अकोले तालुक्यात एमआयडीसी स्थापन करावी -अकोले भाजपची निवेदन द्वारे मागणीअकोले- अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी स्थापन करण्यात यावी अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, डॉक्टर किरण लाहमटे , भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम यांनी उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका आहे तालुक्याची लोकसंख्या सात लाखांच्या पुढे आहे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे त्यासाठी तालुक्यात औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे.अकोले तालुक्यांमध्ये हे मुबलक जमीन व पाणी आहे या ठिकाणी एमआयडीसी उभे राहिल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटल्यास आदिवासी गोरगरीब दलित युवकांचा उन्नती होईल आणि अकोले तालुक्याच्या विकासाला हातभार लागेल अकोले तालुका हा डोंगराळ व भरपूर पाऊस पडणारा तालुका आहे विठे जवळची जागा एमआयडीसीसाठी आरक्षित केलेली आहे त्यामुळे येथे औद्योगिक वसाहत उभे राहू शकते तालुक्यातील युवक जे पुण्या मुंबईला कामाला जातात त्यांना तालुक्यात रोजगार उपलब्ध होईल अकोले तालुका हा मुंबई पुणे नाशिक या विकसित जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेला आहे वाहतुकीच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग, मुंबई आग्रा महामार्ग, या तालुक्याच्या कडेने जातो त्यामुळे या तालुक्याचा विकास करायचा असेल तर एमआयडीसी होणे ची गरज आहे नामदार सुभाष देसाई यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा मान्य केले.


Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget