पालिकेत सातवा वेतन आयोग लागू कराImage result for ahmednagar mahanagar palika

नगर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी महापालिका कामगार युनियनने केली आहे. यासाठी तातडीने महासभा घेऊन हा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जावा, असेही युनियनचे म्हणणे असून, तसे मागणीपत्र युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंद वायकर यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिले आहे.

महापालिकेच्या कामगार-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी युनियनद्वारे महापालिका प्रशासनास याआधीच केली गेली आहे व या मागणीनुसार महापालिका प्रशासनानेही यंदाच्या २०१९-२० अंदाजपत्रकात यासाठीच्या खर्चाची तरतूद केली आहे. शिवाय यासंदर्भातील कार्यालयीन प्रस्तावही तयार करण्यात आला असून, त्याला आयुक्तांनीही मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव कायदेशीर मान्यतेसाठी महासभेपुढे सादर होणार असल्याने नगरसचिव कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका कायद्यानुसार महापालिका महासभेची कायदेशीर मान्यता तशा अधिकृत ठरावाच्या रूपाने गरजेची आहे.

 त्यामुळे या वेतन आयोग शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी महासभा मान्यतेचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महापौरांनी तातडीने महासभेचे आयोजन करण्याची मागणी युनियनने केली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी झालेल्या बजेट महासभेत काँग्रेसच्या नगरसेविका शीला चव्हाण यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर महापौरांसह अन्य कोणत्याही नगरसेवकाने भाष्य केले नव्हते. या पार्श्वभूमीवर या वेतन आयोगासाठी स्वतंत्र महासभा घेण्याची मागणी युनियनने महापौर वाकळेंकडे केल्याने आता त्यांची याबाबतची भूमिका महत्त्वाची झाली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget