केडगावात हाणामारी; शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाच्या भावाला अटक

Image result for अटक
नगर : शहरातील केडगाव येथे राजकीय वाद व जुन्या भांडणाच्या कारणातून हाणामारी होऊन त्यात तडीपार गुन्हेगार मनोज कराळे जखमी झाला. सोमवारी रात्री हा प्रकार घडल्यानंतर केडगावमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी परस्परांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हे नोंदविण्यात आले असून, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचा भाऊ विठ्ठल नानाभाऊ सातपुते याला रात्रीतून पोलिसांनी अटक केली. तर काही आरोपी फरारी झाले आहेत. जखमी असलेला कराळे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्या आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मनोज भाऊसाहेब कराळे (रा. केडगाव) याला दोन वर्षांसाठी पोलिस अधीक्षकांनी शहरातून तडीपार केले आहे. तडीपार असताना कराळे केडगाव येथे आला होता. पीडब्ल्यूडी वर्कशॉप रोड येथील व्हॉलिबॉल मैदानावर आल्यानंतर त्याच्यावर काही जणांनी हल्ला करून लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. सोमवारी रात्री सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मनोज कराळे याच्या आई मीना कराळे यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल सातपुते, सुनील सातपुते, नितीन भालसिंग, प्रवीण सातपुते, आशिष शिंदे, महेश साके, अशोक सातपुते, अनिकेत शिंदे (रा. शिवाजीनगर, केडगाव) यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget