‘हा खून आहे की दुर्लक्षिलेला मृत्यू?’- जितेंद्र जोशी


रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं. या दुर्घटनेत सहा जणांचे मृतदेह सापडले असून २४ जण बेपत्ता आहेत.

धरण फुटीमुळे भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवस, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

तर या धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली होती, अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावर हा खून आहे की दुर्लक्षिलेला मृत्यू, असा संतप्त सवाल अभिनेता जितेंद्र जोशीने केला आहे.

‘अवघ्या २० वर्षांपूर्वी बांधलेलं तिवरे धरण फुटतं. आसपासच्या गावकऱ्यांनी तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही. हा वध आहे की खून की दुर्लक्षिलेला मृत्यू,’ अशी पोस्ट लिहित जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget