ओढा गायब झाल्याने पाणी रस्त्यावरImage result for पाणी रस्त्यावर

नगर : 'सिद्धीबागेसमोर दरवर्षी पावसाळ्यात जे पाणी तुंबते, त्याला केवळ तेथील गटार किंवा कचरा कारणीभूत नाही. दूरवरून वाहत आलेला मोठा ओढा या ठिकाणापासून गायब झाल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला आहे,' असा दावा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, वैभवशाली अहमदनगर संस्थेचे भैरवनाथ वाकळे यांनी केला आहे.
दिल्ली गेटज‌वळ नीलक्रांती चौकात दर पावसाळ्यात पाणी साठते. अनेक उपाय केले तरी ही समस्या सोडविण्यात यश आलेले नाही. यावर्षीही तेथे पाणी साठले आहे. त्याच्या कारणांची सध्या चर्चा सुरू आहे. त्यासंबंधी वाकळे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, 'हा प्रश्न केवळ स्थानिक तात्पुरते उपाय करून सुटणारा नाही. या भागातून वाहणारा दूरवरून पाणी घेऊन येणारा ओढा न्यू आर्ट्स कॉलेजपासून पुढे सीना नदीपर्यंत गायब झाला आहे. त्यामुळे हे पाणी रस्त्यावरून वाहते. हा नाला नगर-औरंगाबाद रोडच्या पूर्वेकडून लष्करी हद्दीतील पाण्याच्या टाकीपासून सुरू झाला आहे. 

औरंगाबाद रोडवरील सरकारी निवासस्थाने, जुना आरटीओ, तारकपूर डेपो, सर्जेपुरा, पोलिस मुख्यालय, जिल्हा परिषद वसाहत, पोलिस कल्याण केंद्रामार्गे तो न्यू आर्ट्स कॉलेजपर्यंत येतो. इथपर्यंत ओढा खूप रूंद आहे. दूरवरून पाणी वाहून आणत असल्याने पावसाळ्यात तो तुडुंब भरून वाहतो. मात्र, न्यू आर्ट्स कॉलेजजवळ रस्ता ओलांडतानाच ओढा गायब झाला आहे. त्याचे रुपांतर अरुंद गटारात झाले आहे. हा ओढा पूर्वी बालिकाश्रम, बागरोजा हडको, नालेगाव अमरधाममार्गे सीना नदीला मिळत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो न्यू आर्ट्स कॉलेजपासून पुढे ओढा गायब झाल्याचे दिसते.

 त्यामुळे दूरवरून वाहून आलेले पाणी रस्त्यावरून वाहते. रस्ता खोलगट असल्याने सिद्धीबागेसमोर मोठ्याप्रमाणात पाणी साठून राहते. दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाला ओढा बुजविणारे भूखंड माफिया जबाबदार आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाणी साठणाऱ्या ठिकाणी स्थानिक उपाय करण्यापेक्षा या ओढ्याचा मूळ प्रवाह मोकळा करून देणे क्रमप्राप्त आहे. मधल्या प्रवासातही या ओढ्याचा ठिकठिकाणी नैसर्गिक मार्ग बदलण्यात आला आहे. काही ठिकाणी त्याची रूंदी कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे.'
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget