दोनशेवर चारा छावण्या बंद

Image result for चारा छावण्या

नगर : जून महिन्यात शेवटच्या दहा ते बारा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील दोनशेवर चारा छावण्या बंद झाल्या आहेत. चारा छावण्यांतील जनावरांची संख्या जून महिन्याच्या सुरुवातीला साडेतीन लाखांपर्यंत गेली होती; मात्र, पावसाला सुरुवात होताच अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेतीच्या कामासाठी घरी नेली आहेत. 

त्यामुळे जून महिन्याच्या अखेर जिल्ह्यामध्ये २८८ चारा छावण्यांमध्ये १ लाख ७९ हजार २०९ जनावरे राहिली आहेत. दरम्यान, नगर तालुक्यामध्ये मात्र बंद झालेल्या चारा छावण्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करीत सोमवारी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

नगर तालुक्यातील चारा छावण्या बंद झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी आक्रमक होत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. लवकरात लवकर चारा छावण्या सुरू न केल्यास सोलापूर रोडवर साकत येथे रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, तालुकाप्रमुख राजू भगत, किशोर पवार, संपत वाघमोडे, राजू भगत, चांगदेव शिंदे, मोहन वाघमोडे, उद्धव शिंदे, दिलीप चितळकर, माणिक शिंदे, राजू कार्ले यांच्यासह साकत, नारायणडोह, रुईछत्तीशी, गुणवाडी, हातवळण, वडगाव तांदळी अशा विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget