जगतापांनी घेतली मंत्री देसाईंची भेट

Image result for संग्राम जगताप

नगर : स्थानिक नगरच्या स्तरावर शिवसेनेचे विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादीचे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सोमवारी मुंबईत भेट घेतली. नगर एमआयडीसीतील ऑटो अँड इंजिनीअरिंग क्लस्टरसाठी सहायता निधी वा बिनव्याजी कर्ज देण्याची विनंती या भेटीत आमदार जगतापांनी मंत्री देसाईंकडे केली.

 याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देसाईंनी त्यांना दिल्याचे सांगितले जाते. दरम्यान, क्लस्टर अर्थसहायाची मागणी करणारे स्वतंत्र पत्र नगरच्या उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget