श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात रोपटे देऊन गुणवंतांचा सत्कार


नेवासा -(प्रतिनिधी) : नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात १२वी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार मुळा एज्युकेशन सोसायटीच्या प्रथेनुसार पुस्तक व रोपटे देऊन करण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अरुण घनवट यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.विजयकुमार डोळस यांनी केले. यावेळी कावेरी झरेकर, सोमनाथ ढोकणे, सौरभ खुळे, धैर्यशील बोरुडे, साक्षी ठाकर या गुणवंतांनी आपल्या भावना व्यक्त करताना महाविद्यालयाने केलेल्या मार्गदर्शनाचे आभार मानले. 

आभार प्रा.दशरथ आयनर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.राधा मोटे यांनी केले. कार्यक्रमास प्रा.ज्ञानेश्वर पुराणे, प्रा.मयूर जामदार, प्रा.सुभाष सोनवणे, प्रा.सुर्यकांत बर्डे, प्रा.संजय घावटे, प्रा.हरीश्चंद्र पंडित, प्रा.रामभाऊ दरवडे, प्रा.हरीश्चंद्र माने हे उपस्थित होते. मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख, सहसचिव डॉ.विनायक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी गुणवंतांना शुभेच्छा दिल्या.

गुणवंत खालीलप्रमाणे: 

कला शाखा:
1. कु.कावेरी संजय झरेकर : ८४%
2. पूजा भाऊसाहेब गवळी : ७५.८४%
3.अजय शिवाजी मोटे : ७५.३८%


वाणिज्य शाखा 

1. सोमनाथ भाऊसाहेब ढोकणे : ८२.९२%
2.प्रणाली सुभाष चक्रनारायण : ७८.३१%
2.पवन मच्छिंद्र शिरसाठ : ७८.३१%
3.श्रद्धा संतोष उंदरे : ७५.०८%

विज्ञान शाखा 

1.सौरभ कैलास खुळे : ८७.६९%
2.नम्रता सुधीर साळवे : ७५.८५%
3.आकांक्षा सुनिल शिंदे : ७५.५४%

सीईटी सेल 

1.सुवर्णरेखा बाळकृष्ण ठाणगे : नीट २६९ गुण
2.धैर्यशील प्रवीण बोरुडे : नीट २६७ गुण
3.साक्षी नानासाहेब ठाकर : नीट २१४ गुण

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget