इंदापुरात सात जणांना व्हायचंय आमदार
पुणे : पुणे जिल्ह्यातील वर्चस्व कायम ठेवण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभेची जोरदार तयारी केली जात असताना विधानसभेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात कॉंग्रेसबरोबर आघाडीचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून पक्षाची ताकद पडताळणीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा प्रयत्न असला तरी यातून इंदापुरात मात्र पक्षाचीच कोंडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कारण, इंदापुरातून विधानसभा लढविण्यासाठी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आघाडीसह किंवा शिवाय, निवडणूक लढविणारच, अशी अनेकांची भूमिका असल्याने आघाडी झाली तरी कॉंग्रेसचे नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापुढे बंडखोरांचे आव्हान असणार, हे निश्‍चित मानले जात आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget