“राशी’च्या बनावट कापूस बियाणे विक्री केंद्रावर छापा

Image result for कापूस बियाणे विक्री केंद्रावर छापा

नेवासे – पावसाने हजेरी लावण्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून राशी या कापूस बियाणाला मोठी मागणी वाढत आहे. त्याचा फायदा घेवून राशी कंपनीच्या नावावर बनावट बियाणे विक्री होत असल्याच्या माहितीवरून  कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्‍यातील कुकाणा येथील एका विक्री केंद्रावर छापा टाकला. या छाप्यात 5 पॉकेटे आर.सी.एच. 659 राशी कंपनीच्या नावाचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले.

कुकाणे येथे एका दुकानातून राशीचे बनावट कापसाचे बियाणे विकले जात होते. शेवगाव तालुक्‍यातील दहीगाव ने येथील काशीद (पूर्ण नाव माहीत नाही) या शेतकऱ्याला शंका आल्यावर पिशवीवरील बारकोड पाहिला. राशी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मसेज पाठविला. तेव्हा राशी कंपनीने हा कोड कोणत्या ठिकाणाहून पाठविला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कुकाणा येथील जेऊर चौकातील कृषी केंद्रावर छापा टाकून 5 पॉकेट आर.सी.एच. 659 राशी वान जप्त केले. तसेच हा दुकानदार हे बियाणे विना पावतीची विक्री करत असल्याने तालुक्‍यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget