June 2019
नाशिक : आगामी विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजप हे जोरदार तयारीला लागले असतानाच, आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही जोरदार हालचालींना सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल (29 जून) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत बैठकीचे आयोजन केले होते.

 त्यानंतर आज (30 जून) नाशिकमध्ये काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसमध्ये सामील व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला बरोबर न घेतल्याने काँग्रेसला महाराष्ट्रात फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी वंचितने सोबत यावं अन्यथा आमचंही नुकसान होईल आणि तुमचंही असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.

लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत येत्या आठवडाभरात जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल असे काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले


लंडन : विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकात 306 धावा केल्या. विजयासाठी 338 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाचा इंग्लंडने 31 धावांनी पराभव झाला. दरम्यान हा सामना जिंकल्यामुळे इंग्लंडचे उपांत्य फेरीचे स्थान निश्चित झाले असले तरी पाकिस्तानची मात्र धाकधूक वाढली आहे.
इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर आज (30 जून) भारत विरुद्ध इंग्लंड सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताने विजय शंकर ऐवजी ऋषभ पंतला संधी दिली आहे. त्यामुळे ऋषभ पंतने यंदाच्या विश्वचषकात पदापर्ण केले.

इंग्लंडने दिलेल्या 337 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोघे मैदानात उतरले. मात्र दुसऱ्या षटकात लोकेश राहुल शून्य धावा करुन माघारी परतला आणि भारताला पहिला धक्का बसला. यामुळे टीम इंडियाची सुरुवातच अडखळत झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने सावध पावित्रा घेतला. त्यामुळे भारताला 14 षटकात 50 इतकीच धावसंख्या उभारता आली. त्यानंतर विराट आणि रोहित शर्माने खेळपट्टीवर चांगलाच तग धरुन ठेवला.

Image result for सुजय विखे

नगर : राजकीय साठमारी अन् प्रशासकीय अनास्थेमुळे ९ वर्षे उलटूनही नेहरू मार्केटच्या जागेवर नवीन संकुल उभा राहिले नाही. या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी चितळेरोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटनेच्यावतीने खासदार डॉ. सुजय विखे यांची भेट घेऊन करण्यात आली. याप्रश्नी शनिवारी (६ जुलै) महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ. विखे यांनी दिले. 

रविवारी जुने बसस्थानक येथे संपर्क कार्यालयात खासदार विखे यांनी घेतलेल्या जनता दरबारात संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी खासदार विखे यांचे नेहरु मार्केट प्रश्नी लक्ष वेधले. यावेळी अॅड. धनंजय जाधव, जितेंद्र लांडगे, अॅड. समीर वखारे, डॉ. सुहास कवडे आदी उपस्थित होते.
नगर – आगामी निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 12 विधानसभा मतदार संघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जात आहेत. येत्या 1 जुलैपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून येत्या 10 ते 15 जुलैपर्यंत उमेदवार निश्‍चित केले जाण्याची शक्‍यता आहे.
लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुन्हा नव्या जोमाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. 12 पैकी नऊ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा दावा पक्षाने केला आहे. अर्थात कॉंग्रेसने देखील सात मतदारसंघाची मागणी केली आहे. राष्ट्रवादीकडून अकोले, कोपरगाव, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, पारनेर, नेवासे, शेवगाव-पाथर्डी, राहुरी या जागांची मागणी करण्यात आली असून वेळ पडली तर शिर्डी मतदारसंघाची जागा देखील राष्ट्रवादी लढविण्यास तयार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

अर्थात कॉंग्रेसने देखील संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, नगर शहर, नेवासे या सात जागांवर दावा केला आहे. दोन्ही पक्षाच्या व्यासपीठावर जागांची मागणी करण्यात आली आहे. अद्याप दोन्ही कॉंग्रेसची एकत्रित जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा वाटपबाबत चर्चा झाली नाही. राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली असून इच्छुकांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 25 ते 1 जुलै या कालावधीत इच्छूकांकडून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. दाखल अर्जांनी 3 जुलैला मुंबईत छाननी होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर जिल्हानिहाय बैठका घेवून उमेदवार निश्‍चित करण्याचा मानस आहे.
पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खांबांची पडझड; युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू

नगर – झालेल्या वादळी पावसामुळे वीज महावितरण कंपनीचे तब्बल दीड कोटीचे नुकसान झाले आहे. वीजेचे खांब उनमळून पडल्याने विद्युत वाहक तारा देखील तुडल्या असून त्याचा परिणाम सध्या जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. नगर शहरात तब्बल तीन ते चार तास वीजपुरवठा केवळ दुरुस्ती करण्यासाठी खंडित ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागात देखील तीच स्थिती असल्याने नागरीक वैतागले आहेत. या वीज महावितरणकडून सध्या युद्धपातळीवर या दुरुस्तीचे कामे सुरू असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिली.


नगर शहरासह जिल्ह्यात सोमवारी (दि.10) रोजी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्याने व विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक तालुक्‍यातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. जोराच्या वाऱ्यात महावितरण विभागाचे नगर शहरात 27 मोठे खांब तर 440 व्होल्टचे 30 ते 35 खांब पडले आहेत. भिंगारमध्ये तब्बल 18 खांब वाकले तर काही पडले आहेत.

त्यासह आजअखेर जिल्ह्यात 1 हजारांहुन अधिक खांब पडले आहेत. तर अनेक घरांच्या सर्व्हिस केबल तुटल्या होत्या. त्याचे अद्यापही काम सुरु आहे. तसेच जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होत आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीज मंडळाकडून विद्युत तारांना अडथळे निर्माण होत असलेल्या झाडांच्या फांद्या काढणे आवश्‍यक होते. परंतु हे काम झाले नाही. त्यामुळे आज झाडासह विजेचे खांब उनमळून पडले आहेत. त्यात तारा देखील तुटून पडल्या आहेत.

नगर – नगर-सोलापूर रस्त्यावर अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून 2 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई गुरुवार (दि.27) रोजी करण्यात आली.
आरोपी सचिन सुरेश घोरपडे (वय-38, रा. छत्रपती चौक, कडा ता. आष्टी जि. बीड) यास ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहिती नुसार अवैधरीत्या विदेशी दारुची वाहतूक सचिन सुरेश घोरपडे हा त्याच्या वाहन (नं. एम.एच. 23 ई. 5415) मधून विदेशी दारु घेऊन, नगर-सोलापुर रस्त्याने कडा ता.आष्टी येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. 

त्यानुसार यापथकातील रवींद्र कर्डीले, सचिन आडबल, संदीप पवार यांनी कोठी चौकात सापळा रचवून आरोपीस ताब्यात घेतले. यामध्ये 13 हजार 200 रुपये किंमतीची विदेशी दारु व दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन 2 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकून 2 लाख 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने पौष्टीक आहाराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवात स्वत:च्या मंत्रालयापासून करण्यात येत आहे. आगामी काळात आरोग्य विभागांच्या बैठकीत बिस्कीट आणि फास्टफूडऐवजी उकडलेले चणे, बादाम आणि अक्रोडसारखे पदार्थ अधिका-यांना खाण्यासाठी ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने अध्यादेश काढला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-याने म्हटले की, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन खुद्द डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना फास्टफूडच्या सेवनाने होणा-या दुष्परिणामांची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय बैठकीतून बिस्कीट आणि फास्टफूड हटविण्याचे आदेश दिले आहे.

Image result for अटक

फरीदाबाद : हरियाणामधील काँग्रेसचे प्रवक्ते विकास चौधरी यांच्या हत्येवरून खळबळ माजली होती. फरीदाबाद पोलिसांना या हत्येचा छळा लावण्यात मोठे यश मिळाले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून यामध्ये एक कुख्यात गँगस्टर कौशल याची पत्नी रोशनी आणि दुसरा त्याचा घरगडी नरेश यांचा समावेश आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, गँगस्टर कौशलची पत्नी रोशनीच्या सांगण्यावरून नरेशने पिस्तुल उपलब्ध केल्या होत्या. तसेच कौशलच्या सांगण्यावरूनच रोशनीने हत्येचा कट रचला होता. विकास चौधरी यांच्यावर गोळी चालविणारा सचिन खेडी आणि विकास उर्फ भल्ले यांच्यासह त्यांच्या साथीदारांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे अधीक्षक अनिल कुमार यांनी सांगितले. आरोपींकडून एसएक्स-4 कारही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Image result for टँकर बंद

नगर : जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाचे आगमन झाल्याने त्याचा परिणाम टँकरच्या संख्येवर झाला आहे. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यामध्ये ४४ टँकर बंद झाले आहेत. २४ जून रोजी जिल्ह्यात ८७३ टँकर सुरू होते. त्याद्वारे ६०३ गावे व तीन हजार ४०० वाड्यावस्त्यांवरील १४ लाख ५६ हजार ५४० नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. तर, सध्या जिल्ह्यामध्ये ८२९ टँकर सुरू असून त्याद्वारे ५७४ गावे व ३ हजार ३२७ वाड्यावस्त्यांवरील नागरिकांसाठी पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या १७ वर्षांचा विचार करता गतवर्षी जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे भूजल पातळीमध्येही कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून जिल्हा प्रशासनातर्फे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यंदा टँकरच्या संख्येने गेल्या १७ वर्षांतील उच्चांक गाठला होता. आतापर्यंत टँकरची सर्वाधिक संख्या २०१६ मध्ये ८२६ इतकी होती. यंदा ही संख्या ८७३ पर्यंत गेली होती. २४ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यात सर्वात जास्त टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू होते. या तालुक्यात १५२ टँकरद्वारे ११४ गावे व ६०६ वाड्यावस्त्यांवरील नागरिकांसाठी पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, या तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने टँकरची संख्याही झपाट्याने कमी होऊ लागली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये पाथर्डी तालुक्यातील ३५ टँकर बंद करण्यात आले आहेत. या तालुक्यात सध्या ११७ टँकर सुरू आहेत. याशिवाय गेल्या पाच दिवसांमध्ये शेवगाव तालुक्यातील ८ व श्रीगोंदा तालुक्यातील १ टँकर बंद झाले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास टँकरची संख्या अजून कमी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.Image result for पाणी रस्त्यावर

नगर : 'सिद्धीबागेसमोर दरवर्षी पावसाळ्यात जे पाणी तुंबते, त्याला केवळ तेथील गटार किंवा कचरा कारणीभूत नाही. दूरवरून वाहत आलेला मोठा ओढा या ठिकाणापासून गायब झाल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला आहे,' असा दावा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, वैभवशाली अहमदनगर संस्थेचे भैरवनाथ वाकळे यांनी केला आहे.
दिल्ली गेटज‌वळ नीलक्रांती चौकात दर पावसाळ्यात पाणी साठते. अनेक उपाय केले तरी ही समस्या सोडविण्यात यश आलेले नाही. यावर्षीही तेथे पाणी साठले आहे. त्याच्या कारणांची सध्या चर्चा सुरू आहे. त्यासंबंधी वाकळे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, 'हा प्रश्न केवळ स्थानिक तात्पुरते उपाय करून सुटणारा नाही. या भागातून वाहणारा दूरवरून पाणी घेऊन येणारा ओढा न्यू आर्ट्स कॉलेजपासून पुढे सीना नदीपर्यंत गायब झाला आहे. त्यामुळे हे पाणी रस्त्यावरून वाहते. हा नाला नगर-औरंगाबाद रोडच्या पूर्वेकडून लष्करी हद्दीतील पाण्याच्या टाकीपासून सुरू झाला आहे. 

औरंगाबाद रोडवरील सरकारी निवासस्थाने, जुना आरटीओ, तारकपूर डेपो, सर्जेपुरा, पोलिस मुख्यालय, जिल्हा परिषद वसाहत, पोलिस कल्याण केंद्रामार्गे तो न्यू आर्ट्स कॉलेजपर्यंत येतो. इथपर्यंत ओढा खूप रूंद आहे. दूरवरून पाणी वाहून आणत असल्याने पावसाळ्यात तो तुडुंब भरून वाहतो. मात्र, न्यू आर्ट्स कॉलेजजवळ रस्ता ओलांडतानाच ओढा गायब झाला आहे. त्याचे रुपांतर अरुंद गटारात झाले आहे. हा ओढा पूर्वी बालिकाश्रम, बागरोजा हडको, नालेगाव अमरधाममार्गे सीना नदीला मिळत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो न्यू आर्ट्स कॉलेजपासून पुढे ओढा गायब झाल्याचे दिसते.

 त्यामुळे दूरवरून वाहून आलेले पाणी रस्त्यावरून वाहते. रस्ता खोलगट असल्याने सिद्धीबागेसमोर मोठ्याप्रमाणात पाणी साठून राहते. दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाला ओढा बुजविणारे भूखंड माफिया जबाबदार आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाणी साठणाऱ्या ठिकाणी स्थानिक उपाय करण्यापेक्षा या ओढ्याचा मूळ प्रवाह मोकळा करून देणे क्रमप्राप्त आहे. मधल्या प्रवासातही या ओढ्याचा ठिकठिकाणी नैसर्गिक मार्ग बदलण्यात आला आहे. काही ठिकाणी त्याची रूंदी कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे.'

Image result for नगरमध्ये संततधार

नगर : नगर शहर व उपनगराच्या परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. रिमझिम पावसामुळे शहरांतर्गत रस्त्यावर चिकचिक वाढली असून वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. गाडी घसरून अपघात होण्याचा धोका असल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे बहुतांश रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती.

शनिवारी सकाळपासूनच नगरमध्ये पावसाला सुरुवात झाली. या पावसाने रस्ते धुवून न गेल्यामुळे अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण साचली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये पाइपलाइन टाकणे, ड्रेनेजची दुरुस्ती, अशा विविध कामांसाठी रस्ते खोदण्यात आले होते. त्यानंतर अनेक रस्त्याची व्यवस्थित दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसानंतर आशा टॉकीज रोड, गुजर गल्ली, चितळे रोड, नेता सुभाष चौक, निलक्रांती चौक, शनी चौक, आडते बाजार, जीपीओ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, सावेडी उपनगरातील टिव्ही सेंटर परिसर, तपोवन रोड, अशा विविध मार्गांवर चिकचिक झाली आहे. अशा रस्त्यावरून गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने अनेक वाहनचालक संथगतीने गाडी चालवत होते. यापैकी बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरले होते. वाहन चालवताना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. रस्त्यावरील चिकचिकीमुळे पायी चालणाऱ्या नागरिकांचेही हाल झाले.संगमनेर - ध्येय उद्योग समूहाची शैक्षणिक क्षेत्रातील अखंड उज्वल यशाची परंपरा असलेली 1500 पेक्षा जास्त विध्यार्थीची प्रशासकीय सेवेत निवड झालेली 'ध्येय करिअर अकॅडमी'  संगमनेर व अकोले आयोजित  गरीब व गरजू विद्यार्थीसाठी 'कमवा व शिका' योजनेअंतर्गत स्कॉलरशिप पोलीस भरती पूर्व पात्रता परीक्षा दिनांक 30 जून 2019 रोजी सह्याद्री विद्यालय,नाशिक पुणे रोड ,संगमनेर, जि. अहमदनगर या ठिकाणी परीक्षा होणार आहे. या ठिकाणी नावनोंदणी सकाळी वेळ9 ते 11 व परीक्षा वेळ 11 ते 12:30 या वेळेत होणार असल्याची माहिती ध्येय करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष लहानु निवृत्ती सदगीर यांनी दिली.
पात्रता परीक्षा मधील
गुणवत्तेनुसार पहिल्या 25 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश ध्येय करिअर अकॅडमी संगमनेर या ठिकाणी ९ महिने प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.
गुणवत्तेनुसार दुसऱ्या 25 विद्यार्थ्यांना फी मध्ये ५०% सूट ध्येय करिअर अकॅडमी अकोले व संगमनेर दोन्ही शाखेत प्रवेश दिला जाणार आहे .
परीक्षेचा अभ्यासक्रम मराठी अंकगणित ,बुद्धिमत्ता,सामान्य ज्ञान ,चालू घडामोडी ,परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.अधिक माहिती साठी संस्थापक अध्यक्ष लहानु सदगीर 8600234339, नितीन खेमनर (संगमनेर) 9326906161 , गोरक्ष सदगीर (अकोले शाखा व्यवस्थापक) : 9422605472
नवनाथ होलगीर: (अकोले शाखा व्यवस्थापक) : 9082824670 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .मुंबई : पुण्यातील पर्वती येथे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आहे. रोहित शेंडे या वकिलाने उपसंचालक भुमी अभिलेख वानखेडे यांच्यासोबत व्यवहार करून पर्वती येथील १०० कोटी रूपयांच्या ८० गुंठे जमिनीचा व्यवहार केवळ १ कोटी ७० लाख रूपयात केला. त्यामुळे उपसंचालक भुमी अभिलेख वानखेडे यांचा वजीर कोण? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

पर्वती येथील ८० गुंठे जमिन ही विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतून एका दलित कुटूंबाला देण्यात आली होती. ती मिळावी म्हणून त्या दलित कुटूंबाच्या वारसांनी अर्ज केला तेव्हा उपसंचालक भुमी अभिलेख यांचा या प्रकरणात संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात लावून धरली. यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वानखेडे यांना निलंबित करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.मुंबई : अवैध पार्किंगचे वाढते प्रमाण लक्षात घेता याला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १० हजारांच्या दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. यावर आमदार नितेश राणे यांनी आवाज उठवला आहे. ‘जे बिल्डर्स दिलेल्या एफएसआयचा वापर करतात, मात्र त्यामध्ये पार्कींग प्लॉट देत नाही. अशा बिल्डर्सवर पालिका कारवाई का करत नाही? दूसरीकडे मुंबईकरांकडून १० हजार रूपये पार्किंगसाठीचा दंड पालिका का घेत आहेत?’ असा सवाल आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

रस्त्यांवर व रस्त्यांलगत गाड्यांचे अवैध पार्किंग केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी होते. त्यामुळे महापालिकेच्या पार्किंग स्थळापासून एक किमीच्या अंतरातील ‘नो पार्किंग झोन’मध्ये गाड्यांचे अवैध पार्किंग केल्याचे आढळल्यास दहा हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. दंड न भरल्यास संबंधित वाहन ‘टोइंग मशीन’द्वारे उचलून नेले जाणार आहे. ७ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.मुंबई : मुंबईत दोन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पडझड होते आहे. घाटकोपर मध्ये जागृती नगर येथील एकविरा इमारतीची संरक्षक भिंत शनिवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. यामध्ये सहा गाड्यांचे नुकसान झाले.
रस्ते रुंदीकरण करताना या इमारतीच्या बाजूची दुकाने तोडण्यात आली होती. यामुळे या इमारतीचा आधार गेला होता. त्यात आज सकाळ पासून पाऊस कोसळतो आहे. यामुळे या संरक्षक भिंती जवळील झाडासह ही भिंत त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांसह खाली कोसळली.

सुदैवाने फक्त एकच मिनीट अगोदर या गाड्यांपासून एक कामगार पुढे गेला आणि काही क्षणात ही भिंत कोसळली. यात सहा गाड्यांचे नुकसान झाले. याला मुंबई मनपा जबाबदार असल्याचे एकविरा इमारती सोसायटीमधील रहिवाशांचे म्हणणे आहे.

संगमनेर - अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार या विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री रामविजय शेळके श्री भाऊराव धोंगडे श्री रघुनाथ मेंगाळ , राहुल जाधव , विश्वास पोखरकर , बाळासाहेब डगळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. 

या प्रसंगी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्या विषयी माहिती सांगितली . जवळजवळ विद्यालयातील संव्वीस विद्यार्थ्यांनी भाषणे केली . 

यावेळी अध्यक्षीय स्थानावरुण विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री रामविजय शेळके बोलत होते बहुजन समाजाला गूलामगिरीच्या दलदलितुन बाहेर काढुण स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे जनक , थोर समाज सुधारक , आदर्श शासनकर्ते म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज . 

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला . त्यांनी कोल्हापूर संस्थांनात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले . स्त्री शिक्षणाचा प्रसार केला . सुवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरण्याची पद्धत बंद केली . जाती भेद दुर करण्यासाठी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला . या व्यापक दुरदृष्टीच्या राजाने त्याकाळी राजेशाही असतात सुध्दा सामाजिक बंधुभाव , समता , दलित , उपेक्षित बांधवांचा उंधार , शिक्षण , शेती , उद्योगधंदे , कला , क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रातमध्ये आजच्या लोकशाहीतील शासनालाही करणे शक्य नाही असे अद्वितीय कार्य राजर्षी शाहू महाराज यांनी केले .
या कार्यक्रम प्रसंगी संजय ठोकळ , राजेंद्र गिरी , हेमंत बेनके , चेतन सरोदे , संतोष भांगरे , भारत हासे , मडके, गोसावी मंगेश औटी , बंटी फटांगरे , गणेश फटांगरे ,मनोहर कचरे, उपस्थित होते .
सुत्रसंचालन कोमल साळुंके हिने केले व आभार हर्षदा घुले हिने मानले.अकोले- अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी स्थापन करण्यात यावी अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, डॉक्टर किरण लाहमटे , भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम यांनी उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका आहे तालुक्याची लोकसंख्या सात लाखांच्या पुढे आहे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे त्यासाठी तालुक्यात औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे.अकोले तालुक्यांमध्ये हे मुबलक जमीन व पाणी आहे या ठिकाणी एमआयडीसी उभे राहिल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटल्यास आदिवासी गोरगरीब दलित युवकांचा उन्नती होईल आणि अकोले तालुक्याच्या विकासाला हातभार लागेल अकोले तालुका हा डोंगराळ व भरपूर पाऊस पडणारा तालुका आहे विठे जवळची जागा एमआयडीसीसाठी आरक्षित केलेली आहे त्यामुळे येथे औद्योगिक वसाहत उभे राहू शकते तालुक्यातील युवक जे पुण्या मुंबईला कामाला जातात त्यांना तालुक्यात रोजगार उपलब्ध होईल अकोले तालुका हा मुंबई पुणे नाशिक या विकसित जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेला आहे वाहतुकीच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग, मुंबई आग्रा महामार्ग, या तालुक्याच्या कडेने जातो त्यामुळे या तालुक्याचा विकास करायचा असेल तर एमआयडीसी होणे ची गरज आहे नामदार सुभाष देसाई यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा मान्य केले.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी -महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी जहागिरदारवाडी ( ता. अकोले ) येथील महिला ग्रामस्थांनी गावकीची विहीर कोणत्याही सरकारी मदतीशिवाय गाळ उपसा केली.
या गावाला कळसूबाई सारखे उंच शिखर लाभले आहे तरी या गावाला अजून कोणतीही मोठी सरकारी मदत मिळाली नाही

शेवटी सरकारी मदतीची वाट न बघता स्वतः महिलांनी विहिरीतील गाळ उपसा करायला सुरुवात केली मोजक्या पुरुष मंडळींनी साथ दिली.
ग्रामपंचयातीकडून गाळ काढण्यासाठी निधी असतो पण या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गेले 7-8 महिने झाले फरार आहेत. सोबत ग्रामपंचायतीचे दप्तर अजून त्यांनी जमा केले नाही. तसेच नवीन ग्रामसेवक 2- 3 महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपावर नेमलेले आहेत पण त्यांना अजून दप्तर मिळालेले नाही. यावर अकोले पंचायत समिती येथील अधिकारी वर्गाला विचारणा केली असता उडवा उडावीची उत्तरे दिली जातात.
यावर ठोस असा निर्णय घ्यावा अशी मागणी गावकरी मंडळींनी केली आहे.
विहिरीतील गाळ काढतांना जर कोणतीही हानी झाली असती तर याला जबाबदार कोण असेल.कारणं चार वर्षांपूर्वी गाळ उपसायला गेलेल्या गावातील एका मजुराचा पाय सटकून मार लागला होता.
गेला महिना झाला या गावात पाणी सोडण्यात आले नाही गावातील माणसे वणवण पाण्यासाठी भटकत आहेत. भंडारदरा धरणांमधून पाणी आणलेले आहे पण त्या पाण्याचा जहागिरदारवाडी ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही. पाण्यावर काही लोकांचे राजकारण चालू आहे.
मुळात भंडारदरा धरणात जे तीन गावांसाठी मोटार बसविण्यासाठी जो ब्रिज बांधला आहे त्याचा पैसा फुकट त्या ठिकाणी घालवलेला आहे कारण तो पैसा जर भंडारदरा धरणाच्या खालच्या बाजूला पाईप पसरवण्यासाठी घातला असता तर सतत जी मोटार धरणांमधील पाणी खाली गेल्यावर ढकलावी लागते तो ताण तीन ग्रामपंचायतीचा वाचला असता.
आणि मोटार जळण्याचे प्रमाण कमी झाले असते. यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे ग्रामस्थांनी मागणी केली आहे. या सामाजीक कामात संतोष खाडे, अंकुश करटुले,मच्छिंद्र खाडे, सुरेश घारे, एकनाथ रोंगटे आदी तरुण तसेच मंदाबाई खाडे, यमुना दराने, अंबाबाई खाडे, द्रौपदा खाडे, आशा खाडे, सुशिला भांगरे, जिजाबाई भांगरे, फसाबाई दराने, संगिता भागडे, जयश्री खाडे,मिना खाडे, गंगुबाई खाडे,झुंबरबाई खाडे, मिराबाई करुटुले, जनाबाई खाडे, सुनंदा करुटुले, कमल दराने, गिरीजाबाई खाडे, मिरा खाडे, अनिता खाडे, सुरेखा दराने आदी ग्रामस्थ तसेच महिलांसह बहुतेक ग्रामस्थ तरुणांनी श्रमदान करून विहीरीतील गाळ उपसा केला. या सामाजीक कार्याची तालुक्यात जोरदार चर्चा होत असुन सर्वत्र कौतुक होत आहे.


कोल्हार -(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द संत शिरोमणी सावता महाराज पायी दिंडीचे शुक्रवारी सकाळी १०वा. भक्तीमय व उत्साही वातावरणात पंढरपूर कडे प्रस्थान झाले. यावेळी ह. भ.प लहानू बाबा झावरे महाराज, शंकर महाराज लोखंडे, भाऊसो, शिरसाठ, मनोहर लोखंडे, बबन जाधव, राऊत, विट्ठल शिंदे, प्रमोद मंडलीक, विठ्ठल गोपाळे, बापु शिंदे, महिपती शिरसाट, भाऊसो लोंढे, सुभाष अनाप, यांच्यासह वारकरी व ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते,

जात प्रमाणपत्र नसेल तर फक्त पालकांचं हमीपत्र द्या, मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. हायकोर्टाने आरक्षण कायम ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे जातीचं प्रमाणपत्र नसेल तर त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय, शिवाय त्याजागी प्रवेश घेताना पालकांचं हमीपत्र स्वीकारलं जाईल. अकरावी प्रवेशाची अंतिम तारीखही वाढवण्यात आली आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आरक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SEBC प्रवर्गात अर्ज करता येण्यासाठी या निर्णयामुळे मदत होईल.

अकरावीत SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी 12 टक्क्यांप्रमाणे 34251 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या प्रवर्गात केवळ 4 हजार 357 अर्ज आले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गात अर्ज केल्याचं शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गात अर्ज केलेल्या मराठा समाजातील (SEBC) विद्यार्थ्यांना आता प्रवर्ग बदलण्याची मुभा देण्यासाठी वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.

Image result for स्मृती इराणीं

नवी दिल्ली : मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी, अशी मागणी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केली. या प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मराठीतून उत्तर दिलं. मी महाराष्ट्राचीच असून मलाही शेतकऱ्यांच्या समस्या माहित आहेत, निश्चितच शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं उत्तर स्मृती इराणी यांनी दिलं.
स्मृती इराणी यांच्यासाठी प्रीतम मुंडेंनी इंग्रजीतून प्रश्न विचारला होता. पण मलाही मराठी येते, असं म्हणत स्मृती इराणी यांनी मराठीत उत्तर दिलं. महिला आणि बालकल्याण विभागासह वस्त्रोद्योग खातंही स्मृती इराणी यांच्याकडेच आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग विभागाने कापूस उत्पादक जिल्ह्यांकडे लक्ष द्यावं, ज्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल, अशी मागणी प्रीतम मुंडेंनी केली होती. शक्य ती मदत मराठवाड्याला केली जाईल, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

Image result for अशोक चव्हाण

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. महाराष्ट्रात काँग्रेस अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. त्यांच्यासह काँग्रेसच्या इतर प्रदेशाध्यक्षांनीही राजीनामे दिले होते. पण अशोक चव्हाण यांचा राजीनामा अजून स्वीकारण्यात आला नव्हता.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अध्यक्षांपासून ते प्रदेशाध्यक्षांपर्यंत दिग्गजांचा पराभव झाला होता. राहुल गांधींनीही राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव झाला होता. शिवाय काँग्रेसला राज्यात केवळ एक जागा मिळवता आली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने नांदेड आणि हिंगोली या जागा जिंकल्या होत्या, त्या जागा राखण्यातही काँग्रेसला अपयश आलं.

Image result for गोदाम फोडले

नगर – नगर एमआयडीसी येथील सेफ एक्‍सप्रेस प्रायव्हेट लिमेटेड ट्रान्सपोर्टचे गोदाम अज्ञात चोरट्यांनी फोडले असून, 15 लाख 81 हजार 10 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत राकेशकुमार पांडे (वय-34. रा. मूळ बबनपुरा, अभईपुरा, ता. जमानिया, जि. गाजेपुरा, रा. उत्तर प्रदेश, हल्ली रा. पूजा कार एसी जवळ, कॉटेज कॉर्नर सावेडी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, सेफ एक्‍सप्रेस प्रायव्हेट लिमेटेड ट्रान्सपोर्टच्या गोदामाच्या शटरचा पत्रा उचकटून त्यामधून 89 हजार 674 रुपये किमतीचे चार एसी, 90 हजार रुपयांचे एल ऍण्ड टी कंपनीचे इलक्‍ट्रिक पार्ट, 4 लाख 25 हजार 280 रुपयांचे 28 बेअरिंग बॉक्‍स यांसह 15 लाख 81 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. सहारे पुढील तपास करत आहेत.

Image result for कापूस बियाणे विक्री केंद्रावर छापा

नेवासे – पावसाने हजेरी लावण्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून राशी या कापूस बियाणाला मोठी मागणी वाढत आहे. त्याचा फायदा घेवून राशी कंपनीच्या नावावर बनावट बियाणे विक्री होत असल्याच्या माहितीवरून  कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्‍यातील कुकाणा येथील एका विक्री केंद्रावर छापा टाकला. या छाप्यात 5 पॉकेटे आर.सी.एच. 659 राशी कंपनीच्या नावाचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले.

कुकाणे येथे एका दुकानातून राशीचे बनावट कापसाचे बियाणे विकले जात होते. शेवगाव तालुक्‍यातील दहीगाव ने येथील काशीद (पूर्ण नाव माहीत नाही) या शेतकऱ्याला शंका आल्यावर पिशवीवरील बारकोड पाहिला. राशी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मसेज पाठविला. तेव्हा राशी कंपनीने हा कोड कोणत्या ठिकाणाहून पाठविला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कुकाणा येथील जेऊर चौकातील कृषी केंद्रावर छापा टाकून 5 पॉकेट आर.सी.एच. 659 राशी वान जप्त केले. तसेच हा दुकानदार हे बियाणे विना पावतीची विक्री करत असल्याने तालुक्‍यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.नगर – महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील रस्ते आणि कर्मचाऱ्यांचा गैरवापरावर सदस्यांनी जोरदार टीका केली. शिवेसेनेचे योगीराज गाडे यांनी रस्त्याच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत मागील तीन वर्षात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली तर जुन्या पदाधिकाऱ्यांच्या घरी महापालिकेचे कर्मचारी कामाला असल्याचा आरोप सुभाष लोंढे यांनी केला.

स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली आज सभा झाली. उपायुक्‍त सुनील पवार व प्रदीप पठारे, सदस्य कुमार वाकळे, अमोल येवले, गणेश कवडे, दिपाली बारस्कर व मनोज कोतकर हे सभेला उपस्थित होते. या सभेसमोर तब्बल 40 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. पाणी पुरवठ्याच्या “फेज-2′ योजनेच्या मुद्यावर या सभेतही वादंग झाले. 11 वर्षापासून ही योजना रखडल्याबद्दल सदस्यांनी तीव्र भावना व्यक्‍त केल्या.नगर – मृग नक्षत्रही कोरडे गेल्याने आणि पाऊस लांबल्याने चिंतातूर झालेल्या बळीराजाला गुरुवारी (दि.27) रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने दिलासा दिला आहे. नगर शहरासह तालुक्‍यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने, पेरण्यांना आता वेग येणार आहे. शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासूनच बी-बियाणांच्या दुकानात गर्दी केलेली दिसून येत होती.
नगर तालुक्‍यात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना चारा छावण्यांचा आधार घ्यावा लागला होता. यावर्षीही मान्सून पूर्व पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर जून महिना संपत आला तरी पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र, बुधवारी (दि.26) व गुरुवारी सायंकाळी नगर तालुक्‍यातील अनेक गावात आर्द्रा नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.
-

Image result for मराठा

मुंबई : मराठा आरक्षणाचं काय होणार याचा फैसला आज झाला. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करत, आरक्षण वैध ठरवलं. मुंबई उच्च न्यायलयात मराठा आरक्षणाबाबत महत्वपूर्ण आणि अंतिम निकाल घोषित केला जाणार असल्यामुळे राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं.
देवेंद्र फडणवीस सरकारने 29 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा समाजाला SEBC अंतर्गत नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण दिलं. मात्र त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या. याबाबत विविध युक्तीवाद झाल्यानंतर आज हायकोर्ट आपला अंतिम निर्णय देत आहे. मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठतंर्गत या प्रकरणी निर्णय देण्यात आला.

Related image

मुंबई : सर्वांच्या सहकार्याने एक निर्णायक लढाई जिंकलो. ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का न लावता मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. या लढाईत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर विधानसभेत आपलं निवेदन सादर केलं.
राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं होतं. मात्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि नोकरीत 13 टक्के आरक्षणाची शिफारस केली होती. तीच मागणी हायकोर्टाने मान्य केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शिक्षणामध्ये 12 टक्के तर नोकऱ्यात 13 टक्के आरक्षण देण्याला हायकोर्टाची मंजुरी, राज्य मागासवर्ग आयोगाने अत्यंत कमी काळात काम पूर्ण केलं, त्यांचं आभार, विधीमंडळ सभागृहाचं आभार, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी काम करणारे समन्वयक, चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वातील मंत्र्यांची समिती, तसंच हायकोर्टाचे आभार मानतो, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

आघाडी वि. युती सरकार : फडणवीसांनी दिलेलं आरक्षण का टिकलं?

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं 16 टक्के आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं. आम्ही दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकवून दाखवू, असा दावा छातीठोकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा केला होता. 

हे आरक्षण दिल्यानंतर पाचच दिवसात याविरोधात पहिली याचिका दाखल झाली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कोर्टातही टिकलं, मात्र यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टापुढे का टिकलं नाही हा खरा प्रश्न आहे. त्यामागे घटनात्मकदृष्ट्या अनेक कारणं आहेत.

मराठा समाजाला यापूर्वीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने आरक्षण दिलं, पण ते कोर्टात टिकू शकलं नाही आणि मराठा समाजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली. आरक्षण हे 50 टक्क्यांपेक्षा जास्त देता येणार नाही आणि दिलं तर ते घटनाबाह्य असेल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणामध्ये दिला होता. त्यामुळे आघाडी सरकारने जुलै 2014 मध्ये जे आरक्षण दिलं ते टिकणार नाही हे तेव्हाच स्पष्ट होतं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सपाटून मार खाल्ला होता. विधानसभा निवडणूक तोंडावर होती. कॅबिनेटने मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा जून 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली. सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आरक्षणाची मर्यादा तेव्हाच ओलांडली होती त्यामुळे हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही हे स्पष्ट होतं.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज झोप लागणार नाही : गिरीश महाजन

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं 16 टक्के आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं. आम्ही दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकवून दाखवू, असा दावा छातीठोकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा केला होता. 

हे आरक्षण दिल्यानंतर पाचच दिवसात याविरोधात पहिली याचिका दाखल झाली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कोर्टातही टिकलं, मात्र यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द केलं होतं.

हायकोर्टाने आरक्षण कायम ठेवल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन आघाडी सरकारला टोला लगावलाय. आरक्षण देण्यामागे आमचं कोणतंही राजकारण नव्हतं. आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा होता. मराठा समाजाच्या राजकीय फायद्याचा आम्ही विचार करत नाही. या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज झोप येणार नाही, असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय. आम्ही थातूरमातूर आरक्षण न देता कोर्टासमोर टिकणारं आरक्षण दिल्याचं ते म्हणाले.


मराठा आरक्षणाची सुरुवात काँग्रेसच्या राजवटीत : अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणावर हायकोर्टाने शिक्कामोर्तब करत, राज्य सरकारसह मराठा समाजाला मोठा दिलासा दिला. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार आहे. अपवादात्मक आणि अपरिहार्य परिस्थितीत, आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा ओलांडता येते, असं कोर्टाने नमूद केलं. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.
याबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण म्हणाले, “अतिशय आनंदाचा क्षण आहे. ज्या गोष्टीची सर्वांना इच्छा होती की हे लवकर व्हावे, त्यावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्याची सुरुवात काँग्रेस सरकारच्या राजवटीत झाली होती. त्याला आज अंतिम स्वरूप मिळाले आहे. हा कुठल्या पक्षाचा विजय नाही. ना भाजप ना शिवसेनेचा. हा सकल मराठा समाजाचा विजय आहे ज्यांनी 58 मोर्चे काढले. मोर्चात लाखो लोक सहभागी झाले. जवळपास 40 जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. मला वाटते त्यांचे योगदान विसरता येणार नाही. हायकोर्टाने मागासवर्ग आयोगाने साथ दिली. त्याचा सर्वांना आनंद आहे”

आरक्षण कमी केलंय हा कायदेशीर मुदा आहे. जो पर्यंत पूर्ण निकाल वाचत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही. पण 13 टक्के वाईट नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

मराठा आरक्षणाचे श्रेय सकल मराठा समाजाचे आहे, आता मुस्लिम आणि धनगर समाजाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भाजप-शिवसेना सर्व गोष्टींचा फायदा उचलतात. आधी पुलवामाचा उचलला, आता ह्या गोष्टीचा उचलतील, पण सर्वांना माहीत आहे त्यांचे प्रेम किती तकलादू आहे, असा टोमणा अशोक चव्हाण यांनी लगावला.

Image result for केतकी चितळे

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या आणखी चौघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काल (27 जून) मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी औरंगाबादेत जाऊन सतीश पाटील नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सतीश केशव नरोडे (23), अक्षय विजय बुराडे (25), पंकज महादेव पाटील (26), निनाद विलास पारकर(26) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. दरम्यान केतकीच्या व्हिडीओखाली अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या इतर लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांशी गप्पा करताना मराठी ऐवजी हिंदी भाषेचा उपयोग केला. त्यावेळी तिने फेसबूक लाईव्ह सुरु असताना मराठीचा अट्टाहास करत कमेंट करणाऱ्यांना तिने उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावरुनच केतकीला अश्लील भाषेत ट्रोलिंग करण्यात आले होते. या ट्रोलर्सना केतकी चितळेने तोडीस तोड उत्तर दिलं होतं.

दरम्यान यानंतर केतकीने गोरेगाव पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या व्हिडीओवर अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काल (28 जून) गोरेगाव पोलिसांनी थेट औरंगाबादमधील सतीश पाटील या व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी औरंगाबादहून सतीश नरोडे (23) याला 23 जूनला अटक केली आहे. या दोघांव्यतिरिक्त अक्षय विजय बुराडे ( 25) याला 26 जूनला उल्हासनगरहून, पंकज महादेव पाटील (26) याला 27 जूनला कोल्हापुरहून आणि निनाद विलास पारकर (26) याला मुंबईतून अटक केली आहे. या सर्वांवर 354/ड , 500, 504, 506, 507, 509, 67 ITI हे कलम लावण्यात आले आहेत.नगर : 

नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी संसदेच्या अधिवेशनात पहिलेच भाषण करताना राज्यातील कांद्याचा प्रश्न मांडला आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवावी आणि निर्यात अनुदानाची मुदत सहा महिने वाढवावी, अशी मागणी डॉ. विखे यांनी केली.

सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात शून्य प्रहरात खासदार विखे यांनी कांदा प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, 'दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. 

कांद्याला भाव मिळत नाही. निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने हा प्रश्न आणखी गंभीर बनत आहे. महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. 

सरकारने निर्यातीवरील बंदी उठविल्याने त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. याशिवाय निर्यात अनुदान बंद केल्याचाही फटका त्यांना बसत आहे.'


मुंबई : 

उच्च न्यायलयात दुपारच्या सुमारास मराठा आरक्षणाबाबत महत्तपूर्ण आणि अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे. यामुळे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष आज मुंबई न्यायलय काय निर्णय देत याकडे लागलं आहे.

मोर्चे, आंदोलने आणि तरुणांच्या आत्महत्या… अशा संपूर्ण संघर्षानंतर आज (27 जून) मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय होणार आहे. 

मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात आतापर्यंत 4 याचिका विरोधात आणि 2 याचिका समर्थनात दाखल झाल्या आहेत. तर एकूण 22 हस्तक्षेप अर्ज आहेत. 

ज्यातील 16 मराठा आरक्षणाच्या समर्थनात, तर 6 विरोधात आहेत. तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 26 मार्च 2016 रोजी मराठा आरक्षणासंदर्भात युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर हायकोर्टाने निकाल राखून ठेवला होता. यानंतर मे महिन्यांच्या सुट्ट्यांमुळे मराठा आरक्षणावरील याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही.

मात्र आज (27 जून) अखेरीस मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठतंर्गत या प्रकरणी निर्णय देण्यात येणार आहे.


मुंबई - 

सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे प्रत्येक सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय आणि पोलिसांकडून सट्टेबाजांना अटकही केली जात आहे. 

मुंबईतील एका छापेमारीत पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षकालाच (पीएसआय) अटक केली आहे. भायखळा पोलीस स्टेशनचे पीएसआय ज्ञानेश्वर खरमाटे यांच्यासह दोन जणांना पोलिसांकडून रंगेहाथ अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून  1 लाख 93 हजार 200 रुपये रक्कम आणि सहा मोबाईल फोन ताब्यात घेतले. या सर्व आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

ज्ञानेश्वर खरमाटे यांच्यावर माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिखिन शेख आणि दोन आरोपींसहित ज्ञानेश्वर खारमाटे यांना अटक करण्यात आली. 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्यावर बेटिंग सुरु होती. पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून आरोपींना रंगेहाथ पकडलं. पीएसआयला निलंबित करण्यात आलं असून माटुंगा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.


मुंबई - 

पुण्यातील बालेवाडीतील सरकारी भूखंडासह केसनंद येथील म्हातोबा देवस्थानची सुमारे २३ एकर जमिन अशा दोन प्रकरणात राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुमारे ३०० कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते व माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी (ता. २६ जून) पत्रकार परिषदेत केला. 

दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांनी राजीनामा देऊन त्यांनी चौकशीला सामोरे जावे अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी. जो न्याय एकनाथ खडसे यांना लावला तोच न्याय चंद्रकांतदादा यांनाही लावावा अशी मागणीही त्यांनी केली.


मुंबई -

मुंबई : मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अशी पाटी लावलेल्या गाडीवर यापुढे कारवाई केली जाणार आहे.
अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावलेली असते. मात्र अनेकदा याचा वापर कारवाईपासून वाचण्यासाठी केला जातो. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१३ च्या कलम १३४ प्रमाणे यावर कारवाई करण्यात येणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या ७ दिवसात कुणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करायचा आहे. त्यामुळे येत्या काही काळात अशी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सक्रिय झाल्याचे पाहायला मिळेल. न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर ‘न्यायाधीश’ असे लिहिता येणार नाही.

याबाबत मुंबई हायकोर्टाने परिपत्रक काढले आहे. दरम्यान, अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर नावाचा आणि पोलिसांच्या लोगोचा उल्लेख असतो. याचा वापर करून काही जनांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी हायकोर्टाने हा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे.


श्रीगोंदा ता प्रतीनिधी.

अमरावती जिल्हातील अचलपुरचे आ.बच्चुकडू यांनी महाराष्ट्रात संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे मानधनात वाढ करावी यासाठी गेल्या सात आठ वर्षात महाराष्ट्रासह दिल्ली येथे अनेक वेळा किमान 350 अंदोलने केली या दरम्यान आ. बच्चु कडु यांना बर्याच वेळा अटक सुद्धा झालेली आहे. 

आता आज घडिला महाराष्ट्रात विविध पोलिस स्टेशनला बच्चु कडू यांच्या वर 300 ते 350गुन्हे दाखल आहेत या अविरत संघर्षापुढे अखेर सरकारणे आ बच्चु कडू यांच्या मागमीला पावसाळी अधिवेशनात मंजूरी देऊण थोडया प्रमाणात न्याय दिला आणी संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील सर्वाना सरसकट 600 रुपया वरून 1000 रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने पावसाळी अधिवेशना मध्ये केली.

 याचे सर्व श्रेय आ.बच्चु कडू यांचे आहे याची नोंद महाराष्ट्रातील सर्व लाभधारकानी घ्यावी असी प्रहार संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष अजय महराज बारस्कर,उपअध्यक्ष म.राज्य संतोष पवार,अहमदनगर जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी,विमल अनारसे जिल्हाध्यक्ष महिला, कार्यध्यक्ष अजित धस,प्रकाश बेरड जिल्हासचिव, श्रीगोंदा मा.शहरध्यक्ष नितीन रोही,भाऊ पुराणे युवानेते  ,तालुका उपध्यक्ष अजित गायकवाड,तालुकाध्यक्ष मागासवर्गीय भैलूमे साहेब,सुरेश गलांडे तालुका उपध्यक्ष,राजेंद्र पोकळे तालुकाध्यक्ष अपंग संघटना,संतोष गायकवाड तालुका उपध्यक्ष ,शहरध्यक्ष महादेव बनसोडे,क्रुष्णा खामकर,तालुका उपध्यक्ष सचिन रायकर,बालू खामकर,नितीन शेंडगे शहर उपध्यक्ष विजय शेंडगे तालुका उपध्यक्ष या सर्वांनी दै युवा ध्येयच्या प्रतिनिधीला माहिती दिली. 

या पुढे सांगताना परदेशी आणी पवार म्हणाले आज सरकारने मानधन वाढीची घोषणा केल्यावर अनेक नेते संघटना श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत पण हे श्रेय फक्त प्रहार संघटनेच्या माध्यमातून आ.बच्चु कडू यांचेच आहे असे संतोष पवार व विनोद परदेशी,तसेच सर्व श्रीगोंदा प्रहारच्या टीमने आमच्या दैनिक युवा-ध्येय च्या प्रतिनीधीशी बोलताना म्हटले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget