आगामी निवडणुकीत 'मिसेस मुख्यमंत्री' प्रचाराच्या रिंगणात

आगामी निवडणुकीत 'मिसेस मुख्यमंत्री' प्रचाराच्या रिंगणात

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार पत्नी अमृता फडणवीस करणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्तही जिथे गरज पडेल तिथे प्रचार करण्याचा प्रयत्न करेन, असं अमृता फडणवीस यांनी नागपूरमधील पाणीपुरवठा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभादरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले.

अमृता फडणवीस आता मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने याचा भाजपला फायदा होईल, असं म्हटलं जात आहे. अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांशिवाय इतरही उमेदवारांच्या प्रचाराला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक लिस्टमध्ये आता अमृता फडणवीस यांच्या नावाचाही समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये पाच वर्षापूर्वी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्यांनी गावाची पाहणी केली. गाव दत्तक घेतल्यापासून येथे अनेक कामं सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे येथील काम पाहण्यासाठी अमृता फडणवीस अधून मधून येत असतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचा अमेरिकेत नवा रॉक लुक समोर आला होता. अमृता फडणवीस यांनी अमेरिकेतील एका म्युझिक कन्सर्टमध्ये सहभाग नोंदवला होता. या शोचं आयोजन अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी केलं होतं. अमृता फडणवीस यांच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget