नगर शहरासह तालुक्‍यात पावसाची हजेरी



नगर – मृग नक्षत्रही कोरडे गेल्याने आणि पाऊस लांबल्याने चिंतातूर झालेल्या बळीराजाला गुरुवारी (दि.27) रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने दिलासा दिला आहे. नगर शहरासह तालुक्‍यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने, पेरण्यांना आता वेग येणार आहे. शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासूनच बी-बियाणांच्या दुकानात गर्दी केलेली दिसून येत होती.
नगर तालुक्‍यात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना चारा छावण्यांचा आधार घ्यावा लागला होता. यावर्षीही मान्सून पूर्व पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर जून महिना संपत आला तरी पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र, बुधवारी (दि.26) व गुरुवारी सायंकाळी नगर तालुक्‍यातील अनेक गावात आर्द्रा नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.
-

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget