घाटकोपर येथे संरक्षण भिंत कोसळली, ६ गाड्यांचे नुकसानमुंबई : मुंबईत दोन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पडझड होते आहे. घाटकोपर मध्ये जागृती नगर येथील एकविरा इमारतीची संरक्षक भिंत शनिवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. यामध्ये सहा गाड्यांचे नुकसान झाले.
रस्ते रुंदीकरण करताना या इमारतीच्या बाजूची दुकाने तोडण्यात आली होती. यामुळे या इमारतीचा आधार गेला होता. त्यात आज सकाळ पासून पाऊस कोसळतो आहे. यामुळे या संरक्षक भिंती जवळील झाडासह ही भिंत त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांसह खाली कोसळली.

सुदैवाने फक्त एकच मिनीट अगोदर या गाड्यांपासून एक कामगार पुढे गेला आणि काही क्षणात ही भिंत कोसळली. यात सहा गाड्यांचे नुकसान झाले. याला मुंबई मनपा जबाबदार असल्याचे एकविरा इमारती सोसायटीमधील रहिवाशांचे म्हणणे आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget