स्काऊट गाईडमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान, सुदृढ शरीर व सक्षम बुध्दीमत्ता निर्माण करणे ही उद्दिष्टे साध्य -पगारे


संगमनेर -(प्रतिनिधी)स्काऊट आणि गाईड च्या पथकामुळे सहभागी विद्यार्थ्यां मध्ये देशाभिमान, सुदृढ शरीर व सक्षम बुध्दीमत्ता निर्माण करणे ही उद्दिष्टे साध्य केली जातात असे मत राज्य भारत स्काऊट आणि गाईडचे राज्य सदस्य व ज्ञानमाता विद्यालयाचे शिक्षक श्री. पगारे सर यांनी व्यक्त केले.

सर डी एम पेटीट विद्यालय, संगमनेर येथे भारत स्काऊट आणि गाईड चे संगमनेर व अकोले तालुक्यातील शिक्षकांचे शिबीराचे उद्घाटनप्रसंगी श्री. पगारे सर बोलत होते. कार्यक्रमास स्काऊट आणि गाईडचे माजी विद्यार्थी, एअर फोर्स आणि पोलीस दलातील सेवा निवृत्त अधिकारी श्री. उगले, एस टी चे माजी डेपो मॅनेजर भाऊसाहेब हांडे, अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सरचिटणीस शांताराम डोंगरे, जिल्हा उप जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब चोथे, माजी मुख्याध्यापिका द्वारका वाळे, मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. उगले म्हणाले की, प्लास्टिक मुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्काऊट आणि गाईड मार्फत प्लास्टिक निर्मूलनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. फादर हूबर सेवाभावी संस्थेने प्लास्टिक मुक्तीचा कार्यक्रम प्रत्येक शाळेत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी सरचिटणीस शांताराम डोंगरे म्हणाले की, स्काऊट आणि गाईडच्या शिक्षकां मध्ये जग बदलण्याची ताकद आहे, विद्यार्थ्यांचे मनात देशभक्ती व समाज सेवेचे बीज पेरणे आवश्यक आहे. शासनाने स्काऊट आणि गाईड पथकातील जे विद्यार्थी राज्य शिबिरात सहभागी त्यांना १० गुण व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी झालेस १५ गुण बोर्डाचे परिक्षेत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे गणवेशासाठी लोक प्रतिनिधीचे निधी, सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती मार्फत प्रयत्न केला तर, तो प्रश्न मार्गी लागेल. विद्यार्थ्यांचे मनात देशभक्ती व समाज सेवेचे संस्कार केले जातात ही अभिमानास्पद बाब आहे.

या शिबीरात माजी प्राचार्या द्वारका वाळे, स्काऊट आणि गाईडचे पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. टकले, श्रीमती शिंदे मॅडम, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक आण्णासाहेब चोथे, पर्यवेक्षिका रंजना जाधव यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget