राष्ट्रवादी युवकला विधानसभेच्या 15 जागा अपेक्षितसातारा : विधानसभेच्या निवडणुकीत युवकांना संधी देण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागितली आहे. त्यानुसार निवडणूक जिंकण्याच्या निकषावरच 15 जागांची यादी लवकरच पक्षाध्यक्षांकडे सादर करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. दरम्यान, 15 जागांमध्ये सातारा जिल्ह्यातील कोणता विधानसभा मतदारसंघ असेल, हे इतक्‍यात सांगणे धाडसाचे ठरेल, असेही शेख यांनी सांगितले.

येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित आढावा बैठकीदरम्यान पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सरचिटणीस राजकुमार पाटील, बाळासाहेब महामूलकर, गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे आदी उपस्थित होते. पवार कुटुंबियांतील युवकांना तात्काळ उमेदवारी मिळते. मात्र, सर्वसामान्य युवक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नाही, या प्रश्‍नाला उत्तर देताना शेख म्हणाले, “मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. वास्तविक तो मतदारसंघ कायम भाजप-शिवसेनेचा गड राहिला आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार कर्जत- जामखेड मधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget