वृक्षारोपणाने देवगड दिंडीचे स्वागत
नेवासा: येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाने श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर दिंडीचे स्वागत केले. याप्रसंगी ह.भ.प.गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते औदुंबर वृक्षाचे रोप महाविद्यालयास देण्यात आले. या उपक्रमातुन सर्व विद्यार्थी, शिक्षक, दिंडीतील वारकरी, स्थानिक रहिवाशी यांना वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. 

मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून ही अनोखी संकल्पना राबविण्यात आल्याचे प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापूरे यांनी सांगितले. संस्थेचे विश्वस्त शंकरराव गडाख पाटिल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या प्रसंगी उपप्राचार्य प्रा.अरुण घनवट, प्रदिप राजगिरे, अमृत फिरोदिया, प्रा.विजयकुमार डोळस, प्रा.चांगदेव कदम, प्रा.अजय पाटील, प्रा.देविदास साळुंके, डॉ.अमानुल्ला शेख, डॉ.वसंत सपकाळ, डॉ.संजय घनवट, प्रा.दशरथ आयनर, प्रा.रविंद्र आल्हाट, भारत शिंदे, सागर साळवे, हर्षद शिंदे हे उपस्थित होते.

Post a Comment

A unique activity , started by SDM Congrats to all and ALL THE BEST

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget