महापौर बाबासाहेब वाकळेंसह, नगरसेवकांची सदस्य नोंदणीकडे पाठ

Image result for bjp

नगर : नगर शहर जिल्हा भाजपने शनिवारी घेतलेल्या पक्ष सदस्य नोंदणीकडे महापौर बाबासाहेब वाकळेंसह भाजपच्या १२ नगरसेवकांनी पाठ फिरविली. या वेळी नगरसेवक भय्या गंधे व मनोज दुलम हे दोघेच उपस्थित होते; मात्र, अनुपस्थित काही नगरसेवकांची नातेवाईक मंडळी आवर्जून उपस्थित होती. भाजपअंतर्गत हा चर्चेचा विषय झाला आहे.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपच्या वतीने देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. शनिवारी नगरमध्ये शहर जिल्हा भाजप व जिल्हा ग्रामीण भाजप यांचे दोन स्वतंत्र कार्यक्रम झाले. शहर जिल्हा भाजपचा कार्यक्रम सकाळी सावेडीत प्रोफेसर कॉलनी चौकात झाला तर जिल्हा भाजपचा तुषार गार्डनमध्ये. महापालिकेत भाजपचे १४ नगरसेवक आहेत. परंतु, सकाळी झालेल्या कार्यक्रमास केवळ गंधे व दुलमच उपस्थित होते.

 महापौर, उपमहापौर व अन्य काही नगरसेवकांचे नातेवाईक मात्र आवर्जून आले होते. शहर जिल्हाध्यक्ष गांधींसह सरचिटणीस किशोर बोरा, ज्येष्ठ सदस्य सुनील रामदासी व श्रीकांत साठे, माजी नगरसेवक किशोर डागवाले तसेच अजय ढोणे, किशोर वाकळे, विश्‍वनाथ पोंदे, शिवाजी दहिहंडे, वसंत राठोड, विवेक नाईक, चेतन जग्गी, प्रशांत मुथा, तुषार पोटे, नितीन शेलार आदी या वेळी उपस्थित होते. 'भाजप जगातील सर्वांत मोठा पक्ष असून, या पक्षाचे आपण सभासद असल्याचा अभिमान बाळगावा,' असे आवाहन या वेळी माजी खासदार दिलीप गांधी यांनी केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget