नवव्या वर्षी देखील राखली वारकरी सेवेची परंपरा कायम अकोलेतील एकमेव वारकरी सेवक डाॅ विराज शिंदे
अकोले: अगस्ति महाराज पालखी सोहळा पंढरपूर कडे यंदाच्या नवव्या वर्षी मार्गक्रमण करताना ३० रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विसावला, त्या ठिकाणी कृषी विद्यापीठातील अकोले - संगमनेर चे भुमीपुत्र कृषी शास्रज्ञ डाॅ दुर्गुडे,डाॅ आण्णासाहेब नवले,प्रा.शेषराव देशमुख,डाॅ कुलकर्णी, डाॅ. शिंदे तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले. यावेळी ह.भ.प.गणेश महाराज वाकचौरे कळस यांचे किर्तन झाल

संताचिये पायी हा माझा विश्वास || सर्व भावे दास झालो त्यांचा || या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे निरूपण विश्वास या शब्दाचा अर्थ करताना डाॅ विराज शिंदे यांचे आगमन झाले व त्यावर गणेश महाराज वाकचौरे यांनी आज डाॅ वारकरी यांच्या भेटी साठी नक्की येणार व तपासणी करून औषधोपचार करणार असा विश्वास वारकरी भाविकांना देखील वाटत असतो असा विश्वास व्यक्त केला.त्यावर वारकर्यानी देखील जोरदार टाळ्या वाजवून डाॅ चे स्वागत केले.डाॅ विराज शिंदे हे नऊ वर्ष सातत्याने एक दिवसाआड स्वखर्चाने येतात स्वतः औषध आणतात वारकर्याची तपासणी करून निरपेक्ष भावनेने औषधोपचार करतात. अधिकाधिक वारकरी हे त्यांचे कायमचे पेशंट आहेत म्हणून वारकरी देखील त्यांची वाट पाहतात व त्यांचे एक अतुट नाते तयार झाले आहे. 

व डाॅ विराज शिंदे यांनी ते कायम आपल्या सेवेने टिकवले आहे.त्यांच्या या सेवेमुळे त्यांना सर्व लोक "वारकरी सेवक" म्हणतात. त्यांचे समवेत दरवर्षी अकोले नगर पंचायत चे ऊपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नाना नाईकवाडी, अकोले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शरद खैरणार, संजय जाधव पिरुभाई पठाण, शांताराम देशमुख, प्रदीप देशमुख, ज्ञानेश्वर गायकवाड हे देखील उपस्थित राहतात.आज अगस्ति महाराज पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठीअगस्ति कारखान्याचे पुर्व शेतकी अधिकारी व डाॅ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ढोणे उपस्थित राहिले, किर्तना नंतर कृषीशास्रज्ञ डाॅ दुर्गुडे,डाॅ नवले व ढोणे साहेब यांनी वारकरी हे बहुसंख्य शेतकरी असल्याने त्यांना शेती विषयक मार्गदर्शन केले व प्रवासाला शुभेच्छा दिल्या.नंतर डाॅ आण्णासाहेब नवले यांचे वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. या प्रसंगी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष राजेन्द्र महाराज नवले,अगस्ति देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त दीपक महाराज देशमुख,रमेश महाराज भोर, नितीन महाराज गोडसे,शांताराम महाराज पापळ, किसनराव नाईकवाडी, माऊली राक्षे, विनेश देशमुख,बाळासाहेब भागरे,सुनिल दादा देशमुख व वारकरी उपस्थित होते

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget