पेट्रोल-डिझेलचे दर भडकले
मुंबई : शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस वाढवण्यात आल्याचा परिणाम दिसू लागला असून, आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशभरात आज पेट्रोलचे दर प्रतिलीटर सुमारे अडीच रुपयांनी तर डिझॆलचे दर प्रतिलिटर सुमारे २ रुपये ३० पैशांनी वाढले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ७८ रुपये ५७ पैसे प्रतिलीटर तर डिझेलचा दर ६९ रुपये ९० पैसे प्रतिलीटर झाला आहे.

आगामी काळातही पेट्रोलचे दर नऊ रुपये तर डिझेलचे दर चार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल. मालवाहतुकीसाठी डिझेलची वाहने वापरली जातात. त्यामुळे डिझेलचे दर वाढवल्यास त्यामुळे मालवाहतूक खर्चही वाढेल. परिणामी सर्वच वस्तूंच्या किमती वाढून महागाईही आणखी भडकेल.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये प्रतिलीटरच्या दराने एक्साइज ड्युटी आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावण्याची घोषणा केली होती. पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवल्याने सरकारी तिजोरीमध्ये २८ हजार कोटींची भर पडणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

या दरवाढीचे संकेत सरकारने अर्थसंकल्पात दिले आहेत. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढविण्याची अधिसूचना जारी होईल. वित्तीय कायदा २००२मध्ये त्यासाठी दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर पेट्रोलच्या दरात ७ ते १० रुपयांपर्यंत आणि डिझेलच्या दरात १ ते ४ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे दर पाहाता पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढणे अपरिहार्य आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget