महसूल विभागाचा पुण्यात आणखी एक घोटाळा



मुंबई : पुण्यातील पर्वती येथे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आहे. रोहित शेंडे या वकिलाने उपसंचालक भुमी अभिलेख वानखेडे यांच्यासोबत व्यवहार करून पर्वती येथील १०० कोटी रूपयांच्या ८० गुंठे जमिनीचा व्यवहार केवळ १ कोटी ७० लाख रूपयात केला. त्यामुळे उपसंचालक भुमी अभिलेख वानखेडे यांचा वजीर कोण? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

पर्वती येथील ८० गुंठे जमिन ही विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतून एका दलित कुटूंबाला देण्यात आली होती. ती मिळावी म्हणून त्या दलित कुटूंबाच्या वारसांनी अर्ज केला तेव्हा उपसंचालक भुमी अभिलेख यांचा या प्रकरणात संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात लावून धरली. यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वानखेडे यांना निलंबित करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget