मुस्लिम समाजाचा जनआक्रोश मोर्चानगर : झारखंड येथील तबरेज अन्सारी या तरुणाची जमावाने हत्या केल्याच्या निषेधार्थ नगरमधील मुस्लिम समाजाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. मोठ्या संख्येने मुस्लिम समाज मोर्चामध्ये सहभागी झाला होता. अल्पसंख्याक समाजाची नियोजनबद्ध जाणून बुजून मॉब लिंचिंग केली जात असल्याने अल्पसंख्यांकासाठी संरक्षण कायदा करण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.

शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोठला मैदान येथून मुस्लिम समाजाच्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्यांनी खिशाला काळ्या फिती लावल्या होत्या. 'संविधान बचाव... देश बचाव', 'हिंदू, मुस्लिम', 'शिख, इसाई हम सब एक है', 'सबल मिलके एक बनो...भारत जोडो', 'तबरेज तेरे खुनसे इन्कालाब आयेगा'... अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. मोर्चा कोठला मैदान, राज चेंबर्स, कोंड्या मामा चौक, किंग्स गेट, रामचंद्र खुंट चौक, हातमपुरा येथून आंदोलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने नेमून दिलेल्या भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या मैदानावर नेण्यात आला. त्याठिकाणी वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख तसेच काही मौलनांनी भाषणे केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget