पाच दिवसात ४४ टँकर बंद

Image result for टँकर बंद

नगर : जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाचे आगमन झाल्याने त्याचा परिणाम टँकरच्या संख्येवर झाला आहे. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यामध्ये ४४ टँकर बंद झाले आहेत. २४ जून रोजी जिल्ह्यात ८७३ टँकर सुरू होते. त्याद्वारे ६०३ गावे व तीन हजार ४०० वाड्यावस्त्यांवरील १४ लाख ५६ हजार ५४० नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. तर, सध्या जिल्ह्यामध्ये ८२९ टँकर सुरू असून त्याद्वारे ५७४ गावे व ३ हजार ३२७ वाड्यावस्त्यांवरील नागरिकांसाठी पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या १७ वर्षांचा विचार करता गतवर्षी जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे भूजल पातळीमध्येही कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून जिल्हा प्रशासनातर्फे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यंदा टँकरच्या संख्येने गेल्या १७ वर्षांतील उच्चांक गाठला होता. आतापर्यंत टँकरची सर्वाधिक संख्या २०१६ मध्ये ८२६ इतकी होती. यंदा ही संख्या ८७३ पर्यंत गेली होती. २४ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यात सर्वात जास्त टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू होते. या तालुक्यात १५२ टँकरद्वारे ११४ गावे व ६०६ वाड्यावस्त्यांवरील नागरिकांसाठी पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, या तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने टँकरची संख्याही झपाट्याने कमी होऊ लागली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये पाथर्डी तालुक्यातील ३५ टँकर बंद करण्यात आले आहेत. या तालुक्यात सध्या ११७ टँकर सुरू आहेत. याशिवाय गेल्या पाच दिवसांमध्ये शेवगाव तालुक्यातील ८ व श्रीगोंदा तालुक्यातील १ टँकर बंद झाले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास टँकरची संख्या अजून कमी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget