकामे झाली पाहिजेत, या मानसिकतेतून त्या लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा दुजोरा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
नगर – महानगरपालिकेने 2017-18 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील अनेक गणेश मंडळांकडून अनामत रक्कम घेतली होती. ती रक्कम अद्यापही या मंडळांना परत दिली केलेली नाही. त्यामुळे महापालिका ही रक्कम संबंधित मंडळांना परत करणार का? असा प्रश्‍न मंडळांकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्या एक-दोन वर्षापूर्वी महानगरपालिकेने शहरातील अंदाजे 300 मंडळांकडून मंडप उभारणी नुसार अनामत रक्कम घेतली होती. व ती रक्कम गणेश विसर्जना नंतर रक्कम मंडळांना देण्यात येणार होती. मात्र, अद्यापही या मंडळांना ही रक्कम देण्यात आली नाही. मंडप परवानगी देत्यावेळेस ही रक्कम संबधित मंडळांकडून घेतली. मात्र, महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये लेखाशिर्षक नुसून महासभेत कोणतेही मंडप धोरण ठरविण्यात आले नव्हते. त्यामुळे महानगरपालिकेने ही रक्कम संबंधित मंडळाना परत करावी अशी मागणी होत आहे.
नगर – बारा वर्षांच्या मुलीसोबत अश्‍लील चाळे करणाऱ्या पित्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीनेच पतीविरोधात पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्या हद्दीत रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भिंगार पोलिसात विकृत पित्याविरोधात बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दाम्पत्याला एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्य आहेत. रविवारी रात्री हा विकृत पिता घरी आला. अंगावरील शर्ट काढून त्याने मुलगा आणि मुलगी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर त्याने मुलीला उचलून दुसऱ्या खोलीत नेले.

मुंबई : पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत महापुराने बाधित क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार छायाचित्रासह ओळखपत्र विनाशुल्क देण्याची कार्यवाही केली जाईल.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला होता. या महापुरात या दोन जिल्ह्यातील गावे बाधित झाली होती. या महापुरात या दोन जिल्ह्यातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाचे दस्तऐवज यांचे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी या दोन जिल्ह्यातील नागरिकांना आता बदली मतदार ओळखपत्रे पुरविण्यात येणार आहेत.मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार होते तर आता 31 ऑगस्टपर्यंत 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 एवढी मतदार नोंदणी झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै-ऑगस्ट 2019 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला. सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले.

मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 4 कोटी 57 लाख 02 हजार 579 पुरुष मतदार व 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदारयादीमध्ये पुरुष मतदारामध्ये दहा लाख 35 हजार 262 नव्या पुरुष मतदारांची वाढ होऊन ती 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 एवढी झाली आहे. तर महिला मतदारांमध्ये 10 लाख 79 हजार 958 एवढी वाढ होऊन ती आता 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी 2 हजार 86 तृतीयपंथी मतदार होते त्यामध्ये 507 मतदार वाढून ते आता 2 हजार 593 एवढे झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बापु साळुंखे यांनाही प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने येथील विज्ञान भवनात सुरु असलेल्या 6 व्या राष्ट्रीय जल सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारांचे’ वितरण करण्यात आले. जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया आणि विभागाचे सचिव यू.पी.सिंह, राष्ट्रीय जल अभियानाचे संचालक जी. अशोक कुमार यावेळी मंचावर उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या वतीने वर्ष 2011 पासून देशभर ‘राष्ट्रीय जल अभियान’ राबविण्यात येते. यावर्षी प्रथमच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे विविध राज्यांचे विभाग, खाजगी क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय जल अभियानाअंतर्गत ठरवून देण्यात आलेल्या 5 उद्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण 9 श्रेणींमध्ये 23 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

गोदावरी खोरे आणि उपखोरे अंतर्गत येणाऱ्या धरणांच्या पाण्याचे एकात्मिक जल व्यवस्थापन करून जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन श्रेणी अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

उपलब्ध पाण्याचा प्रभावी उपयोग करून जलव्यवस्थापन व जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या वडनेर (भैरव) येथील शेतकरी बापु साळुंखे यांना शेतकऱ्यांच्या श्रेणीत प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. 2 लाख रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी श्री. साळुंखे यांच्या मालकीच्या एकूण 25 एकर शेतीतील केवळ 2 एकर शेतीलाच पाणी उपलब्ध होते. मात्र, या स्थितीवर मात करण्यासाठी वर्ष 2004 पासून सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा प्रभावी अवलंब करून श्री. सांळुखे यांनी आपली 25 एकर शेती ओलिताखाली आणली असून या जमिनीवर ते द्राक्ष उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारासाठी घेण्यात आली.
नवी दिल्ली : राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी आज मुंबई विद्यापीठाचे किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी सचिन ढोले यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनएसएस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘वर्ष 2017-18 च्या एनएसएस’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात देशातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण 10 महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई येथील किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता बागला यांना चषक आणि 1 लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर याच महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश कोलते यांना 70 हजार रूपये , रजत पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण 29 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शाखेचा विद्यार्थी सचिन ढोले हा महाराष्ट्रातून सर्वोत्तम एनएसएस विद्यार्थी ठरला असून त्याला 50 हजार रूपये , रजतपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर व उपनगरातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मुंबईची मतदान टक्केवारी वाढवावी, असे संयुक्त आवाहन मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी व्ही सिटीजन ॲक्शन नेटवर्क तसेच जयहिंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रमात मतदारांशी संवाद साधताना केले.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया परिसरातील यॉट क्लब येथे आयोजित या कार्यक्रमास व्ही सिटीजन ॲक्शन नेटवर्क या संस्थेचे विश्वस्त तथा राज्याचे माजी मुख्य सचिव व्ही.रंगनाथन, अध्यक्षा श्रीमती इंद्राणी मलकानी, निवडणूक दिव्यांग सदिच्छादूत निलेश सिंगीत तसेच मुंबई शहरच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती फरोग मुकादम व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री.जोंधळे यांनी उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ दिली तसेच त्यांनी मुंबई शहरातील मतदान सुविधा व इतर अनुषंगिक माहिती देऊन नवमतदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन निवडणूक टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी मतदान केंद्र प्रथम, द्वितीय मजल्यावरुन तळमजल्यावर स्थलांतरित केल्याचे सांगितले. पीडब्ल्यूडी व सी व्हीजील ॲपबाबतही सविस्तर माहिती दिली.

निर्भय, नि:पक्ष व पारदर्शी वातावरणात मुंबई उपनगर जिल्ह्यात निवडणूक संपन्न होत असून यावेळी मतदान टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री.बोरीकर यांनी व्यक्त केली. देशातील जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा असलेला हा जिल्हा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणूक अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेची सविस्तर माहिती दिली. 1999 ला मतदान अधिकारी ते 2019 ला जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवास आपण केला असल्याने निवडणूक प्रक्रियेतील सर्व घटकांच्या संदर्भात सहानुभूती असल्याचे श्री.बोरीकर यांनी सांगितले.


श्रीमती मुकादम यांनी दिव्यांग तसेच पीडब्ल्यूडी मतदारांसाठी कोणत्या सुविधा राबविण्यात येत आहे याची सविस्तर माहिती देऊन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत कसे पाहावे याची तांत्रिक माहिती दिली. तसेच व्हीव्हीपॅट संदर्भातील प्रात्यक्षिक देखील करण्यात आले. सदिच्छादूत श्री.सिंगीत यांनी राज्यातील तसेच मुंबईतील मतदान केंद्रे जास्तीत जास्त तळमजल्यावर आणल्याबद्दल निवडणूक यंत्रणेचे मन:पूर्वक आभार मानून आनंद व्यक्त केला. दिव्यांगांना मदत करणाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे, असेही त्यांनी सूचित केले.


यानंतर झालेल्या समक्ष व ऑनलाईन प्रश्नोत्तराच्या वेळी बोगस मतदान, मतदान ओळखपत्र, हौसिंग सोसायट्यांची जबाबदारी, निवडणूक यंत्रणा जबाबदारी, ईव्हीएम संदर्भातील प्रश्न, उपप्रश्न आदींबाबत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जिल्हाधिकारी द्वयांनी यावेळी दिली.


या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, मुंबई शहरचे निवडणूक तहसिलदार श्री.सावंत, मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
नगर – जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्यावर असलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले. नगर येथे हजर झाल्यापासून मुलींच्या चेंजींग रूममध्ये संसार थाटलेल्या नावंदे यांनी रुम खाली करण्याबाबत विनंती, तक्रार करूनही चेंजींग रूम सोडला नव्हता. शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविलेले असताना नव्याने हजर झालेले जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतांन यांनी नावंदे यांना नोटीस देऊन पंधरा दिवस झाले तरी त्यांनी चेंजींग रूम अद्याप सोडलेला नाही.

शुक्रवारी कविता नावंदे आपल्या पतीराजासह चेंजींग रूममध्ये मुक्कामी होत्या.शासनाच्या अधिकाऱ्याने वैयक्तिक वापरासाठी अनाधिकृत बळकावलेले मुलींचे चेंजींग रूम खाली करण्याची नोटीस असतानाही चेंजींग रूम न सोडणे ही शासनविरोधी कृती आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी संतांन पुणे येथे असताना ऑफिसचा ताबा नावंदे यांच्या मार्फत घेतला जातो. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी क्रीडा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्हा क्रीडा संकुलाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून स्वतःच्या निवासस्थानी सीसीटीव्ही कॅमेरे नावंदे त्यांनी बसवून घेतले होते. सिस्टीम वाय-फाय असल्याने कार्यालयातील हालचाली नावंदे स्वतःच्या मोबाईलवर पाहू शकत होत्या. तसेच त्यांच्या कार्यकाळात नेमलेले कर्मचारी आजही ऑफिस मधील सर्व घडामोडींची इत्यंभूत माहिती नित्यनेमाने नावंदे यांना पुरवित असल्याने सरकारी कामकाजाची माहिती बाहेर पोहचत असल्याने या सर्व लोकांना कार्यमूक्त करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सुनील जाधव, एल.बी. म्हस्के, शैलेश गवळी, संजय साठे, संजय वालेकर आदींनी दिली आहे.
कोपरगाव – कोपरगाव शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते. 15 दिवस ते 21 दिवसांनी पिण्यासाठी पाणी मिळते. जास्त दिवस साठलेल्या पाण्यामुळे पाणी दूषित होवून रोगराई वाढली असून कोपरगावकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला. लोकप्रतिनिधी म्हणून निळवंडे धरणातील स्वच्छ पाणी बंद पाईपद्वारे कोपरगावकरांना पिण्यासाठी मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असताना कोपरगावच्या काही लोकांनी विरोध करणे हे दुर्दैव आहे. असे मत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्‍त केले.

निळवंडेचे पाणी मिळू नये यामागे मोठे षड्‌यंत्र आहे. पाण्यासारख्या पवित्र आणि पुण्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांना देव सुद्धा माफ करणार नाही. शहरातील लोकांचे मते घेवून योजनेला विरोध करायचे. चालून आलेली पाण्याची सुवर्णसंधी घालवायची ही कूटनीती विरोधकांची आहे. मात्र, जेव्हा निळवंडेची पाणी योजना कोपरगावसाठी पूर्णत्वास येईल तेव्हाच माझी आमदारकी सार्थक झाली असं मी समजेल,असे त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

नेवासे – धार्मिक स्थळांमुळे प्रसिद्ध असलेल्या नेवासे तालुका गेल्या काही महिन्यांपासून राजकीय आखाड्यांमुळे गाजू लागला आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून खालच्यापातळीवर जावून एकमेकांचे तोंड सुख घेण्यात येत आहे.ज्या नेवाश्‍यात ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिली. साक्षात शनिदेव ज्या तालुक्‍यात अवतरले. त्या नेवाश्‍यात आमदार होण्यासाठी एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे.

या अशा राजकीय आखाड्यात आता आजी माजी आमदारपुत्र सक्रिय झाले आहेत. माजी आमदार शंकरराव गडाख यांचे सुपुत्र उदयन व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे चिंरजीव विष्णुप्रसाद हे गेल्या काही वर्ष राजकारणापासून दूर होत. पण यंदाच्या विधानसभेत हे दोन्ही आमदार पुत्रांनी पित्यासाठी राजकारणात एंट्री केल्याने हा नेवाश्‍यात चर्चेचा विषय ठरला आहे.

नेवासे मतदारसंघात आ. मुरकुटे आणि गडाख व सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांच्यातील राजकीय जुगलबंदी गेली पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्व जिल्ह्यात परिचित आहे. गडाखांच्या तालिम तयार झालेले आ. मुरकुटे सध्या गडाख कुटुंबांवर जोरदार टिका करीत आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुरकुटे – गडाख या पाच वर्षातील पारंपरिक विरोधकांची जुगलबंदी संपूर्ण जिल्ह्याने पहिली असून आता आ. मुरकुटे आणि प्रशांत गडाख यांच्यात सुरू झालेली प्रश्न उत्तरांची जुगलबंदी सध्या चांगली चर्चेत आला आहे. यापुढे जुगलबंदीचा हा राजकीय वारसा पुढची पिढी देखील कायम ठेवते की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. कारण गेल्या पाच वर्षापासून किंबहुना त्याहून अधिक काळापासून शंकरराव गडाख यांचे पुत्र उदयन हे राजकारणात सक्रिय झालेले आहेत. गडाख यांनी क्रांतिकारी पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले तर आ. मुरकुटे हे पुन्हा भाजपच्या उमेदवारीसाठी सज्ज झाले.
नगर – विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. पक्ष कार्यालयांसह नेत्यांचे संपर्क कार्यालयांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून, मतदार याद्यांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र समोर आले आहे.

राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी शिवसेना व भाजपमधील युतीचे घोडे अद्यापही गंगेत न्हाले नसल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून येत आहे. आजच्या घडीला सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे लक्ष नेत्यांच्या आदेशाकडे लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, राजकीय मोर्चेबांधणीसाठी विविध पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सरसावले आहेत.आचारसंहिता लागू झाल्यामुळे उमेदवारी अर्ज सादर करण्याची तारीख समजताच भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे.कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते, पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

आघाडी व युतीमध्ये हा घोळ सुरू आहे. अर्थात आघाडीत जागा वाटपाचा फारसा तिढा नाही. पण युतीमध्ये मात्र जागा वाटप हे नेत्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. भाजपकडे कर्जत-जामखेड, शेवगाव- पाथर्डी, नेवासे, कोपरगाव, राहुरी याच पाच मतदारसंघासह श्रीगोंदा, शिर्डी व अकोले हे दोन असे सात मतदारसंघ राहणार असले तरी श्रीगोंदा, कोपरगाव, राहुरी व नेवासे या तीन मतदारसंघात बदल करण्याचा आग्रह होत आहे.

शिवसेनेकडे पारनेर, नगर शहर, संगमनेर, श्रीरामपूर हे चारच मतदारसंघ वाट्याला येत आहे. त्यात शिवसेनेकडून नेवासे, श्रीगोंदा व राहुरी हे तीन मतदारसंघाची मागणी होत आहे. त्यामुळे जागाचा तिढा अद्यापही मिटलेला नाही. आघाडीत कॉंग्रेसने संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, श्रीगोंदा व कर्जत – जामखेड या पाच जागावर दावा केला आहे. त्यात कर्जत-जामखेडची जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाणार आहे. श्रीगोंदा मात्र एखाद्यावेळी कॉंग्रेसकडे जाण्याची शक्‍यता आहे. बाकी उर्वरित सर्व मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.


नगर - ग्राहक सेवा हा बँकासारख्या सेवा संस्थांचा स्थायीभाव आहे. बँकांत काम करणा-या प्रत्येक सेवकाची कार्यालयीन वैयक्तिक शिस्त, नम्र आज्ञाधारपणा, प्रामाणिकपणा बँकेच्या यशात महत्वपूर्ण भूमिका बजावते. चागली ग्राहकसेवा ही कर्मचा-यांच्या शिस्तबध्दता व वागणूक या दोन घटकांवर अवलंबून असते. कोणतेही पद हे सेवेचे असते त्यात वरिष्ठ, कनिष्ठतेला कमी महत्व असते संस्थेवर नितांत प्रेम, निष्ठा श्रध्दा ठेवून अंगीकृत जबाबदारीतून सेवेचा आनंद मिळवावा असे आवाहन सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचे ज्येष्ठ शिपाई श्री. दिलीप गोफ णे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँ्नस असोसिएशनच्या वतीने जिल्हयातील नागरी सहकारी बँकांतील शिपाई सेवकांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. ज्येष्ठ शिपाईचे हस्ते उदघाटन एखाद्या कार्यक्रमास प्रमुख अतिथींना पाचारण करून त्यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने उदघाटन होत असते. या ज्ञानसत्रात उपस्थित शिपाई प्रशिक्षणार्थीमधील अमृतवाहिनी सहकारी बँकेचे ज्येष्ठ शिपाई श्री.दिलीप गोफ णे यांनाही व्यासपीठावर बोलावून त्यांचे हस्ते ज्ञानसत्राचे उदघाटन करण्याची अभिनवकल्पना साकार झाली.

आयुष्यात चढउतार येणारच. कारण तेच माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. आशा व अपेक्षांना कधीच अंत नसतो. कितीही संकटे आली तरी त्यांनी संधी मानून आनंद घेत असतांना हे आहे त्यात समाधान मानले तर सुखप्राप्ती होते. असे सांगून स्वतःचे काम प्रामाणिकपणे करा कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते. कामाला ओझे समजायचे की भाग्य हे महत्वाचे ठरते. दुस-याला बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःला आधी बदला. असे मत पुणे प्रशिक्षण संस्थेचे संचालक श्री. अनिल लटके यांनी व्यक्त केले.

दिवसभर संपन्न झालेल्या या प्रशिक्षण वर्गात शिपाई सेवकांना स्वयंप्रेरणा, आत्मविश्‍वास, जबाबदारी, कर्तव्ये, आर्थिक/ कार्यालयीन/ सामाजिक शिस्त व्य्नितगत सुधारणा, ग्राहक सेवा, अभिलेख जतन राजशिष्टाचार आदि विषयावर सोदाहरण दैनंदिन जीवनातील व कार्यालयीन कामकाजातील घडणा-या घटनांचा परामर्श घेवून विविध खेळ व प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षणार्थीचे प्रबोधन केले. व प्रश्‍नोत्तर सत्रात अचूक उत्तरे देणा-या यशस्वी शिपाई सेवकांचा याप्रसंगी भेट वस्तू देवून गौरव करणेत आला.

असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. नाथा राऊत यांनी बदलत्या बँकिंग प्रवाहात विविध स्तरावरील प्रशिक्षणाचे महत्व विषद करून प्रशिक्षण-प्रबोधनातून बँकिंग सेवेचा दर्जा उंचाविण्यावर भर दिला. कार्यलक्षी संचालक श्री.अशोक कुरापाटी यांनी सूत्रसंचलन केले. व आभार मानले जिल्हयातील नागरी सहकारी बँकांतील शिपाई वर्ग मोठया संख्येने या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
मुंबई: मूळ प्रश्नांना बगल देत भाजप सरकार काश्मीरच्या झेंड्यावर राजकारण करत आहे. काश्मीरच्या झेंड्याला विरोध करणारे हे सरकार नागालँडमध्ये वेगळ्या झेंड्यास विरोध का करत नाही, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील मुलभूत प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकारांना संबोधित केले.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी १२५-१२५ जागा लढवणार आहे, इतर मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. आणखी अनेक समविचारी पक्ष आमच्यासोबत यायला तयार असून चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मलिक म्हणाले.

मुंबई (प्रतिनिधी) – केंद्रिय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिवसेना-भाजपा युतीची चिंता आम्हालाही आहे, असे अधोरेखीत करत युतीची घोषणा लवकरच करू, असे स्पष्ट केले आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी केंद्र सरकारे घेतलेल्या विविध निर्णयांचे स्वागत केले. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट टॅक्‍स कमी केल्याबद्दल अभिनंदन केले. विधानसभा निवडणूक, शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा व जागा वाटप या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही घोषणा करतील अशी पत्रकारांची अटकळ होती.

परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कॉर्पोरेट कर 22 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार असून रोजगार निर्मिती होईल. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला कसा होईल याची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांचे निवेदन संपल्यावर पत्रकारांनी महायुतीच्या संदर्भात प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर उत्तर देताना युतीची चिंता तुम्हाला जेवढी आहे तेवढीच चिंता मलाही आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नगर: कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला. विकास-विकास म्हणतात पण तो कसा असतो, हे आम्हाला एकदा दाखवा, अशी मागणी या लोकांनी केली, असल्याचे पवार म्हणाले.

रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर देखील टीका केली. रस्त्याचे कामे केले म्हणजे विकास नव्हे असा टोला त्यांनी लगावला.

रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेडमध्ये वाहत असलेल्या बदलाच्या वाऱ्याचं आता हळूहळू वादळात रुपांतर होऊ लागलंय, याची झलक काल जामखेड भागात पहायला मिळाली. अनेक नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांनी त्यांना फक्त आश्वासनं देऊन नंतर कसं वाऱ्यावर सोडलं, याचं गाऱ्हाणं मांडलं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत सत्ताधाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला.

विकास-विकास म्हणतात पण तो कसा असतो, हे आम्हाला एकदा दाखवा, अशी मागणी या लोकांनी केली. शेवटी ते तरी करणार काय? त्यांची कामं होणं महत्वाचं आहे. किमान पाणी, रस्ता, वीज, शाळा या गरजा तरी पूर्ण व्हायला पाहिजेत ना. त्यासाठी लोकांनी आणखी किती वर्षे वाट पहायची?

समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्वांना सोबत घेऊन पुढच्या काळात खऱ्या विकासाची कामं कशी करायची याबाबतची माहिती मी त्यांना दिली आणि त्यासाठी पुढच्या काळात सर्वांची साथ कायम ठेवा, असं आवाहन यावेळी केलं. खऱ्या विकासासाठी परिवर्तन हा एकमेव पर्याय असल्याचं लोकांचं म्हणणं असल्यामुळं कर्जत-जामखेडमध्ये नवा बदल ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं उघड आहे.
मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीसाठी युती आणि आघाडी यांच्यात जागावाटप सुरु असतानाच इतर छोट्या पक्षांनी मात्र उमेदवारांच्या याद्या घोषित करण्यास सुरवात केली आहे. एमआयएम पाठोपाठ आता आम आदमी पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

दरम्यान एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या पक्षातील उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या नंतर, आता आपने देखील आठ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये ब्रम्हपुरी विधानसभेसाठी पारोमिता गोस्वामी, जोगेश्वरी पूर्वसाठी विठ्ठल लाड, करवीरसाठी आनंद गुरव, नांदगावसाठी विशाल वडघुले, कोथरूडसाठी अभिजित मोरे, चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे आणि पर्वती मतदारसंघातून संदीप सोनावणे यांचा समावेश आहे. असे आपचे महासचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.

तसेच पक्षाकडे ६०० अर्ज आले होते त्यांनतर त्यांच्या मुलाखती, छाननी केली असून, सध्या ५० ते ५५ ठिकाणी आपकडे सक्षम उमेदवार आहेत. एकीकडे राज्यात नेत्यांची पळवापळवी सुरू असताना उमेदवार जाहीर करणारा आप पहिला पक्ष असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
नवी दिल्ली – जम्मू आणि काश्‍मीरमध्ये “एलओसी’जवळ तब्बल 450 ते 500 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीमध्ये असल्याची गोपनीय माहीती मिळली आहे. जम्मू काश्‍मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी हे दहशतवादी भारतीय हद्दीमध्ये घुसवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सीमेवरील लष्कराला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून या घुसखोरीला रोखण्यासाठी पूर्ण मुभा देण्यत अली आहे.

सीमेपलिकडे घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जण जैश ए मोहंम्मदच्या बालाकोट येथील प्रशिक्षण तळावर प्रशिक्षण घेतलेले आहेत. याच प्रशिक्षण तळावर भारतीय हवाई दलाने फेब्रुवारीमध्ये “एअर स्ट्राईक’ केला होता. दहशतवाद्यांचा मोठा गट पाकिस्तानच्या बाजूच्या लिपा खोऱ्यातल्या टेरर लॉंच पॅडवर पुढील आदेशांची वाट पहात आहे. हे दहशतवादी काही महत्वाच्या शहरांमधील प्रमुख ठिकाणांना लक्ष्य करणार असल्याचेही गोपनीय वृत्त आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget