चिखलफेक प्रकरणी नितेश राणेंना अटक
कणकवली : काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आज कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं आंदोलन केलं होतं. मात्र यावेळी काँग्रेस आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आता नितेश राणे यांनी कणकवली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून त्यांची उद्या कोर्टामध्ये पेशी करण्यात येणार आहे.

कणकवली पोलिसांनी सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 40-50 कार्यकर्त्यांवर आयपीसीच्या कलम 353, 342, 332, 324, 323, 120 (ए), 147, 143, 504, 506 अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे.

नितेश राणे यांच्यासह त्यांचे २ कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस सध्या इतर कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget