भारताला नाटो देशांच्या समान दर्जा मिळणार – अमेरिकन संसदेत महत्वपूर्ण निर्णयनवी दिल्ली : अमेरिकेच्या संसदेने भारताला नाटो देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक मंजुर केले आहे. त्यामुळे आता संरक्षण क्षेत्राशी निगडीत व्यवहारांमध्ये अमेरिका भारताबरोबर आपले नाटोचे सहकारी देशांप्रमाणे व्यवहार करेल.

या संदर्भातील विधेयक सिनेटर जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांनी अमेरिकेच्या संसदेत सादर केले होते. भारताबरोबर परस्पर सहकार्य, दहशतवादा विरोधात लढा, काऊंटर पायरसी आणि समुद्री सुरक्षेवर काम करण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी यात नमूद केले होते.

नाटो देशांच्या यादीत भारताला समावून घेणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. तसेच भारत आणि अमेरिका या देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत “हिंदू अमेरिकन फौडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कालरा यांनी व्यक्त केले. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशातीव संबंधांना असलेले महत्त्व समजले हे मोठी बाब असल्याचे मत शेरमॅन यांनी बोलताना व्यक्त केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget