होय, मी आमदारांचे राजीनामे फाडलेबंगळुरू: कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीचे बडे नेते डी के शिवकुमार यांनी आज राजीनामा देण्यासाठी बंगळुरू येथील राजभवनामध्ये जमलेल्या आमदारांची राजीनामा पत्रे फाडून टाकल्याचा आरोप कर्नाटक भाजपचे जेष्ठ नेते बी एस येड्डीयुराप्पा यांनी लावला होता.

दरम्यान आता, डी के शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना आपण आमदारांची राजीनामा पत्रे फाडून फेकल्याचे कबुल केले असून त्यांनी यामध्ये काहीही गैर नसल्याचे देखील म्हंटले आहे, ते म्हणाले, “मी त्यांची राजीनामा पत्रे का फाडू नयेत? त्यांना जर माझ्यावर गुन्हा दाखल करून मला कारागृहात टाकायचे असेल तर त्यांनी खुशाल तसे करावे. मी फार मोठा धोका पत्करला आहे.”

तत्पूर्वी  कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या ११ आमदारांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे सुपूर्द केल्याने देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून आमदारांचा राजीनामा कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकासाठी धोक्याची घंटा समजला जात आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget