संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गात घुसू देऊ नका : पालखी समिती


Image result for संभाजी भिडे

पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना यंदाही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने यावेळी देखील पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं असून, पालखी सोहळ्यात कोणालाही घुसू देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहावा असं मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी म्हटलं आहे. त्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही असं बजावलं. त्यामुळे उद्या संभाजी भिडे आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमणार आहेत. त्यानंतर सर्व पालख्या पुढे गेल्यावर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहेत

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget