भाजपच्या सभासद नोंदणीला सर्व्हरचा खो

Image result for भाजप

नगर : केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या सभासद नोंदणी अभियानात शनिवारी (६ जुलै) नगर जिल्ह्यात एकाही सभासदाची नोंदणी होऊ शकली नाही. पालकमंत्री प्रा. राम शिंदेंसह सर्वप्रमुख मंडळींनी हातात मोबाईल घेऊन सभासद नोंदणीच्या मोबाइल क्रमांकावर रिंग दिली, पण ती रिसिव्हच झाली नाही.
अशाच पद्धतीने देशभरात पक्षाची सभासद नोंदणी होणार असल्याने सर्व्हर हँग झाला असावा, असा कयास सर्वांनीच मांडला. पण पहिल्या दिवशी जिल्ह्यातून भाजपचा एकही सदस्य नोंदला गेला नाही. दरम्यान, 'दिसतोय फरक-शिवशाही परत' या स्लोगनसह सभासद नोंदणी, नवमतदार नोंदणी व विधानसभा मतदारसंघनिहाय समर्थकांचे मेळावे घेण्यात येणार असल्याचे येथे जाहीर करण्यात आले.

जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मदिनानिमित्त ६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान सभासद नोंदणी अभियान भाजपने हाती घेतले आहे. त्याची नगर जिल्ह्यातील सुरुवात शनिवारी दुपारी येथील तुषार गार्डनमध्ये झाली. या वेळी पालकमंत्री प्रा. शिंदे, खा. डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे तसेच माजी आमदार बबनराव पाचपुते, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे आदी उपस्थित होते. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व नगरचे माजी खासदार व पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी अनुपस्थित होते. या वेळी सभासद नोंदणीची उपस्थितांकडून कृती करण्यात आली.

८९८०८०८०८० या मोबाइल क्रमांकावर मिस्डकॉल दिल्यावर आपल्या मोबाइलवर येणारी लिंक डाऊनलोड करून त्यातील सभासदत्व अर्जातील माहिती भरल्यावर पक्ष सदस्यत्व निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले. ही कृती करण्यासाठी प्रा. शिंदेंसह सर्वच उपस्थितांनी 'पोझ' दिली. हातात मोबाइल घेऊन सारे उभे राहिले व समोर असलेल्या शेकडो जणांनीही हातात मोबाइल घेऊन संबंधित क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचा प्रयत्न केला. पण फोनची रिंग जाण्याऐवजी फोन कट होत असल्याचा अनुभव सर्वांना आला.

अखेर देशात सगळीकडे आज अशीच सभासदत्व नोंदणी होत असल्याने सर्व्हर हँग झाला असावा, नंतर पुन्हा सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सुचवून पुढे कार्यक्रम सुरू करण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांनी चार पद्धतीने होणाऱ्या सभासदत्व नोंदणीची सविस्तर माहिती देऊन या पैकी कोणत्याही पर्यायानुसार नोंदणी करण्याचे आवाहन केले. श्याम पिंपळे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश पिंपळे यांनी आभार मानले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget