वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Image result for अपघात
नगर : नगर-मनमाड महामार्गावर देहरे टोलनाक्याजवळ वाहनाची धडक बसून दुचाकीस्वार ठार झाला. श्यामराव माधव खळेकर (वय ३५, रा. खंडाबे, राहुरी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
मंगळवारी सकाळी खळेकर दुचाकीवरून राहुरीकडे जात होते. देहरे टोलनाक्यापासून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना अॅम्ब्युलन्समधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. वाहनाची धडक बसून खळेकर यांचा मृत्यू झाल्याची नोंद एमआयडीसी पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget