जामखेड, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामांसाठी ६ कोटींचा निधी

जामखेड : दुष्काळी कर्जत व जामखेड या दोन तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी पणन खात्याच्या माध्यमांतून सुमारे ६ कोटी रूपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पुण्यातील पणन महामंडळात बैठकीचे आयोजन करण्यांत आले होते. या बैठकीत मंत्री राम शिंदे यांनी जामखेड व कर्जत तालुक्यातील बाजार समित्यांच्या विविध विकास कामांसाठी सुमारे ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून शेतकऱ्यांसाठी बाजार समितीमध्ये विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे.

यावेळी झालेल्या बैठकीसाठी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार ,उपसभापती प्रकाश शिंदे, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पृथ्वीराज वाळूंजकर, संचालक सुधीर राळेभात पाटील, महादेव डुचे पाटील, करण ढवळे, अरूण महारनवर, सुभाष जायभाय, त्रिंबक कुमटकर, पणन संचालक डॉ ज्ञानेश्वर झेंडे, पांडुरंग उबाळे, अहमदनगर जिल्हा लेबर मजुर फेडरेशनचे संचालक मनोज कुलकर्णी,जेष्ठ नेते काकासाहेब धांडे, महासंग्राम युवामंच अध्यक्ष भारत मासाळ, शिवसेनेचे जेष्ठ नेते व संचालक बळीराम यादव,कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत बावडकर, राजेंद्र भोसले,औदुंबर निंबाळकर, पप्पू नेवसे, बजरंग कदम, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लक्ष्मण कांबळे, सहसचिव वाहेदभाई सय्यद, कर्जत बाजार समितीचे सचिव सतिष कदम, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र सोशल मिडीयाचे प्रमुख चेअरमन उध्दव हूलगूंडे, युवा नेते बंडू श्रीरामे, युवा नेते पांडुरंग माने, गणेश खरात, जवळा ग्रा पं सदस्य उमेश रोडे, आभिमान पवार,पणन महामंडळाचे सर्व अधिकारी व अहमदनगर जिल्हाचे डीडीआर आहेर यांच्यासह सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget