खासदार सदाशिव लोखंडे यांनाही आदिवासी भागातील आश्रमशाळाच्या बेजबादार कारभाराची प्रचिती


अकोले-(विशेष प्रतिनिधी): आदिवासी भागातील आश्रमशाळा च्या बेजबादार कारभाराची प्रचिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांना आली. शिरपुंजे आदिवासी आश्रम शाळेतील भोंगळ कारभार व विद्यार्थीना कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने खासदारांनी चौकशी करून मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या निलंबन ची मागणी केली आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शासकीय आश्रमशाळा शिरपुंजे येथे भेट दिली असता तेथील शाळेची अतिशय दयनीय अवस्था बघायला मिळाली तेथील भोंगळ कारभार पहावयास मिळाला. यामुळे खासदार यांनी संताप व्यक्त करीत सर्व आश्रम शाळाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली

खासदार लोखंडे यांच्या समोर च विद्यार्थी जेवनाचे ताट पावसाच्या साचलेल्या पाण्यात धुत होते.तर जेवनात फक्त भातवरण त्या वरणामध्ये कोबी मिक्स करुन बनवलेले आढळले. शाळेच्या पिण्याच्या पाण्यात जंतु आढळले. लाईट नसल्याचे सांगत पिठ उपलब्ध नसल्याने आता जेवनामध्ये चपाती नाही असे सांगीतले परंतु सदर कर्मचारी यांनी सुरुवातीला खासदार साहेबांना उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती व शिक्षकांनी दिलेली माहिती वेगवेगळी असल्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे, जिप सदस्य डॉ किरण लहामटे, गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी चांगलेच धारेवर धरले.
सदर आश्रम शाळेचा दहावी चा निकाल चालु वर्षी २४ टक्के लागल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगितले यामुळे खासदार साहेबांनी शेराबुकची मागणी केली असता टाळाटाळ करत तब्बल एक तास उशिरा शेरा बुक देण्यात आले

धान्य कोठार तपासत असताना कर्मचारी सांगत होते साहेब ही डाळ शिजतचं नाही. अन तीच डाळ विद्यार्थ्यांना जेवनासाठी.

भोपळा सोडुन कोणत्याही भाजी पाला शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले. तांदुळ अतिशय खराब दर्जाचा आढळला.डाळ तांदुळ व इतर कडधान्ये नमुने खासदार साहेबांनी आपल्या सोबत घेतले व तपासणी साठी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाकडून कोट्यवधी रुपये आश्रम शाळेवर खर्च होत परंतु विद्यार्थ्यां सुविधा भेटत नसल्याने लवकरच राजुर प्रकल्पाच्या सर्वच आश्रम शाळांना भेट देणार असल्याचे सांगितले

नाशीकचे आयुक्त व राजुरचे प्रकल्प अधिकारी यांना फोन करुन तात्काळ मुख्याध्यापक व अधिक्षक व संबंधितांना निलंबित करण्याचे आदेश दिले. आश्रम शाळेचा हा गुणवतेचा व सुविधेचा मुद्दा सरकार दरबारी अधिवेशनात मांडणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.आदिवासी विद्यार्थी शिक्षण गुणवत्ता उंचवली पाहिजे, कला क्रिडा क्षेत्राला वाव मिळाला पाहीजे अशी अपेक्षा भेट दरम्यान जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केली
या वेळी मच्छिंद्र धुमाळ, प्रमोद मंडलिक, सतिश भांगरे,पोपट चौधरी, महेश देशमुख आदी उपस्थित होते

शाळेच्या शेरेबुकात अतिशय कडक शब्दात कारभारावर खासदार यांनी ताशेरे ओढले.
तब्बल दोन तास आश्रम शाळेच्या कामकाजाची माहिती घेत विध्यार्थ्यांना भेटून त्यांचे कडून माहिती घेतली

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget