मोकाट कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर
नगर : गेल्या आठवड्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्र्यांच्या विषयावरून वादळी चर्चा झाली असतांना मंगळवारी सायंकाळी कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुली जखमी झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रशासनाला आज यावरून धारेवर धरल्याने महापौरासह आयुक्‍तांनी तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे.

दरम्यान, ज्या ठेकेदार संस्थेला कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका दिला आहे. त्या संस्थेने तब्बल अडीच महिन्यानंतर दोन दिवसांपूर्वी आपले काम सुरू केल्याने महापालिकेचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. आयुक्‍तांनी आदेश दिल्यानंतर कुत्रे पकडण्याची मोहिम सुरू झाली आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्र्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरून वाभाटे काढले होते. तरी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये कोणतीही सुधारण झाली नसल्याचे मंगळवारी झालेल्या घटनेमुळे सिद्ध झाले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget