जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास आता बंदी

Image result for आंदोलन
नगर : लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर आता नागरिकांना उपोषण, आंदोलन, ठिय्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या रस्त्यावर आंदोलन, उपोषणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत आदेश काढले आहेत. येथून पुढे शांततेच्या व कायदेशीर मार्गाने उपोषण, आंदोलन करण्यास भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या कार्यालयाजवळील मोकळी जागा निश्चित करण्यात आलेली आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जीपीओ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारा रस्ता हा शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एखादे उपोषण, आंदोलन, ठिय्या आंदोलन, मोर्चा सुरू असल्यास येथील रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच आंदोलन चालू असताना रस्त्यावरील वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अपघातामध्ये उपोषणकर्ते, आंदोलकांची जीवितहानी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निमाण होऊ शकतो. कोतवाली पोलिस स्टेशनच्या वतीने तसा अहवालदेखील जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता. 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget