नगरकरांकडे २०१ कोटींची थकबाकी

Image result for ahmednagar mahanagar palika

नगर: महापालिकेच्या संकलित कर योजनेवरील सवलत योजनेची मुदत संपल्यावर शहरातील ४० हजार २५० जणांकडे तब्बल २०१ कोटींची थकबाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे याच शहरातील ७४ हजार ७५० प्रामाणिक मालमत्ताधारकांनी संकलित करापोटी तब्बल २१ कोटी ५९ लाख रुपये महापालिकेकडे जमा केले असून ७२ लाख १७ हजारांची सूटही मिळविली आहे. विशेष म्हणजे काही नगरकरांनी तर जादा ५ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.

महापालिकेचे नवे आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होते. यंदाच्या एप्रिल २०१९ ते मार्च-२०२० या आर्थिक वर्षात महापालिकेला संकलित कर वसुलीचे चालू बिलाचे सुमारे ४५ कोटी व मागील थकबाकीचे सुमारे १७८ कोटी असे दोन्ही मिळून २२३ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर पहिल्या एप्रिल महिन्यात संकलित कर भरला तर त्यातील घरपट्टीच्या रकमेवर १० टक्के सवलत दिली जाते. हीच सवलत पुढे मे व जून महिन्यात प्रत्येकी आठ टक्के असते. जूननंतर १ जुलैपासून संकलित कर थकबाकीवर दोन टक्के दंड आकारणी केली जाते.

 या पार्श्वभूमीवर महापालिकेने सवलतीच्या पहिल्या तीन महिन्यात समाधानकारक कामगिरी केली आहे. शहरात १ लाख १५ हजार छोटे-मोठे मालमत्ताधारक आहेत. यापैकी ६५ टक्के जणांनी म्हणजेच ७४ हजार ७५०जणांनी २१ कोटी ५९ लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. यासाठी उन्हातान्हात रांगा लावल्या होत्या. मागील वर्षी याच तीन महिन्यांच्या काळात महापालिकेची वसुली १९ कोटी रुपये इतकी झाली होती. यंदा यात अडीच कोटींची वाढ झाली आहे. प्रामाणिक करदात्यांनी आपल्या नावावर दिसणारी संकलित कराची रक्कम वेळेत भरल्याने त्यांना १० ते ८ टक्के सवलतीच्या माध्यमातून महापालिकेने ७२ लाख १७ हजार ७६७ रुपयांची भेट दिली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget