शरण मार्केट पाडून १०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ येवू देवू नका महासभा बोलावून तोडगा काढा; आ.संग्राम जगताप यांची महापौर व आयुक्तांशी चर्चा
अहमदनगर - महापालिकेनेच बांधलेले शरण मार्केट एका व्यक्तीच्या तक्रारी वरून पाडून या मार्केट मधील सर्वसामान्य व्यावसायिकांच्या सुमारे १०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ येवू देवू नका,असे सांगत या बाबत महासभा बोलावून तोडगा काढा अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी शनिवारी (दि.२९) दुपारी महापालिकेत जाऊन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या कडे केली आहे.

शरण मार्केट मधील व्यावसायिकांसह आ.संग्राम जगताप यांनी महापालिकेत जावून अगोदर आयुक्त व नंतर महापौरांची भेट घेवून याबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे व्यावसायिक वासिम पठाण, नितीन रायपेल्ली, पांडुरंग येमुल, मन्सूर शेख, नरेश कोडम, सुमित रच्चा, साबीर शेख, सादिक खान, सतीश शिंदे, अनिल सोनवणे, रोहित गुंडू, शिवा गोंधळे, तुकाराम रामगिरी यांच्यासह या ठिकाणी लहान मोठे व्यवसाय करणारे उपस्थित होते.

यावेळी व्यावसायिकांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,शरण मार्केट येथील मनपाच्या गाळ्यांबाबत उच्चायुक्त यांचेकडे तक्रार करण्यात आली असून त्यावर सुनावनी सुरु आहे, पण सदर मार्केटच्या ठिकाणी मनपाचा नियोजित कुठलाही प्रकल्प नसल्याने व सदरचे गाळे कोणत्याही प्रकारे रस्त्याला अडथळा ठरत नाही. त्यामुळे सदर गाळ्यांवर कार्यवाही केल्यास मनपाचे आर्थिक नुकसान होणार आहे. मनपाचे आर्थिक हित लक्षात घेता सर्व गाळेधारकांनी दि. २३/०१/२०१७ रोजी आमचे मनपा सोबत करारनामा करणेबाबत विनंती पत्र महापौर व आयुक्त यांना दिले होते. तरी देखील याबाबत अद्यापपर्यंत मनपा मार्फत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आमचे या ठिकाणी सुरु असलेले व्यवसाय प्राथमिकदृष्ट्या अवैद्यरित्या सुरु असल्याचे निदर्शनास दिसून येते. पण आम्ही सर्व नगर शहराचे जागृत नागरिक असून आम्हाला महानगरपालिकेविषयी भावनिक आस्ता आहे.

 कारण आमच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह महानगरपालिकेमुळेच होत आहे. आपल्या संस्थेचे कुठल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ नये अशी आमची इच्छा नाही. त्यामुळे आमच्या यापूर्वीच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आमचे करारनामे नाविन्याने व प्रचलित दराने करुन याबाबत महासभेत मान्यता देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget