मुंबईकरांना १० हजारांचा दंड का? नितेश राणेंचा सवाल!मुंबई : अवैध पार्किंगचे वाढते प्रमाण लक्षात घेता याला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १० हजारांच्या दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. यावर आमदार नितेश राणे यांनी आवाज उठवला आहे. ‘जे बिल्डर्स दिलेल्या एफएसआयचा वापर करतात, मात्र त्यामध्ये पार्कींग प्लॉट देत नाही. अशा बिल्डर्सवर पालिका कारवाई का करत नाही? दूसरीकडे मुंबईकरांकडून १० हजार रूपये पार्किंगसाठीचा दंड पालिका का घेत आहेत?’ असा सवाल आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

रस्त्यांवर व रस्त्यांलगत गाड्यांचे अवैध पार्किंग केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी होते. त्यामुळे महापालिकेच्या पार्किंग स्थळापासून एक किमीच्या अंतरातील ‘नो पार्किंग झोन’मध्ये गाड्यांचे अवैध पार्किंग केल्याचे आढळल्यास दहा हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. दंड न भरल्यास संबंधित वाहन ‘टोइंग मशीन’द्वारे उचलून नेले जाणार आहे. ७ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget