पोषण आहार बील त्वरीत देणार

Image result for पोषण आहार

नगर : 'शालेय पोषण आहाराची मार्च २०१९ पर्यंतची शाळांची देयके देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात येणार आहे. एप्रिल २०१९ पासून नवीन दराने पोषण आहार देयके देण्यात येणार आहेत,' अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी दिल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुन साळवे यांनी दिली. याबाबत शिक्षण संचालक पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर, महापालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी उपस्थित होते.
या सभेत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरीसाठी शाळा अ दर्जाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय, राज्यस्तरीय आदर्श शिक्षकांना बस व रेल्वे प्रवासात सवलत मिळावी, शालेय पोषण आहारातील त्रुटींबाबत मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येऊ नये, केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात येऊन, अभावित केंद्रप्रमुखांना कायम करण्यात यावे, सातव्या वेतन आयोगात पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या वेतनात पडणारा फरक दूर करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

 यावर चर्चा करण्यात आली. या वेळी पुरोगागी शिक्षक समितीची राज्य सरचिटणीस हरीश रासनकर, समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर कुंजरकर, समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुण जाधव, आबा लोंढे, राजेंद्र म्हसदे, राजेंद्र आंधळे, रमेश जाधव, अरुण आवारी, महेश दरेकर, शहाजी गोरवे, मारुती हिंगणे, बळीराम मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget