कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार, जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराकोल्हापूर : राज्यात पावसाने सर्वच ठिकाणी हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप असली तरी ग्रामीण भागात मात्र सर्वत्र धुवांधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, आजरा आणि चंदगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.

सततच्या पावसामुळे कोल्हापूरमधील राधानगरी धरण देखील ३९ टक्के भरल आहे तर जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीच्या पातळीत देखील वाढ झाली असून ती २३ फुटांवर आली आहे. तसेच वेदगंगा, पंचगंगा आणि भोगावती नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget