July 2019
अकोले (प्रतिनिधी)अकोले तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रचंड उलथापालथ चालू असून , विद्यमान आमदार वैभव पिचड यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असला तरी विधानसभा निवडणुक शिवसेना पक्षाकडुन लढणार असल्याचे सतीश दादा भांगरे यांनी दैनिक युवा ध्येय शी संवाद साधताना केले . अकोले विधानसभा मतदार संघ शिवसेना भाजपा -शिवसेना पक्ष युतीचा असल्याने आजपर्यंत ही शिवसेना या पक्षाच्या कोठ्यात जाते.

अनेक वर्षापासुन शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष असीच लढत अकोले तालुक्यात झालेली आहे.तसेच अकोले तालुक्यात आज पर्यंत शिवसेना हा पक्ष अकोले तालुक्यात विधानसभा मतदानात क्रमांक दोनचा पक्ष राहीला आहे.यामुळे साहजिकपणे अकोले मतदार संघ हा शिवसेना पक्षाकडेच राहील. आमदार पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे जरी अकोले मतदार संघ भाजप पक्षाकडे जाणार अशी चर्चा सुरु असली तरी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी या संदर्भात ही जागा भाजपाला जाणार की न जाणार अशी भूमिका जाहीर केली नसल्या कारणाने शिवसेना पक्षच विधानसभा लढणार आहे..अकोले तालुक्यात जरी भाजप पक्षात आमदार यांचा प्रवेश झाला असला तरी तो भाजपा या पक्षाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे.माञ शिवसेना पक्षाची उमेदवारी मी निश्चित करणार आहे.मी शिवसेना पक्षात पाच वर्ष पूर्णवेळ कार्यरत होतो.

शिवसेना व युवा संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, राजकीय आंदोलने केली आहेत.अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. अनेक कार्यकर्ते यांच्या मनात संभ्रम आहे की शिवसेना पक्ष अकोले तालुक्यात लढणार की नाही माञ पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा विधानसभा भाजपाला देण्यात येणार असल्याचा आदेश आला नसल्याने आपण विधानसभा लढणार आहोत.अशी माहिती शिवसेना पक्षाचे युवानेते सतिषदादा भांगरे यांनी सांगितले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काम करणार असून मातोश्री वरून होणाऱ्या आदेशानुसार काम करणार असल्याचे सतीश दादा भांगरे यांनी बोलताना सांगितले .

शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन विकास कामे करणार असून तालुक्यातील रोजगार,पर्यटन,रस्ते, आरोग्य, शिक्षण,दळणवळण, बस सुविधा, भंडारदरा धरणास क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यासाठी लढा उभारणार आहे.तसेच राजूर येथील प्रकल्प कार्यालयात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा पुतळा उभारावा.तालुक्यातील बेरोजगारी चा प्रश्न सोडवण्यासाठी आणि नारायणगाव व बनकर फाटा येथे मजुरी साठी जाणारी तालुक्यातील जनता यांना तालुक्यातच लघुउद्योगांच्या माध्यमातून प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.गड संवर्धन आणि सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा तालुक्यातच उभ्या करणे.अकोले तालुक्यातील सर्व गावे टँकरमुक्त करणे .पवन ऊर्जा प्रकल्प ज्या गावात आहेत.त्या गावातील ग्रामपंचायतिना कर जमा करण्यास कंपन्याना भाग पाडणे.खेमानंद फाउंडेशन च्या माध्यमातून आरोग्य शिबीर आयोजित करणे .तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रश्न सोडवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुक शिवसेना पक्षातूनच लढविणार असल्याचे सतीश दादा भांगरे यांनी बोलतांना सांगितले .

नवी दिल्ली : अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला  यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जस्टिस एसएन शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विद्यमान न्यायमूर्तींची सीबीआय चौकशी होणार आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाला फायदा होईल असे आदेश दिल्याचा जस्टिस शुक्ला यांच्यावर आरोप आहे.

2017 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस शुक्ला यांनी एका वैद्यकीय महाविद्यालयाला 2017-18 च्या सत्रात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मंजुरी दिली होती. यामुळे निश्चित वेळेपेक्षा जास्त काळ प्रवेश प्रक्रियेला परवानगी दिल्याचं समोर आलं. उत्तर प्रदेशातील महाधिवक्त्यांनी या प्रकरणी तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना माहिती दिली होती. याची गांभीर्याने दखल घेत जस्टिस दीपक मिश्रा यांनी चौकशीसाठी एका समितीची नियुक्ती केली.

विविध हायकोर्टांच्या तीन न्यायमूर्तींचा या चौकशी समितीमध्ये समावेश होता. जस्टिस शुक्ला यांनी जाणिवपूर्वक हा निर्णय दिल्याचं या समितीच्या अहवालातून समोर आलं. पण तोपर्यंत न्यायपालिकेत भ्रष्टाचाराचेही आरोप करण्यात आले होते. मुख्य न्यायमूर्तींनी जस्टिस शुक्ला यांना स्वतःहून पद सोडण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी नकार दिल्यानंतर 22 जानेवारी 2018 रोजी त्यांच्याकडून न्यायालयीन कामकाज काढून घेण्यात आलं. म्हणजेच त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं.
शिर्डी : राज्यातील सरपंचांच्या मानधनात नुकतीच वाढ करण्यात आलीय, पण ही वाढ फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं व्हिजन सरपंच आणि उपसरपंचांसमोर मांडलं. शिर्डीत राज्यातील 47 हजार सरपंच आणि उपसरपंचाची परिषद  पार पडली. या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मंत्री, आमदार आणि खासदारही उपस्थित होते. राज्याच्या विकासाबाबत या परिषदेत  मंथन करण्यात आलं.

“2022 पर्यंत प्रत्येकाला घर”

गावातल्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पना मांडली आहे. हागणदारी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी चांगल्या प्रमाणात काम झालंय. आवास योजनेच्या माध्यमातूनही सात लाखांपेक्षा जास्त घरे बांधली गेली आहेत. राज्यातील सर्व बेघर असणाऱ्यांना 2022 पर्यंत घर देणार असून प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचं घर असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई : विद्यार्थी कॉलेज निवडताना अगोदर कॅम्पस पाहतात. पण कॉलेज ज्या शहरात आहे, ते शहरच विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट असेल तर? ग्लोबल कन्सल्टन्सी कंपनी क्वाकेरॅली सायमंड्सने भारतासह जगातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात चांगलं शहर लंडन ठरलंय. तर पहिल्या 100 मध्ये बंगळुरु आणि मुंबई या दोन शहरांचा समावेश आहे.

गेल्या वर्षीच्या यादीतही लंडनचाच पहिला क्रमांक होता. यावेळीही लंडनने आपलं स्थान कायम ठेवलंय. तर भारताच्या चार शहरांचा टॉप 120 स्टुडेंट फ्रेंडली शहरांमध्ये समावेश झालाय. यामध्ये बंगळुरु (81), मुंबई (85), दिल्ली (113) आणि चेन्नईचा (115) समावेश आहे.

जगभरातील टॉप 10 शहरं

लंडन (ब्रिटन)

टोकियो (जपान)

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)

म्युनिक (जर्मनी)

बर्लिन (जर्मनी)

मॉन्ट्रीयल (कॅनडा)

पॅरिस (फ्रान्स)

ज्युरिक (स्वित्झर्लंड)

सिडनी (ऑस्ट्रेलिया)

सियोल (द. कोरिया)

क्यूएसच्या टॉप 120 शहरांमध्ये अमेरिका आणि ब्रिटनचे प्रत्येकी 14-14 शहरं आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांचा समावेश आहे. आशिया खंडातून जपानमधील टोकियो, दक्षिण कोरियाची राजधानी सियोल टॉप 10 मध्ये आहे, तर हाँगकाँग 14 व्या, चीनची राजधानी बीजिंग 32 व्या आणि शांघाय 33 व्या क्रमांकावर आहे.मुंबई : महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 ऑगस्टपासून देशात पाच नियमांमध्ये बदल  होईल. याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर पडणार आहे, तर काही निर्णयांमुळे आर्थिक नुकसानही होणार आहे. गॅस सिलेंडरचे दर, स्टेट बँकेचे नवे दर, ई-वाहनावरील जीएसटी परिषदेचा निर्णय, स्टेट बँकेचा आयएमपीएसवरील निर्णय या निर्णयांचा यामध्ये समावेश आहे.

1 ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे एकतर दर कमी होऊ शकतात, किंवा दर वाढवलेही जाऊ शकतात. 1 जुलैला विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 100.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यापूर्वी सलग तीन महिन्यांसाठी गॅसच्या किंमतीत वाढ झाली होती.

27 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने ऑटो क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. ईलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 5 टक्क्यांवर येणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जरवर लावण्यात येणाऱ्या करातही कपात करण्यात आली आहे. अगोदर 18 टक्के असणारा जीएसटी 5 टक्के करण्यात आलाय. हा नियम 1 ऑगस्टपासून लागू होईल.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलेलं असेल तर 1 ऑगस्टपासून त्याचा मोबदला कमी मिळेल. एसबीआयने 179 दिवसांच्या जमा ठेवीवर व्याज दरात 0.5 ते 0.75 टक्क्यांनी कपात केली आहे. तर दीर्घ कालावधीच्या जमा ठेवीसाठी 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय बँकेने घेतलाय.

एसबीआयने इंस्टंट मनी पेमेंट सर्व्हिंस म्हणजेच आयएमपीएसवर लागणारा चार्ज पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 1 ऑगस्टपासून आयएमपीएसवर कोणताही चार्ज लागणार नाही. यापूर्वी सर्व बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीवर लागणारा चार्ज बंद केला होता.

नोएडा आणि ग्रेटर नोएडा या क्षेत्रात प्रॉपर्टी खरेदी करणं स्वस्त होणार आहे. घर खरेदीवर सहा टक्के आणि व्यावसायिक खरेगीवर 25 टक्के असणारा सरचार्ज बंद करण्यात आलाय.


जिल्हा परिषदेचे सीईओ विश्वजीत माने यांच्याविरुद्ध सोमवारी विशेष सभेत अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह उपस्थित सर्व सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. ठरावाच्या बाजूने एकूण ६५ सदस्यांनी मतदान केले. 

त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांनी हा ठराव मांडला. या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.

मानेंविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, अतिरिक्त सीईओ जगन्नाथ भोर उपस्थित होते. 

मानेंना या आधीच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याने ते आजच्या सभेस हजर नव्हते. त्यामुळे सीईओपदाचा कार्यभार अतिरिक्त सीईओ जगन्नाथ भोर यांच्याकडे देण्यात आला होता.


अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर शासकीय विश्रामगृहासमोर मंगळवारी पहाटे ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला.

अपघातानंतर बसने पेट घेतला. बस जळून खाक झाली असून या भीषण अपघातात ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर २१ जण किरकोळ जखमी आहेत.

अपघातानंतर प्रवासी बसमधून लगेच उतरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एसटी बस औरंगाबादहून नगरकडे येत होती. ओव्हरटेक करताना बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली.

या अपघातानंतर बसने पेट घेतला. बसमधील प्रवासी बसमधून खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. सात प्रवासी गंभीर जखमी झाले असून खासगी हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर २१ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.


नगर – मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीवरून महापालिकेच्या सभेत वसुली विभागाचे वाभाडे काढल्यानंतर प्रशासनाकडून थकबाकीच्या वसुलीसाठी कडक पावले उचलली जात असून आज पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या 41 जणांचे नळ कनेक्‍शन अक्षरशः तोडून टाकले आहे.

या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी बुरुडगाव प्रभाग समितीच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. सोमवारी प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी तब्बल 33 थकबाकीदारांचे नळ कनेक्‍शन तोडून पाणी बंद केले आहे.

दरम्यान, आठ अनधिकृत नळजोडही मनपाकडून बंद करण्यात आले असून, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.


बेंगळुरू – कर्नाटकातील सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या १३ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. 

यामुळे कर्नाटकात सत्ताबदल घडून येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. परंतु, कर्नाटकीय राजकारणाला आणखी एक नवे वळण लागले आहे. 

आमदारांनी योग्य पद्धतीने आपले राजीनामे सादर केले नसल्याचे विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी सांगितले.

केआर रमेश कुमार म्हणाले कि, राजीनाम्याची एक प्रक्रिया असते. एक नियमावली असते. त्यानुसारच आम्हाला निर्णय घ्यावे लागतात. 

या प्रक्रियेचे आमच्या कार्यालयालाही पालन करावे लागते. यासाठी कोणतीही वेळेची निश्चित मर्यादा नसते. यातील एका नियमानुसार, जर अध्यक्षांना विश्वास असेल कि, राजीनामे कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वेच्छेने दिले आहेत. 

तरच ते स्वीकार केले जातील. परंतु, असे न झाल्यास काय करावे याबद्दल अधिक माहिती घेण्याची प्रक्रिया चालू आहे, असे त्यांनी सांगितले.
वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत पाच शतकं ठोकणारा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मावर सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. रोहित हा एकदिवसीय क्रिकेटमधील महान खेळाडू आहे, असं ते म्हणाले.

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एकूण आठपैकी सात सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळं रद्द झाला आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पराभूत झाली आहे. 

त्यावरही शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सामन्यात संघाची कामगिरी चांगली झाली होती, मात्र, नशीब त्यांच्यासोबत होते. 

मला वाटतंय की त्या दिवशी देव इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बसला होता. पुढच्या वेळी इंग्लंडविरुद्ध लढत झाली तर देवानं आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बसावं. चिंतेचं कोणतंही कारण नाही, असं शास्त्री म्हणाले.


जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घराबाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेकडे फेकले. रत्नागिरीतील तिवरे धरणफुटी खेकड्यांमुळे झाल्याचं वक्तव्य सावंत यांनी केलं होतं. 

त्याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे फेकले.

सावंत यांच्या घराबाहेबर खेकडे फेकतानाचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आले आणि खेकडे फेकून निघून गेले.
नवी दिल्ली – पब्जी खेळण्यास आईने विरोध केल्याने एका 17 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरयाणातील जिंदमध्ये शनिवारी ही घटना घडली. दहावीनंतर या मुलाने शिक्षण सोडले होते.

दिवसातील बराच वेळ तो पब्जी खेळायचा. घटना घडली त्या दिवशीही तो आपल्या खोलीत पब्जी खेळत होता. त्याच्या आईने हे पाहिल्यानंतर त्याच्या हातून मोबाइल हिसकावला. यानंतर रागाच्या भरात त्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत मुलाचे वडील पोलीस विभागात नोकरी करतात.
अमरावती – आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडूंच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेस पार्टीने एन.चंद्राबाबू नायडू यांच्याकडे सरकारी निवासस्थान खाली करण्याची मागणी केली आहे. वायएसआर कॉंग्रेसचे आमदार अल्ला रामकृष्णा रेड्डी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, एन. चंद्राबाबू नायडू यांनी अवैध घरात राहत असल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणताही वादविवाद न करता सरकारी निवास्थान सोडले पाहिजे.

अल्ला रामकृष्णा रेड्डी हे मंगलागिरी मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळी बोलताना अल्ला रामकृष्णा रेड्डी म्हणाले, तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष निवास्थान खाली करणार नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे.’ एन. चंद्राबाबू नायडू यांनी 6 मार्च, 2016 रोजी विधानसभेत सांगितले होते की, निवास्थान सरकारी आहे. त्यामुळे एन. चंद्राबाबू नायडू निवास्थान खाली करण्यास बांधील आहेत, असेही अल्ला रामकृष्णा रेड्डी यांनी सांगितले.
मुुंबई:  लोकसभा निवडणूकीत “लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवणारे आणि लोकसभा निकालानंतर राजकीय पडद्यावरून गायब झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आज केंद्रिय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. “मॅच फिक्‍स असेल, तर नेट प्रॅक्‍टिस करून उपयोग काय?’ असे सुचक विधान करीत महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका ईव्हीएमद्वारे न घेता जुन्या पद्धतीने म्हणजेच मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
-Ads-दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, ही भेट केवळ औपचारिक असून इतक्‍या महत्वाच्या विषयावर आयोग फारसा गंभीर नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मला शून्य अपेक्षा आहे, असे सांगतानाच मुंबईत परतल्यानंतर आपली पुढील भूमिका जाहिर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर एक महिना शांत राहिलेले राज ठाकरे यांनी आज दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ईव्हीएमबाबत लोकांना शंका आहेत. जे उमेदवार हरले आहेत त्यांना शंका आहेच. पण जे जिंकले आहेत, त्यांनाही शंका आहे की मी निवडून कसा आलो. यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणूका या ईव्हीएमद्वारे न घेता जुन्या पद्धतीने म्हणजेच मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी करणारे निवेदन राज ठाकरे यांनी मुख्य आयुक्तांना दिले. एका माध्यमसंस्थेच्या अहवालानुसार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये 373 मतदारसंघांत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात तफावत आढळली आहे.

Image result for पोलिस

राहुरी : हातात बेड्या घातलेल्या दोन आरोपींनी पोलिसांना जोराचा धक्का देऊन पलायन केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिस आरोपींना घेऊन अधिक तपासासाठी राहुरी व संगमनेर हद्दीतील संशयित सहभागी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आले होते.

 मात्र, पोलिसांना धक्का देत आरोपींनी पोलिसांच्याच हातावर तुरी देत पलायन केले. ही घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या संदर्भात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 'आरोपी राजेंद्र बन्सी वारे (वय १९, रा. पळशी-माळवाडी, ता. पारनेर) व दुसरा आरोपी अविनाश वामन मधे (वय २०, रा. म्हसोबा झाप पोखरी, ता. पारनेर) यांना अधिक तपासाठी आणले होते.

मात्र, जोराचा धक्का देत आरोपींनी बेड्यांसह पलायन केले. त्यांचा पाठलाग करत असताना आरोपींनी दगडफेक केल्याने यात पोलिस उपनिरिक्षक पांचाळ यांचे डाव्या पायाला दुखापत झाली. डोंगराळ परिसर असल्याने आरोपींनी फायदा उचलला. पोलिस नाईक राजेंद्र मारुती हिले मंचर (पुणे) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस‍ निरिक्षक हनुमंत गाडे करीत आहेत.

Image result for bjp

नगर : नगर शहर जिल्हा भाजपने शनिवारी घेतलेल्या पक्ष सदस्य नोंदणीकडे महापौर बाबासाहेब वाकळेंसह भाजपच्या १२ नगरसेवकांनी पाठ फिरविली. या वेळी नगरसेवक भय्या गंधे व मनोज दुलम हे दोघेच उपस्थित होते; मात्र, अनुपस्थित काही नगरसेवकांची नातेवाईक मंडळी आवर्जून उपस्थित होती. भाजपअंतर्गत हा चर्चेचा विषय झाला आहे.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपच्या वतीने देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. शनिवारी नगरमध्ये शहर जिल्हा भाजप व जिल्हा ग्रामीण भाजप यांचे दोन स्वतंत्र कार्यक्रम झाले. शहर जिल्हा भाजपचा कार्यक्रम सकाळी सावेडीत प्रोफेसर कॉलनी चौकात झाला तर जिल्हा भाजपचा तुषार गार्डनमध्ये. महापालिकेत भाजपचे १४ नगरसेवक आहेत. परंतु, सकाळी झालेल्या कार्यक्रमास केवळ गंधे व दुलमच उपस्थित होते.

 महापौर, उपमहापौर व अन्य काही नगरसेवकांचे नातेवाईक मात्र आवर्जून आले होते. शहर जिल्हाध्यक्ष गांधींसह सरचिटणीस किशोर बोरा, ज्येष्ठ सदस्य सुनील रामदासी व श्रीकांत साठे, माजी नगरसेवक किशोर डागवाले तसेच अजय ढोणे, किशोर वाकळे, विश्‍वनाथ पोंदे, शिवाजी दहिहंडे, वसंत राठोड, विवेक नाईक, चेतन जग्गी, प्रशांत मुथा, तुषार पोटे, नितीन शेलार आदी या वेळी उपस्थित होते. 'भाजप जगातील सर्वांत मोठा पक्ष असून, या पक्षाचे आपण सभासद असल्याचा अभिमान बाळगावा,' असे आवाहन या वेळी माजी खासदार दिलीप गांधी यांनी केले.

Image result for राम शिंदें

कर्जत : 'पालकमंत्री राम शिंदे यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे,' असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जत येथे केले.
कर्जत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे उद्घाटन पालकमंत्री प्रा. राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. 

या वेळी नामदेव राऊत, प्रतिभा भैलुमे, अशोक खेडकर, शांतीलाल कोपनर, बाळासाहेब पाटील, संजय भैलुमे, भास्कर भैलुमे, दत्ता कदम, रोहन कदम, प्रसाद ढोकरीकर, काकासाहेब धांडे, अमृत काळदाते, अनिल गदादे, पप्पूशेठ नेवसे, वैभव शहा, वृषाली पाटील, मनीषा सोनमाळी, मोनाली तोटे, डॉ. कांचन खेत्रे, आशा क्षीरसागर, सतीश समुद्र, मुगेश नेवसे, रामदास हजारे नंदकूमार भैलुमे, मुख्याधिकारी अधिकारी साजिद पिंजारी, संतोष समुद्र उपस्थित होते.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इस्टर्न इकॉनॉमिक फोरम (ईईएफ) येथे उपस्थित राहण्यासाठी सप्टेंबरमध्ये रशियाला रवाना होतील.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या निमंत्रणाला खानने गेल्या महिन्यात मान्यता दिली होती. बिश्‍केकमधील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या दरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला होता. ईईएफचे अधिवेशन व्लादिवोस्तोकमध्ये 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी याविषयी माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : राजस्थानचे माजी मंत्र्यांनी बलात्कारप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बलात्कार अशी गोष्ट आहे जी थांबू शकत नाही. परंतु, बलात्काराच्या घटनांमध्ये ८७ टक्के वाढ चिंताजनक आहे, असे भाजपच्या मंत्र्यांनी म्हंटले आहे. भरतपूरमधील एका भाजपच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
भाजपचे माजी मंत्री कालीचरण सराफ यांनी म्हंटले कि, जयपूरमधील चिमुकलीशी लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे. राज्यात कायदा-व्यवस्था राखण्यात काँग्रेस सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. ते पुढे म्हणाले, भाजपच्या कार्यकाळातही अशाप्रकारच्या घटना होतात. परंतु, त्यावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणले आहे, असे त्यांनी सांगितले.
बेंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या कार्यालयाने आज कर्नाटकातील जनता दल सेक्युलर पक्षाच्या कर्नाटक सरकारमधील मुख्यमंत्री वगळता सर्व ११ मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची माहिती दिली आहे. जेडीएसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे सादर करण्याआधी मित्रपक्ष काँग्रेसच्या मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले असून आता कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकारची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार सत्तेवर असून मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह जेडीएसचे १२ तर काँग्रेसचे २२ मंत्री आहेत. दरम्यान, जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या १३ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सध्या जेडीएस-काँग्रेस प्रणित कर्नाटक सरकार अडचणींमध्ये सापडले असून नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख ‘राज ठाकरे’ यांनी आज (८ जुलै) ईव्हीएम घोटाळा प्रकरणी निवडणूक आयोगाची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. या पुढच्या महाराष्ट्रातील व इतर सर्व निवडणुका मतपत्रिकांवर घ्या, अशी मागणी राज ठाकरेंनी यावेळी आयोगाकडे केली आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी देखील संवाद साधला आहे.
'ह्या पुढच्या महाराष्ट्रातील व इतर सर्व निवडणुका कागदी मतपत्रिकांवर व्हाव्यात' हि आमची मुख्य मागणी आहे तीच आम्ही आयोगासमोर ठेवली. पण एकूणच त्यांच्याशी संवाद साधताना असं वाटलं कि, इतक्या महत्त्वाच्या समस्येवर आयोग फारसा गंभीर नाही. त्यामुळे आम्हाला आयोगाकडून शून्य अपेक्षा आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले कि, निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात आलं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही रस नाही. मात्र, आम्ही एक फॉरमॅलिटी म्हणून आयोगाकडे एक पत्र देखील दिले आहे. तसेच, मी त्यांना ईव्हीएम चिप कुठून येते असं विचारलं असता, अमेरिकेतून येत असल्याचं उत्तर मिळालं. त्यामुळे ईव्हीएम हॅक करण्यामागे परकीय शक्तीचा देखील हात असू शकतो. असं देखील राज ठाकरेंनी म्हंटल आहे.


बारामती : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये बारामती विधानसभा हे आमचे टार्गेट नाही, तर 2024 मध्ये बारामती लोकसभा हे आमचे टार्गेट आहे, असं स्पष्ट केलं. शिवाय बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेली कामे पाहता, 2019 मध्ये त्यांचा पराभव करणे हा निव्वळ आशावाद आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.
पिंपरी चिंचवडमध्ये आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

“पिंपरीला जे मी म्हटलं ते चुकीचं छापलं गेलं. मी असं म्हटलं की 2019 मध्ये बारामती विधानसभा आमचं टार्गेट नाही. 2024 ची लोकसभा हे आमचं टार्गेट आहे. पुढे मी असंही म्हटल, जे नॉर्मली राजकारणी उच्चारत नाही, मी वेगळ्या प्रकाराचा राजकारणी आहे. मी म्हणालो, बारामतीमध्ये अजितदादांनी एकूण केलेली कामं पाहता, तिथे 2019 पराभूत करतो असं म्हणणं आशावाद आहे. 

मी असं म्हटलं 2024 ची बारामती लोकसभा हे आमचं टार्गेट आहे. त्यामुळेच मी दर आठवड्याला इथे यायचं ठरवलं आहे. लोकांची कामं करुन भाजपबद्दल विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही करेन” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

2019 ची बारामती विधानसभा टार्गेट नाही. त्यामुळे माझं विधान योग्यरित्या छापा, ज्यामुळे अजितदादांनाही थोडं बरं वाटेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.


दिल्लीत मोठी घडामोड, राज ठाकरे आणि सोनिया गांधींची भेट

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीबाबत कोणतीही माहिती अगोदर देण्यात आली नव्हती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ईव्हीएम प्रश्नावर निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. 14 वर्षात पहिल्यांदाच राज ठाकरेंचा दिल्ली दौरा आहे. यानिमित्ताने त्यांनी राजकीय नेत्यांचीही भेट घेतल्याचं दिसून येतंय.

काँग्रेस सध्या पक्षासाठी नवा अध्यक्ष शोधत आहे. यूपीएच्या अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधींसोबतच भेट घेतल्यामुळे याकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं जातंय. कारण, लोकसभेला राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसच्या राज्यातील काही नेत्यांचा विरोध होता. पण नंतर काँग्रेसच्या नेत्यांनीच मनसेला सोबत घ्यायला हवं, असं मत व्यक्त केलं होतं. विधानसभेसाठी राज्यात नवं समीकरण जुळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ही सदिच्छा भेट होती की यामध्ये काही राजकीय चर्चा झाली याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “साखर उद्योग ज्या-ज्या वेळी अडचणीत आला, त्या-त्या वेळी राज्य सरकार मदतीला धावून आले. भविष्यातही सरकार कारखान्यांच्या मदतीला धावून येईल. मात्र, साखर कारखान्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे, तसे सहकार्य केलेले नाही. आम्ही नवीन योजना आणतो आहे, पण कारखाने आम्हाला सहकार्य करत नसल्याचे दिसत आहे. यापुढच्या काळात साखर कारखान्यांकडून मदतीची अपेक्षा आहे. कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्याने 2 वर्षात मोठी तूट निर्माण झाली आहे. साखर कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी आणि सरकारला कारवाई करण्यास भाग पाडू नये.”

यावेळी फडणवीसांनी साखर उद्योगाचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वही अधोरेखित केले. तसेच या उद्योगांना संकटाचा सामना करावा लागत असल्याचे कबूल केले. ते म्हणाले, “साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. साखर उद्योगात मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य सहकारी बँका देखील या उद्योगाच्या पाठीशी आहेत. मात्र, कारखाने अडचणीत आले, तर बँकाही अडचणीत येतात. मागील अनेक दिवसांपासून या उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. साखरेच्या जागतिक दरामुळे देशातील मार्केट थांबलंय.”

आगामी निवडणुकीत 'मिसेस मुख्यमंत्री' प्रचाराच्या रिंगणात

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार पत्नी अमृता फडणवीस करणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्तही जिथे गरज पडेल तिथे प्रचार करण्याचा प्रयत्न करेन, असं अमृता फडणवीस यांनी नागपूरमधील पाणीपुरवठा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभादरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले.

अमृता फडणवीस आता मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने याचा भाजपला फायदा होईल, असं म्हटलं जात आहे. अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांशिवाय इतरही उमेदवारांच्या प्रचाराला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक लिस्टमध्ये आता अमृता फडणवीस यांच्या नावाचाही समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये पाच वर्षापूर्वी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्यांनी गावाची पाहणी केली. गाव दत्तक घेतल्यापासून येथे अनेक कामं सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे येथील काम पाहण्यासाठी अमृता फडणवीस अधून मधून येत असतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचा अमेरिकेत नवा रॉक लुक समोर आला होता. अमृता फडणवीस यांनी अमेरिकेतील एका म्युझिक कन्सर्टमध्ये सहभाग नोंदवला होता. या शोचं आयोजन अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी केलं होतं. अमृता फडणवीस यांच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली.

Image result for राज ठाकरे

मुंबई: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष आपली रणनिती ठरवत असून त्यासाठी भेटी-गाठीही होत आहेत. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर आणि अनिल शिदोरे देखील आहेत. राज ठाकरेंच्या या दिल्ली वारीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे नेते सोमवारी (8 जुलै) दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. यावेळी ते निवडणूक आयुक्तांसमोर आपली ईव्हीएमबाबतची भूमिका मांडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात चांगलेच रान उठवले होते. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी सभाही घेतल्या आणि भाजपच्या धोरणांची चिरफाड केली. मात्र, लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहून त्यांनी एकाच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली, तो शब्द होता ‘अनाकलनीय’. या निकालानंतर राज ठाकरेंनी ईव्हीएमवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकांवरही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली भूमिका थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मांडणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही दुसऱ्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली होती. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. राजू शेट्टी यांनी याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा राज ठाकरेंच्या भेट घेतली. त्यामुळे अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. आगामी काळात महाराष्ट्रात नवी समीकरणं दिसण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच मुंबई काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधील राजीनामा सत्रात सहभागी होत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

मात्र मिलिंद देवरा यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या हेतूबाबतच पक्षाचे जेष्ठ नेते संजय निरुपम यांनी जाहीररीत्या प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये नव्याने सुरु झाल्या आहेत.

याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे आपली भूमिका मांडली असून ते म्हणतात, “राजीनामा देत असताना त्यामागे ‘त्यागाची’ भावना असणं अनिवार्य असतं. मात्र इथे तर राजीनाम्याच्या दुसऱ्याच क्षणी ‘राष्ट्रीय’ पातळीवरील पदाची मागणी केली जात आहे. हा राजीनामा आहे की मोठं पद काबीज करण्याची शिडी? पक्षाने अशा ‘कर्मठ’ लोकांपासून सावध राहावे.”
कोल्हापूर : मराठा आरक्षण कायद्याच्या सर्व कसोटीवर खरे उतरेल, यासाठी सर्वोच्च न्यायालयात निष्णांत कायदे तज्ज्ञांचे सहकार्य घेऊन राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व उपाय योजना सुरु केल्या आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या निर्णय प्रक्रियेत सक्रीय योगदान दिलेल्या मान्यवरांचा सकल मराठा समाज कोल्हापूरच्यावतीने येथील केशवराव भोसले नाट्यगृहात कृतज्ञता सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास राहिलेल्या मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत दाखल होणाऱ्या याचिकावेळी समाजाला दिलेले आक्षरण कायद्याच्या कसोटीवर खरे ठरण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात कायदे तज्ज्ञांची फौज उभी करेल, असे पाटील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातही राज्य शासन व सकल मराठा समाजाला टीम वर्क करावे लागेल.

Image result for ahmednagar मनपा

नगर : महापालिका कर्मचारी युनियनची कार्यकारिणी जाहीर झाली. अध्यक्षपदी अनंत लोखंडे, तर सरचिटणीसपदी आनंद वायकर यांची निवड झाली. प्रथमच सुमारे ३५ पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली आहे. तथापि, विजय बोधे यांनी या निवडीला आक्षेप घेत बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. 

युनियनची सभेत रविवारी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा विषय अजेंड्यावर होता. अध्यक्ष लोखंडे, सरचिटणीसपदी वायकर यांची फेरनिवड झाली. कार्याध्यक्षपदी पाशा शेख व गुलाब गाडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडीची सूचना जितेंद्र सारसर यांनी मांडली. 

त्याला पाशा शेख यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, काही झाडू कामगारांनी मागण्यांच्या पूर्ततेबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर अध्यक्ष लोखंडे यांनी आतापर्यंत केलेले काम व पुढील काळात प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विजय बोधे यांनी या निवडीला आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, कामगार युनियनने बुधवारीच पदाधिकारी निवडले आहेत. त्यामुळे या निवडीच्या सभेला काहीच अर्थ नाही. युनियनचे अध्यक्ष दबावाखाली काम करत आहेत. हा निर्णय मला मान्य नाही. त्यामुळे मी बाहेर पडत अाहे. ही प्रक्रिया लोकशाही पद्धतीने झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
इंदुर : भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपावर चहूबाजूंनी टीका होऊ लागली आहे. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणावरून भाजपा आणि संघावर निशाणा साधला आहे.
संघ अन् भाजपाचे लोक जमावाला हिंसेसाठी भडकावतात. देशात हिंसा होण्याची दोन कारणे आहेत. लोकांना वेळेवर न्याय मिळत नाही, त्यामुळे लोक भडकलेले असतात. तर दुसरे कारण हे भाजपा आणि आरएसएसचे लोक आहेत. संघाचे कार्यकर्ते जमावाला हिंसेसाठी भडकावतात. आकाश विजयवर्गीस म्हणाला होता, पहिल्यांदा अर्ज, विनंती देतो, तरीही नाही ऐकल्यास फटके देतो. या मानसिकतेमुळेच जमाव हिंसा करण्यासाठी प्रेरित होतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नेत्यांच्या अशा बेताल वागण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशा नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, असे वक्तव्य मोदींनी भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत केले होते.

आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीबाबत आपल्याला पश्चाताप होत नसल्याचे सोमवारी म्हटले होते. तसेच यापुढे महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचेदेखील विजयवर्गीय यांनी सांगितले होते. इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्या प्रकरणी आकाश यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. न्यायालयानं शनिवारी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते.मुंबई : राज्यात जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून यामध्ये 5 कोटी 13 लाख तुतीच्या रोपांची (‘रेशीम’रोपांची) लागवड होणार आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराची संधीही मिळणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुनगंटीवार म्हणाले की, दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसायासारखाच रेशीम शेती हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून ते जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो हे लक्षात घेऊन वृक्षारोपण कार्यक्रमात तुती लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

रेशीम संचालनालय “महारेशीम अभियान” राबवत आहे. त्यातून जास्तीत जास्त तुती लागवड व्हावी, असे आमचे प्रयत्न असून त्यादृष्टीने लोकांना प्रेरित, उद्युक्त आणि प्रोत्साहित करण्यात येत आहे. वन विभागाने तयार केली तुतीची रोपे सन 2019 मधील वृक्षारोपणात 5 कोटी 13 लाख तुती लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. रेशीम संचालनालय इतक्या मोठ्या संख्येने तुतीची रोपे तयार करू शकणार नाही. 

त्यांना असलेली मर्यादा विचारात घेऊन सामाजिक वनीकरण विभागाने तुतीची रोपे तयार करण्याची जबाबदारी उचलली आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून 1.72 कोटी रोपे रेशीम संचालनालयास दिली जातील व त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना रेशीम संचालनालय आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘रेशीम’ रोपांच्या अर्थात तुतीच्या लागवडीचे उद्दिष्ट राज्यात पूर्ण केले जाईल असा विश्वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील वर्चस्व कायम ठेवण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभेची जोरदार तयारी केली जात असताना विधानसभेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात कॉंग्रेसबरोबर आघाडीचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून पक्षाची ताकद पडताळणीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा प्रयत्न असला तरी यातून इंदापुरात मात्र पक्षाचीच कोंडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कारण, इंदापुरातून विधानसभा लढविण्यासाठी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आघाडीसह किंवा शिवाय, निवडणूक लढविणारच, अशी अनेकांची भूमिका असल्याने आघाडी झाली तरी कॉंग्रेसचे नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापुढे बंडखोरांचे आव्हान असणार, हे निश्‍चित मानले जात आहे.रत्नागिरी – मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले होते. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना २ जुलैला रात्री ८ ते ९च्या सुमारास ही घटना घडली असून आतपर्यंत २० मृतदेह सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या सहादिवसानानंतर दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. धरण परिसरात पोलिस आणि जिल्हा प्रशासन तसेच एनडीआरएफ शोधमोहीम सुरु आहे.
हरियाणा – हरियाणाची पॉप्युलर डान्सर सपना चौधरीने अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडला असून सपनाने भाजप सदस्य नोंदणीच्या अंतर्गत पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंघ चौहान भाजप सचिव रामलाल तसेह भाजप प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी उपस्थित होते.

तत्पूर्वी, सपना चौधरी मथुरा मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याची जोरदार चर्चा काल रंगली होती. मात्र सपना चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. तसेच “मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. चौधरी यांनी स्पष्ट केले”
चंदिगड – पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी राहुल गांधी यांच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर केवळ तरुण नेताच कॉंग्रेसला पुनरुज्जीवित करू शकतो, असे मत व्यक्त केले आहे.
कॅ. अमरिंदर सिंग पुढे बोलताना म्हणाले की, ‘कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने राहुल गांधींच्या जागी अशी व्यक्‍ती शोधावी जिचे व्यक्‍तिमत्त्व जादूई असेल. ती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करेल. ज्याची नाळ तळागळातील कार्यकर्त्यांशी जोडली असेल. 

गांधी यांनी पक्षामध्ये जिवंतपणा आणून त्याला उंचीवर नेण्यासाठी मार्ग दाखवून दिला आहे. आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 65 टक्‍के तरुण आहेत. त्यामुळेच हे नैसर्गिक आहे की, तरुण नेताच आजच्या तरुणांच्या इच्छा-आकांक्षा समजू शकेल. त्यामुळेच राहुल गांधींसारख्या तरुण नेत्याने कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडणे हे दुर्दैवी आहे. आता त्यांच्या जागी दुसऱ्या तरुण नेत्याची निवड करणे गरजेचे आहे’.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget