पावसामुळे मुंबई तुंबली!मुंबई – सोमवार सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईमध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचून राहिले आहे. यामुळे महानगरीतील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि उपनगरी लोकल उशीरा धावू लागल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 2, 4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील काही ठिकाणी आज आणि मंगळवारी अतिशय जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्‍यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

काल दुपारी मुंबईमधील पावसाने थोडी उघडीप दिली तरी लोहमार्गांवर पाणी साचल्याने उपनगरी रेल्वे उशीराने धावत होत्या. चेंबूरसारख्या काही भागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये घुसले आणि नागरिकांनी मुंबई महापालिकेला दोष द्यायला सुरुवात केली. प्रशासनाने पावसाळ्यातील संभाव्य परिस्थितीवर उपाय योजना केल्या नाहीत, अशी टीका स्थानिकांकडून होत आहे. हिंदमता, परळ, लालबाग, सेनपती बापट मार्ग या ठिकाणी पाणी रस्त्यांवरच साचून राहिले. वडाळामध्येही काही इमारतींच्या परिसरात पाणी साचून राहिले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget