सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यास मारहाण
संगमनेर : प्राध्यापक भरतीच्या मुलाखतीची माहिती असलेली कागदपत्रे न दिल्याच्या रागातून, संगमनेर महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधिक्षकांना शिवीगाळी करुन, मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेचे नेते शरद थोरात यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक गोरक्षनाथ नामदेव पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान पानसरे त्यांच्या केबीनमध्ये प्रा. डॉ. सुहास आव्हाड व डॉ. दिलीप पोखरकर यांच्या समवेत कार्यालयीन कामकाज करीत असताना, शरद थोरात व त्यांचा मुलगा अभिषेक थोरात यांनी केबीनमध्ये येवून, महाविद्यालयात झालेल्या प्राध्यापक भरतीच्या मुलाखतीची माहिती असलेल्या कागदपत्रांची मागणी केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget