पुण्यात क्रिकेटच्या सामन्यावर ऑनलाइन बेटींग घेणार्‍या चौघांना अटक
पुणे : वर्ल्डकप दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड क्रिकेटच्या सामन्यावर ऑनलाइन बेटींग घेणार्‍या चौघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने सिंहगड रोड परिसरातून जेरबंद केले आहे. यावेळी जुगार खेळणारे व घेणारे या सर्वाचा समावेश आहे.

सचिन वसंत चव्हण (वय-38,रा. सिंहगड रोड), अमोल भगवंत खळदकर (वय-50,रा. नारायण पेठ), राहूल गोरक्षणाथ जगताप (वय-38,रा.कोंढवा ब्रुद्रुक) व पृथ्वीराज शंकर येळवंडे (वय-38,रा. बुधवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. यावेळी या चौघांच्या ताब्यातून एक लॅपटॉप, 8 मोबाईल, 10 हजार 940 रुपयांची रोकड असा 1 लाख 18 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget