एकतर्फी प्रेमातून त्रास; तरुणीची सुटका

Image result for तरुणीची सुटका
नगर: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून लग्न करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाच्या तावडीतून तरुणीची दिलासा सेलच्या पथकाने मंगळवारी सुटका केली. त्रास देणाऱ्या तरुणाच्या कमरेला चॉपर, खिशामध्ये लोखंडी फायटर आढळून आले. तरुणीवर हल्ला करून स्वतःवर वार करण्याचा या तरुणाचा उद्देश असल्याचे पोलिस चौकशीत उघडकीस आले.

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून राहुरीतील संदेश मनोहर गायकवाड याच्याविरुद्ध विनयभंग करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित तरुणी नगरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी करते. ही तरुणी नगरमध्ये राहते. तरुण व तरुणीचे घरचे संबंध असून, ते एकमेकाच्या ओळखीचे आहेत. गेल्या दीड वर्षांपासून गायकवाड एकतर्फी प्रेमातून तरुणीला, 'माझ्याशी लग्न कर', असे म्हणून त्रास देत होता. याबाबत तरुणीने 'स्नेहालय'कडे एक लेखी अर्ज दिला होता. मंगळवारी सकाळी तरुणीशी गायकवाड याने मोबाइलवरून संपर्क साधून 'तुला भेटायचे आहे,' असे सांगितले. तरुणीने भेटण्यास नकार दिल्यानंतर ती राहत असलेल्या ठिकाणापासून तरुणाने मोटारसायकलवरून पाठलाग सुरू केला. तरुणी रिक्षामध्ये बसून नोकरीच्या ठिकाणी येत होती. त्या वेळी मोटारसायकलवरून गायकवाड याने पाठलाग केला. 

 त्याच वेळी दिलासा सेलची गाडी आली. दिलासा सेलच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, पोलिस नाईक अर्जुन आव्हान, सुदाम लोंढे, रोहिणी दरंदले, स्वाती गुंजाळ यांनी गायकवाड याला पकडले. त्याच्या अंगाची झडती घेताना कमरेला चॉपर लावलेला सापडला. तर पॅन्टच्या खिशामध्ये लोखंडी फायटर सापडले. त्यानंतर गायकवाड व तरुणीला तोफखाना पोलिस स्टेशनला आणण्यात आले. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गायकवाडविरुद्ध फिर्याद नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget