केतकी चितळेविरोधात अश्लिल कमेंट करणाऱ्या आणखी चार जणांना अटक

Image result for केतकी चितळे

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या आणखी चौघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काल (27 जून) मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी औरंगाबादेत जाऊन सतीश पाटील नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सतीश केशव नरोडे (23), अक्षय विजय बुराडे (25), पंकज महादेव पाटील (26), निनाद विलास पारकर(26) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. दरम्यान केतकीच्या व्हिडीओखाली अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या इतर लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांशी गप्पा करताना मराठी ऐवजी हिंदी भाषेचा उपयोग केला. त्यावेळी तिने फेसबूक लाईव्ह सुरु असताना मराठीचा अट्टाहास करत कमेंट करणाऱ्यांना तिने उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावरुनच केतकीला अश्लील भाषेत ट्रोलिंग करण्यात आले होते. या ट्रोलर्सना केतकी चितळेने तोडीस तोड उत्तर दिलं होतं.

दरम्यान यानंतर केतकीने गोरेगाव पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या व्हिडीओवर अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काल (28 जून) गोरेगाव पोलिसांनी थेट औरंगाबादमधील सतीश पाटील या व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी औरंगाबादहून सतीश नरोडे (23) याला 23 जूनला अटक केली आहे. या दोघांव्यतिरिक्त अक्षय विजय बुराडे ( 25) याला 26 जूनला उल्हासनगरहून, पंकज महादेव पाटील (26) याला 27 जूनला कोल्हापुरहून आणि निनाद विलास पारकर (26) याला मुंबईतून अटक केली आहे. या सर्वांवर 354/ड , 500, 504, 506, 507, 509, 67 ITI हे कलम लावण्यात आले आहेत.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget