उड्डाण पुलावर अपघात; एक ठार, पाच जखमी



मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या जोगेश्वरी उड्डाण पुलावर भाजीचा ट्रक उलटल्याने अपघात झाला. या अपघातात एकजण ठार तर पाचजण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळीच हा अपघात झाल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवाशांना बराच काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

एका कारशी भाजीच्या ट्रकची टक्कर झाली. त्यानंतर हा ट्रक उलटला. ज्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. ट्रोमा केअर रूग्णालयासमोर असलेल्या उड्डाण पुलावर हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget