जिल्ह्यात सहा टक्के पेरण्या

Image result for जिल्ह्यात सहा टक्के पेरण्या

नगर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस होत नसल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना फारसा वेग आलेला नाही. जिल्ह्यात अनेक भागात अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी पेरण्या केलेल्या नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त २९ हजार ३१२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरीप हंगामातील एकूण क्षेत्राच्या सहा टक्के पेरण्या झाल्या आहेत, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

मागील वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाल्याने पेरण्या करता आल्या नाहीत. या काळात पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून जिल्हा आजही या दुष्काळास तोंड देत आहे. त्यानंतर यावर्षी जून महिन्यात परिस्थिती बदलेल असे वाटत होते. त्यानुसार जिल्ह्यात जून महिन्यात पावसास सुरुवात झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील काही भागात अद्याप अपेक्षित पाऊस पडलेला नाही.

त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर परिणाम झाला आहे. पाऊस होत नसल्याने बऱ्याच ठिकाणी पेरण्यांनी वेग घेतलेला नाही. जून महिना उलटून गेल्यानंतरही जिल्ह्यातील २९ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. या हंगामात जिल्ह्यातील जवळपास ४ लाख ७८ हजार हेक्टरवर पेरण्या होतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यातुलनेत आतापर्यंत सहा टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget