नगरमध्ये संततधार

Image result for नगरमध्ये संततधार

नगर : नगर शहर व उपनगराच्या परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. रिमझिम पावसामुळे शहरांतर्गत रस्त्यावर चिकचिक वाढली असून वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. गाडी घसरून अपघात होण्याचा धोका असल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे बहुतांश रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती.

शनिवारी सकाळपासूनच नगरमध्ये पावसाला सुरुवात झाली. या पावसाने रस्ते धुवून न गेल्यामुळे अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण साचली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये पाइपलाइन टाकणे, ड्रेनेजची दुरुस्ती, अशा विविध कामांसाठी रस्ते खोदण्यात आले होते. त्यानंतर अनेक रस्त्याची व्यवस्थित दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसानंतर आशा टॉकीज रोड, गुजर गल्ली, चितळे रोड, नेता सुभाष चौक, निलक्रांती चौक, शनी चौक, आडते बाजार, जीपीओ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, सावेडी उपनगरातील टिव्ही सेंटर परिसर, तपोवन रोड, अशा विविध मार्गांवर चिकचिक झाली आहे. अशा रस्त्यावरून गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने अनेक वाहनचालक संथगतीने गाडी चालवत होते. यापैकी बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरले होते. वाहन चालवताना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. रस्त्यावरील चिकचिकीमुळे पायी चालणाऱ्या नागरिकांचेही हाल झाले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget