ठाणे स्टेशनवर तुफान गर्दी, चेंगराचेंगरीत महिला जखमी

ठाणे स्टेशनवर तुफान गर्दी, चेंगराचेंगरीत महिला जखमी
मुंबई : मुंबईसह राज्यभरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसयाला सुरुवात झाली होती. दिवसभर कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. 

यामुळे सर्वच स्टेशनवर मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. नुकतंच ठाणे स्थानकात तुफान गर्दीमुळे चेंगरांचेंगरी झाली. यामुळे काही महिला प्रवाशी जखमी झाल्या आहे. जखमी महिलांना तात्काळ रुग्ण्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

काल (30 जून) रात्रीपासूनच्या नवी मुंबई, ठाणे, वाशी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सायन आणि कुर्ल्यात रेल्वे रुळांवर पाणी साठलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची रेल्वे सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. दरम्यान काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला असला, तरी ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची फार गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीमुळे ट्रेनमध्ये महिलांना चढण्यास आणि उतरण्यास फार त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे काही ठिकाणी चेंगराचेंगरी पाहायला मिळत आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget