कोंढवा दुर्घटना : आर्किटेक्‍ट, स्ट्रक्‍चरल इंजिनिअर ब्लॅकलिस्टेडमुंबई (प्रतिनिधी) – कोंढवा दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 बळींचे संतप्त पडसाद सोमवारी उमटले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आर्किटेक्‍ट व स्ट्रक्‍चरल इंजिनिअर यांची लायसेन्स निलंबित करण्यात आली असून पुणे महापालिकेने त्यांना ब्लॅकलिस्ट केले असल्याची घोषणा केली. तसेच या दुर्घटनेची सहा सदस्यीय समिती चौकशी करत असून 8 दिवसांत या समितीचा अहवाल येणार आहे, असे त्यांनी विधानसभेत सांगितले.

पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर दोन-चार दिवस त्याची चर्चा होते. नंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष होते. बांधकाम व्यावसायिक दोन-तीन महिने बेपत्ता राहतात आणि पुढे काहीही होत नाही, याकडे अजित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.

पोकलेनच्या आवजाने हादरे बसत असल्याची तक्रार शेजारच्या सोसायटीतील लोकांनी केली होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही. भविष्यात असा निष्काळजीपणा दाखवण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget